मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Health Insurance Policy: आरोग्य विमा पॉलिसी निवडण्यापूर्वी ‘या’ चार गोष्टींची घ्या काळजी, नाहीतर...

Health Insurance Policy: आरोग्य विमा पॉलिसी निवडण्यापूर्वी ‘या’ चार गोष्टींची घ्या काळजी, नाहीतर...

Health Insurance Policy: आरोग्य विमा पॉलिसी निवडण्यापूर्वी ‘या’ चार गोष्टींची घ्या काळजी, नाहीतर...

Health Insurance Policy: आरोग्य विमा पॉलिसी निवडण्यापूर्वी ‘या’ चार गोष्टींची घ्या काळजी, नाहीतर...

Health Insurance Policy: आरोग्य विमा पॉलिसी मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Suraj Sakunde

मुंबई, 3 ऑक्टोंबर: सुस्त जीवनशैली आणि दीर्घकाळ तणावपूर्ण वातावरणात कार्यालयीन कामकाज यामुळे आजकालचे बहुतांश तरुण अनेक आजारांशी झुंज देत आहेत. त्यामुळे त्यांना शांत झोप लागत नाही. त्यांना अयोग्य आहार घेण्याची सवय झाली आहे. साथीच्या आजारानं तरुणांच्या या जीवनशैलीवर मोठा परिणाम केला आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना आर्थिक अडचणींचाही सामना करावा लागत आहे. एक योग्य आरोग्य विमा पॉलिसी या सगळ्यापासून मुक्त होण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. जर तुम्ही ती खरेदी करण्याचा विचार करत असाल तर या महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेणं गरजेचं आहे.

आरोग्य विम्याची गरज ओळखा-

आयुष्यात काय होईल याचा भरवसा नसतो. अशा परिस्थितीत आर्थिक दिवाळखोरी टाळण्यासाठी योग्य आरोग्य विमा योजना खरेदी करावी. विमा योजना खरेदी करण्यापूर्वी तुमच्या गरजा ओळखा आणि आरोग्य विमा योजना देखील नीट समजून घ्या. तसेच तुम्ही फक्त तुमच्यासाठी आरोग्य विमा योजना खरेदी करत आहात की संपूर्ण कुटुंबासाठी आरोग्य विमा संरक्षण घेत आहात हे ठरवा. एकदा हे ठरवल्यानंतर तुम्ही योग्य आरोग्य विमा पॉलिसी निवडू शकता आणि स्वतःला आणि तुमच्या कुटुंबाला आनंदी ठेवण्यासाठी ती योजना खरेदी करू शकता. वय, कौटुंबिक वैद्यकीय इतिहास, आधीच अस्तित्वात असलेले रोग आणि त्याची किंमत, महाग होत असलेल्या आरोग्य सुविधा या सर्व बाबींचाही विचार केला पाहिजे. यासोबतच आरोग्य विमा पॉलिसीचं नूतनीकरण आणि विमा कंपनीची माहिती गोळा करावी. पॉलिसीशी संबंधित कर्ज आणि कर सूट संबंधित माहिती देखील घेतली पाहिजे.

आरोग्य विमा पॉलिसी खरेदी करण्यासाठी योग्य वय-

आरोग्य विमा पॉलिसीसाठी वय खूप महत्त्वाचे आहे. जितक्या लवकर तुम्ही ते विकत घ्याल तितके चांगले. सध्याच्या काळात, प्रत्येक व्यक्तीने व्यावसायिक करिअर सुरू होताच आरोग्य विमा पॉलिसी घेण्याचे नियोजन केले पाहिजे. जीवनशैलीशी संबंधित आजार सुरू होण्यापूर्वी किंवा 30 वर्षे वयाच्या आसपास विश्वासार्ह विमा कंपनीकडून योग्य आरोग्य विमा पॉलिसी खरेदी करावी.

हेही वाचा: National Pension Scheme: ‘या’ सरकारी योजनेत करा गुंतवणूक, वृद्धापकाळात मिळेल पेन्शन अन् टॅक्सही वाचेल

सर्वोत्तम आरोग्य विमा पॉलिसी निवडा-

जर तुमचं आरोग्य चांगलं असेल, तर तुम्ही आरोग्य विमा पॉलिसीची निवड करावी जी आवश्यकतेनुसार अधिक कव्हरेज देते. म्हणजेच आजाराच्या वेळी गरज भासेल तेव्हा रुम कॅटेगरीचं बंधन नसावं, रोगानुसार मर्यादा नसावी, डॉक्टर किंवा सर्जन यांच्यावर होणारा खर्च मर्यादित नसावा, उपचारासाठी अतिरिक्त खर्च होता कामा नये. याशिवाय ओपीडीमध्ये दाखवण्याची सोय असावी. तसेच आरोग्य विमा घेतल्यावर वार्षिक आरोग्य तपासणीची सुविधाही उपलब्ध असावी.

सर्वात महत्वाची गोष्ट-

आरोग्य विमा पॉलिसी नेहमी विश्वासार्ह विमा कंपनीकडून खरेदी करावी. तुम्ही कोणतीही पॉलिसी खरेदी करत असाल, तर तुम्हाला जास्तीक जास्त हॉस्पिटलमध्ये उपचाराची सुविधा मिळेल याची खात्री करा. हे देखील माहित असलं पाहिजे की उपचारांवर अतिरिक्त खर्च करण्याची आवश्यकता नसावी. ओपीडी कव्हरेज सहज मिळवायला हवी. कोणत्याही प्रकारचा क्लेम करण्याची गरज लागू नये. असे धोरण निवडले पाहिजे. आणि तुमच्या गरजेनुसार तुम्ही स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी आरोग्य विमा पॉलिसीचे कव्हर घेतले पाहिजे.

First published:

Tags: Health, Insurance, Policy