मराठी बातम्या /बातम्या /मनी /

नोटबंदीनंतर आता काही नाणी बंद होणार? नुकसान होण्याआधी एक काम करा

नोटबंदीनंतर आता काही नाणी बंद होणार? नुकसान होण्याआधी एक काम करा

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 1 रुपया आणि 50 पैशांच्या जुन्या नाण्यांच्या काही कॅटेरगी चलनाबाहेर जाणार आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 1 रुपया आणि 50 पैशांच्या जुन्या नाण्यांच्या काही कॅटेरगी चलनाबाहेर जाणार आहेत.

RBI Guidelines: मीडिया रिपोर्ट्सनुसार, 1 रुपया आणि 50 पैशांच्या जुन्या नाण्यांच्या काही कॅटेरगी चलनाबाहेर जाणार आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Rahul Punde

नवी दिल्ली, 28 नोव्हेंबर : मोदी सरकारने 2016 मध्ये एक हजार आणि 500 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या होत्या. त्यावेळी असंख्य लोकांची गैरसोय झाली होती. कित्येकांचे पैसे कागदाचे तुकड्यात जमा झाले होते. आता अशीच परिस्थिती पुन्हा एकदा येण्याची शक्यता आहे. तुमच्याकडेही 1 रुपया 50 पैशांची नाणी असतील तर ही बातमी तुमच्या कामी येऊ शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जर तुम्हाला 1 रुपया आणि 50 पैशांची नाणी बँकेत जमा करायची असतील तर तुम्ही कोणत्याही त्रासाशिवाय सहजपणे बँकेत जमा करू शकता. पण एकदा जुनी नाणी जमा केल्यानंतर बँका ती नाणी परत देणार नाहीत, त्याऐवजी तुम्हाला नवीन नाणी किंवा नोटा दिल्या जातील.

1 रुपया आणि 50 पैशांची कप्रोनिकेल (तांबे-निकेल) नाणी चलनात नसल्याचं वेगवेगळ्या मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे. त्या मीडिया रिपोर्ट्समध्ये, ही माहिती ICICI बँकेच्या कोणत्याही शाखेत लेखी सूचनेचा हवाला देऊन प्रसिद्ध करण्यात आली आहे. मात्र, हे वृत्त लिहेपर्यंत आम्हाला भारतीय रिझर्व्ह बँकेकडून कोणतीही अधिकृत सूचना प्राप्त झालेली नाही.

ICICI बँकेच्या शाखेत नाण्यांबाबत सूचना

नवी दिल्ली परिसरात असलेल्या ICICI बँकेच्या शाखेने लावलेल्या नोटीसनुसार, काही नाणी पुन्हा जारी करण्याची परवानगी नाही. याचा अर्थ असा की एकदा बँकेत जमा केल्यानंतर ते बँकेकडून पुन्हा जारी केले जाणार नाहीत. ही नाणी केंद्रीय बँकेद्वारे संबंधित बँकांकडून परत घेतली जातील.

वाचा - सणासुदीमुळे आर्थिक बजेट बिघडलं? काळजी नको, गाडी रुळावर आणण्याचा प्रभावी मार्ग

ही नाणी बेकायदेशीर नाहीत

वास्तविक, याचा अर्थ एवढाच की अशी नाणी कायदेशीर निविदा असणार नाहीत. ही नाणी कायदेशीर निविदा आहेत. मात्र, ती चलनातून बाहेर काढली जात आहेत. वास्तविक, ही जुनी नाणी आहेत आणि 1990 च्या दशकात आणि 2000 च्या दशकाच्या सुरुवातीस सामान्यतः वापरली जात होती. बँकेने जारी केलेल्या नोटीसनुसार, आरबीआयच्या निर्देशांनुसार पुढील नाणी पुन्हा जारी केली जाणार नाहीत.

1. Cupronickel coins of Re 1  (1 रुपयाची कप्रोनिकल नाणी)

2. Cupronickel coins of 50 paise (50 पैसे कप्रोनिकल नाणे)

3. Cupronickel coins of 25 paise (25 पैसे कप्रोनिकल नाणे)

4. Stainless steel coins of 10 paise (10 पैसे स्टेनलेस स्टीलची नाणी)

5. Aluminium bronze coins of 10 paise (10 पैसे अ‍ॅल्युमिनियम कांस्य नाणे)

6. Aluminium coins of 20 paise (20 पैसे अ‍ॅल्युमिनियम नाणे)

7. Aluminium coins of 10 paise (10 पैसे अ‍ॅल्युमिनियम नाणे)

8. Aluminium coins of 5 paise (5 पैसे अ‍ॅल्युमिनियम नाणे)

First published:

Tags: Money