मुंबई, 16 मार्च : वाढती महागाई काही संपण्याचं किंवा थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही. आता या महागाईच्या यादीत अजून एका गोष्टीची भर पडणार ती म्हणजे आरोग्य विमा. (Health insurance)
येत्या 1 एप्रिलपासून तुमच्या आरोग्य विम्याचा हफ्ता (health insurance premium) वाढू शकतो. आणि ही वाढ जवळपास 10 टक्के असू शकते. कोरोनामुळे आरोग्य विमा कंपन्यांनी आजवर आरोग्य विमा कंपन्यांना आरोग्य विम्याच्या प्रीमियममध्ये वाढ करण्यापासून आजवर थांबवून ठेवलं होतं. मात्र आता हजारो कोटी रुपयांचे कोरोना क्लेम आणि IRDAI चे स्टँडर्ड नियम लागू झाल्यानंतर कंपन्यांना नाईलाजानं आपले प्रीमियम वाढवावे लागत आहेत. (raise in cost of health insurance)
वाढणार आरोग्य विम्याचा प्रीमियम
बहुतेक कंपन्या आपल्या प्रीमियमला नव्या फायनान्शियल वर्षाच्या सुरवातीपासून रिवाईज करतात. अशात 1 एप्रिल 2021 पासून कंपन्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीचा प्रीमियम वाढवू शकतात. एक नजर टाकूया त्या कारणांवर ज्यांच्यामुळं आरोग्य विम्याचा प्रीमियम वाढणं एकदमच खात्रीलायक मानलं जात आहे. (health insurance price hike)
अनेक आजार पॉलिसीमध्ये समाविष्ट
पाहिलं कारण हे आहे, की इन्शुरन्स रेग्युलेटर IRDAI नं अनेक गंभीर आजारांना मेडिकल इन्शुरन्स पॉलिसीमध्ये समाविष्ट केलं आहे. असे अनेक आजार आता पॉलिसीत असणार आहेत. मानसिक समस्या, जेनेटिक आजार, मज्जासंस्थेसंबंधीचे विकार आणि मानसशास्त्रीय आजार आता विम्याच्या अंतर्गत येतील. यामुळं विम्याचं प्रीमियम अर्थात हफ्ता वाढला आहे. (price rise insurance news)
हेही वाचा ...तर नुकसान भरपाईची जबाबदारी बँकेची नाही; कोर्टानंही बँक ग्राहकांना ठणकावलं
कोरोनाच्या क्लेमचं ओझं
दुसरं मोठं कारण आहे हजारो कोटी रुपयांचा कोरोना क्लेम. विमा कंपन्यांकडे 14 हजार कोटी रुपयांचे भरभक्कम दावे आलेले आहेत. यातील 9 हजार कोटी रुपयांचे दावे कंपन्यांनी सेटल केले आहेत. बाकी दावे सेटल केले जात आहेत. या पडलेल्या ओझ्याची प्रीमियम वाढवत वसुली केली जाणार आहे. (health insurance premium hike news)
मेडिकल इन्फ्लेशनमध्ये वाढ
एक मोठं कारण आहे मेडिकल इन्फ्लेशन. मेडिकल क्षेत्रात किमती 18-20 टक्क्यांनी वाढलेल्या आहेत. यामुळं कंपन्यांवरील बोजाही वाढला आहे. अशावेळी प्रीमियम वाढवणं हा विमा कंपन्यांचा नाईलाज आहे.
हेही वाचा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी सज्ज राहा, केंद्राचा राज्य सरकारला धोक्याचा इशारा
रूम रेंटच्या रेशोमध्ये बाकीचे चार्ज संपतील
आता रूम रेन्टच्या प्रमाणात बाकीचे चार्जेस संपण्यानेही प्रीमियमवर परिणाम होईल. पूर्वी कंपन्या रूम रेंटच्या गुणोत्तरानुसार बाकीचे खर्च जसे की टेस्ट वगैरे यांच्यावर प्रीमियम कापत असत. आता मात्र त्या असं करू शकणार नाहीत. त्यांना अरूम रेन्टसह बाकीचेही चार्जेस द्यावे लागतील. यामुळं आता प्रीमियम वाढण्याला पर्याय नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Insurance, Policy plans