Home /News /money /

Money Management Apps: तुमचे पैसे कुठे खर्च झाले? 'या' पाच अप्सच्या मदतीने हिशेब ठेवणे होईल सोपं

Money Management Apps: तुमचे पैसे कुठे खर्च झाले? 'या' पाच अप्सच्या मदतीने हिशेब ठेवणे होईल सोपं

तुम्ही तुमचा खर्च ट्रॅक करण्यासाठी काही अ‍ॅप्सचीही मदत (Useful Apps) घेऊ शकता. या डिजिटल अ‍ॅप्समुळे (Digital Apps) तुम्हाला आर्थिक व्यवस्थापन करणं सोपं जाईल.

मुंबई, 25 एप्रिल : वीकएंड संपला आहे. तुम्ही मित्रमैत्रीणींबरोबर पार्टी केली असेल, फिरायला गेला असाल किंवा मनाजोगतं शॉपिंगही केलं असेल. आता खर्च (Expenses) तर झाला असणारच; पण तुमचा नेमका किती खर्च झाला आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचं आहे. तुम्ही तुमचं पूर्ण पाकिट तर रिकामं केलं नाहीत ना? आपल्या खिशावर, खर्चावर नियंत्रण मिळवणं सोपं नाही. पण तुम्ही जर स्वत:ला ती सवयच लावून घेतलीत तर कितीतरी गोष्टी सोप्या होतील. कदाचित आर्थिक व्यवस्थापन करण्यात आणि पावसाळ्यात तुमच्या खर्चाचं बजेट आखण्यात त्याची मदतही होईल. प्रत्यक्ष असं जरा कठीण जातं. आता तुम्ही तुमचा खर्च ट्रॅक करण्यासाठी काही अ‍ॅप्सचीही मदत (Useful Apps) घेऊ शकता. या डिजिटल अ‍ॅप्समुळे (Digital Apps) तुम्हाला आर्थिक व्यवस्थापन करणं सोपं जाईल. बिझनेस टुडे इन या वेबसाईटवर या अ‍ॅप्सबद्दलची अधिक माहिती देण्यात आली आहे. वॉलनट (Walnut) अन्य सर्व मनी मॅनेजर अ‍ॅप्समध्ये असलेली वैशिष्ट्ये तर या अ‍ॅपमध्ये आहेतच, पण त्याशिवाय हे अ‍ॅप काही टॉप ब्रँड्सच्या खरेदीसाठी क्रेडिट आणि सोपे EMI मिळवून देण्याची सेवाही देऊ करतं. महत्त्वाचं म्हणजे या अ‍ॅपला RBI अंतर्गत नोंदणीकृत असलेल्या NBFC ची परवानगी आहे. त्यामुळे युजर्सना हे वापरताना एक प्रकारची सुरक्षितता मिळते. अँड्रॉईड (Android) आणि आयोएस (iOS) युजर्ससाठीही हे अ‍ॅप उपलब्ध आहे. याची अगदी मुलभूत आवृत्ती पेवॉल्सच्या (Paywalls) मागे आहे. यामध्ये काही वैशिष्ट्यपूर्ण फीचर्स आहेत. त्यामुळे खर्च ट्रॅक करणं तर शक्य होतंच; पण गुंतवणुकीवरही लक्ष ठेवता येतं. Multibagger Share: चार महिन्यात 2 रुपयांचा शेअर 102 रुपयांवर, एक लाखांची गुंतवणूक बनली 35 लाख मनी मॅनेजर (Money Manager) या अ‍ॅपमुळे युजर्स त्यांची दैनंदिन, साप्ताहिक आणि मासिक आर्थिक खर्चाबाबतचा रिपोर्ट तयार करू शकतात आणि त्याचं पुरावलोकनही करता येतं. यामध्ये खर्चावर लक्ष ठेवणारा ट्रॅकर आणि बजेट प्लॅनर ही खास वैशिष्ट्ये आहेत. यामध्ये अगदी सहज समजण्याजोगे आलेख आणि तक्ते (Graphs And Charts) आहेत. त्यामुळे तुमच्या खर्च करण्याच्या सवयी समजू शकतात. हे अ‍ॅपही अँड्रॉईड (Android) आणि आयोएस (iOS) युजर्ससाठी उपलब्ध आहे. या अ‍ॅपमधील सर्व फीचर्स मोफत आहेत आणि पेवॉल्समागे कोणताही हप्ता दडलेला नाही. विनामूल्य फ्री व्हर्जनमध्ये काही जाहिरातींचा समावेश आहे. स्पेंडी (Spendee) स्पेंडी (Spendee) या अ‍ॅपमुपळे तुमच्या खर्चाचा हिशेब ठेवणं आणि त्याचबरोबर योग्य पद्धतीने खर्च करण्यासाठी बजेट तयार करणं सोपं जातं. तुमच्या आर्थिक, खर्च करण्याच्या सवयींबाबत काही वैयक्तिक सल्लेही दिले जातात. हे अ‍ॅप डार्क मोडवर काम करतं आणि एकाचवेळेस अनेक चलनं म्हणजेच करन्सीजही यात हाताळल्या जाऊ शकतात. हे अ‍ॅपही अँड्रॉईड (Android) आणि आयोएस (iOS) युजर्ससाठी उपलब्ध आहे. हे अ‍ॅप फ्री आहे पण काही खास वैशिष्ट्ये हवी असतील युजर्स पेड व्हर्जनही घेऊ शकतात. Investment Tips: PPF अकाऊंट एक फायदे अनेक; चांगला परतावा, कर्ज, टॅक्स बचत आणि बरंच काही... मनीफाय (Monefy) मनीफाय (Monefy) हे एक पेड अ‍ॅप आहे. अँड्रॉईड (Android) आणि आयोएस (iOS) युजर्सबरोबरच विंडोजच्या (Windows) फोन्ससाठीही हे अ‍ॅप उपयुक्त आहे. या अ‍ॅपमधूनही विविध प्रकारच्या करन्सीज हाताळल्या जातात आणि यामध्ये कोणत्याही प्रकारच्या इनअ‍ॅप जाहिराती (Inn App Advertisements) नाहीत. तुमच्या आर्थिक बाबींशी संबंधित असल्याने हे पासवर्डने सुरक्षित केलेलं आहे. यामुळे तुमच्या खर्चाचा हिशेब ठेवणं आणि तुमच्या येणाऱ्या खर्चानुसार योग्य बजेट तयार करण्यासाठीही हे अ‍ॅप मदत करतं. यामध्ये काही माहितीपूर्ण चार्ट्स आणि ग्राफ्स आहेत. मात्र यामध्ये अजूपर्यंत कोणतेही गुंतवणुकीविषयीची फीचर्स देण्यात आलेली नाहीत. वॅली (Wally) या अ‍ॅपमुळे तुम्हाला तुमची बिलं, विविध प्रकारेच खर्च विभागता येतात तसंच खर्च ट्रॅक करता येतो आणि आधी केलेल्या खर्चावरही देखरेख ठेवता येते. मात्र हे अ‍ॅप फक्त अँड्रॉईड युजर्ससाठीच (Android Usres) उपलब्ध आहे. यामध्ये इनअ‍ॅप जाहिराती आहेत. तसंच त्यात गुंतवणुकीवर देखरेख करण्यासाठी कोणतंही फीचर अजून उपलब्ध नाही. याशिवायही अनेक प्रकारची मनी अ‍ॅप उपलब्ध आहेत. त्यातील काही फ्री तर काही मात्र पेड आहेत. तुमच्या गरजा ओळखून त्यापैकी योग्य अ‍ॅप तुम्ही निवडू शकता. त्यामुळे तुम्हाला तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवता येऊ शकतं.
First published:

Tags: Money, Personal finance

पुढील बातम्या