जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Investment Tips: PPF अकाऊंट एक फायदे अनेक; चांगला परतावा, कर्ज, टॅक्स बचत आणि बरंच काही....

Investment Tips: PPF अकाऊंट एक फायदे अनेक; चांगला परतावा, कर्ज, टॅक्स बचत आणि बरंच काही....

Investment Tips: PPF अकाऊंट एक फायदे अनेक; चांगला परतावा, कर्ज, टॅक्स बचत आणि बरंच काही....

PPF Investment: पीपीएफ खात्याचा एक मोठा फायदा म्हणजे कर बचत. या खात्यात जमा केलेली रक्कम, त्यावर मिळणारे व्याज आणि मुदतपूर्तीवर मिळालेली रक्कम करपात्र नाही.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 24 एप्रिल : सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) ही भारतातील सर्वात लोकप्रिय बचत योजनांपैकी एक आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे PPF खाते जरी एक असले तरी त्याचे फायदे अनेक आहेत. भविष्यातील आर्थिक उद्दिष्ट (Future Planning) साध्य करण्यासाठी ही एक उत्तम योजना आहे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ही योजना केंद्र सरकारची आहे, त्यामुळे त्यात गुंतवलेले पैसे आणि परतावा सुरक्षित आहेत. त्याचे फायदे मोजले तर सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीमध्ये अल्प बचत गुंतवून त्यावर परतावा मिळवता येतो. ही योजना सेवानिवृत्तीसाठी देखील वापरली जाऊ शकते. PPF चा कार्यकाळ 15 वर्षांचा असतो पुढे तो पाच वर्षांसाठीही वाढवता येऊ शकते. अनेक लोक पीपीएफमध्ये गुंतवणूक करतात, तरीही अनेकांना त्याचे सर्व फायदे माहीत नसतात. त्यामुळेच PPF खाते काय आहे, ते कसे उघडले जाऊ शकते आणि त्याचे फायदे काय आहेत याबद्दल माहिती घेऊयात. मुलांसाठी पीपीएफ खाते तुम्ही मुलांसाठी पीपीएफ खातेही उघडू शकता. मुलांसाठी पीपीएफ खाते खूप मदत करू शकते. तुम्ही हे खाते मुलाच्या लहान वयात उघडल्यास, मूल मोठे होईपर्यंत ते खाते मॅच्युअर झालेले असेल किंवा मॅच्युरिटीच्या जवळ असेल. जर तुम्ही 5 वर्षाच्या मुलासाठी PPF खाते उघडले तर हे खाते मॅ्च्युअर होईपर्यंत ते मूल 20 वर्षांचे होईल. मुलाच्या उच्च शिक्षणासाठी तुम्ही चांगली रक्कम जमा केली असेल. पीपीएफ खाते 5 वर्षांसाठी वाढवता येते. मुलाचे पीपीएफ खाते त्याचे पालक किंवा कायदेशीर पालक चालवू शकतात. एका मुलासाठी फक्त एकच खाते उघडता येते. कर्ज घेणे चांगलंही आणि वाईटही; तज्ज्ञांचं मत वाचा, कर्जबाजारी होण्यापासून नक्की वाचाल 15 वर्षांसाठी खाते PPF खात्याची मॅच्युरिटी 15 वर्षांची आहे. म्हणजेच 15 वर्षापूर्वी तुम्ही या खात्यातून पैसे काढू शकत नाही. जर पैसे 15 वर्षांसाठी जमा केले तर व्याज मूळ रकमेत जमा होते आणि नंतर त्यावर व्याज मिळते. 15 वर्षांनंतर, तुम्ही तुमच्या गरजेनुसार हे खाते 5-5 वर्षांसाठी वाढवू शकता. मात्र, गरजेच्या वेळी, आपण हे खाते वेळेपूर्वी बंद करू शकता. हे खाते विशेष परिस्थितीत खाते उघडल्यानंतर 5 वर्षांनी बंद केले जाऊ शकते. फक्त एक खाते एखादी व्यक्ती फक्त एकच पीपीएफ खाते उघडू शकते. तुम्ही ते संयुक्त खाते म्हणूनही उघडू शकत नाही. तुम्ही एकापेक्षा जास्त पीपीएफ खाते उघडल्यास, एकाच खात्यावर व्याज मिळेल, त्याच खात्यात जमा केलेल्या रकमेवर कर लाभ मिळेल. इतर खाती निरुपयोगी मानली जातील. GST Slab: महागाईचा बोजा आणखी वाढणार;143 वस्तूंच्या किमती वाढवण्याची शक्यता, GST काऊन्सिलची शिफारस सरकार व्याजदर ठरवते (Interest Rates) सरकार दर तीन महिन्यांनी पीपीएफ खात्यावरील व्याजदर जाहीर करते. सध्या पीपीएफ खात्याचा व्याज दर वार्षिक 7.10 टक्के आहे. सरकार प्रत्येक तिमाहीत पीपीएफसाठी त्याच्या सिक्युरिटीजवर मिळालेल्या परताव्याच्या आधारे व्याजदर जाहीर करते. PPF खात्यात जमा केलेल्या रकमेवरील व्याज दर महिन्याच्या 5 तारखेनंतर महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत सर्वात कमी शिल्लक रकमेवर मोजले जाते. म्हणून, PPF गुंतवणूकदारांना प्रत्येक महिन्याच्या 5 तारखेपूर्वी त्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याचा सल्ला दिला जातो. कर बचत (Tax Saving) पीपीएफ खात्याचा एक मोठा फायदा म्हणजे कर बचत. या खात्यात जमा केलेली रक्कम, त्यावर मिळणारे व्याज आणि मुदतपूर्तीवर मिळालेली रक्कम करपात्र नाही. पीपीएफला तिहेरी कर लाभ असलेली योजना म्हणतात. तुम्ही या खात्यात जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये जमा केलेल्या रकमेवर कर सवलतीचा दावा करू शकता. 500 रुपये जमा करणे आवश्यक PPF खाते 15 वर्षे अॅक्टिव्ह ठेवण्यासाठी दरवर्षी त्यात पैसे टाकणे आवश्यक आहे. तुम्ही एका वर्षात किमान 500 रुपये आणि कमाल 1.5 लाख रुपये जमा करू शकता. 1.5 लाखांपेक्षा जास्त रकमेवर व्याज किंवा कर सवलतीचा लाभ मिळणार नाही. कर्ज सुविधा (Loan Facility) तुम्ही तुमच्या PPF खात्यात जमा केलेल्या रकमेवर कर्ज देखील घेऊ शकता. खाते उघडण्याच्या तारखेपासून तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतर कर्ज घेता येते. याशिवाय, खाते उघडल्यानंतर 5 वर्षांनी, विशेष परिस्थितीत, तुम्ही त्यातील काही रक्कम काढू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: investment , money , PPF
  • First Published :
जाहिरात
जाहिरात