1 जानेवारीपासून सामान्यांच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या काही महत्त्वाच्या नियमात बदल (Rules changing from January 1) होणार आहेत. . चेक पेमेंटपासून फास्टॅग, UPI पेमेंट सिस्टम आणि GST रिटर्नच्या नियमात हे बदल होणार आहेत. तुम्हाला नुकसान टाळायचे असेल तर या नियमांबाबत सविस्तर माहिती असणं आवश्यक आहे.
निवडक फोन्समध्ये बंद होईल WhatsApp- 1 जानेवारीपासून काही प्लॅटफॉर्मसवर WhatsApp सपोर्ट करणं बंद होणार आहे. WhatsApp पेज ने अशी माहिती दिली आहे की, व्हॉट्सॲपने (Whatsapp) जुन्या अँड्रॉइड स्मार्टफोन्स आणि आयओएसचा सपोर्ट बंद करण्यात येणार असल्याचे जाहीर केलं आहे. यामुळे जुन्या ऑपरेटिंग सिस्टीम असणाऱ्या अँड्रॉइड स्मार्टफोन आणि आयओएस फोन्समध्ये आता व्हॉट्सॲप (Whatsapp) सुविधा मिळणार नसल्याचं निश्चित झालं आहे. आता ios 9 आणि अँड्रॉइड 4.0.3 या ऑपरेटिंग सिस्टीम (Operating System) पासून सुरू होणाऱ्या OS वरच व्हॉट्सॲप (Whatsapp) चालू शकणार आहे.