नोकरदार वर्गाला त्यांच्या पीएफमधील पैशांबाबत माहित असणं अत्यंत गरजेचं आहे. आता ही रक्कम माहिती करुन घेणं अतिशय सोपं झालं आहे. आतापर्यंत तुम्ही ऑनलाइन बॅलन्स तपासणं किंवा पासबुक डॉउनलोड करता येत होतं. मात्र EPFO ने ग्राहकांना अधिक सुविधा देण्याअंतर्गत काही पावलं उचलली आहेत. तुम्ही एका SMS द्वारे देखील तुमच्या खात्यातील बॅलन्स जाणून घेऊ शकता. याकरता तुम्हाला तुमचा यूनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) माहित असणं आवश्यक आहे. तुम्हा रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावरुन मेसेज पाठवून PF Balance तपासता येईल. जाणून घ्या घरबसल्या पीएफ तपासण्याच्या चार पद्धती कोणत्या आहेत.