मुंबई, 27 ऑक्टोबर- देशातील सरकारी आणि खासगी बँका आपापल्या ग्राहकांसाठी विविध प्रकारच्या योजना आणत असतात. काही योजना कायमस्वरुपी असतात, तर काही फक्त ठराविक मुदतीसाठी असतात. त्या ठराविक मुदतीत त्या योजनेसाठी अर्ज करून त्याचा दीर्घकालीन लाभ घेता येतो. अनेक बँका ग्राहकांच्या फायद्याच्या अशा शॉर्ट टर्म योजना सुरू करतात. अशीच एक योजना देशातील सर्वांत मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी आणली होती. बँकेने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत ‘एसबीआय उत्सव डिपॉझिट’ योजना लाँच केली होती. ज्यामध्ये 1000 दिवसांच्या एफडीवर 6.10 टक्के व्याज मिळतं. पण बँकेने ही विशेष योजना ठराविक काळासाठी लाँच केली होती. बँकेच्या या विशेष एफडी योजनेची अंतिम मुदत आता संपणार आहे. ही योजना 15 ऑगस्ट 2022 पासून केवळ 75 दिवसांसाठी सुरू करण्यात आली होती. म्हणजेच या योजनेची मुदत आज 28 ऑक्टोबर 2022 रोजी संपणार आहे. त्यामुळे तुम्ही अर्ज केला नसेल तर अर्ज करू शकता. तत्पूर्वी, या योजनेचे फायदे आणि व्याजदर जाणून घ्या. **(हे वाचा:** SBI ने ट्वीट करून ग्राहकांसाठी दिला मोठा अलर्ट ) SBI Utsav Deposit चे फायदे कोणते? या योजनेत ग्राहकांना वार्षिक 6.10 टक्के दराने व्याज मिळेल. तसंच ज्येष्ठ नागरिकांना 0.50 टक्के अतिरिक्त व्याज मिळेल.
एसबीआयने बदलले एफडीचे व्याजदर बँकेच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, 7 ते 45 दिवसांसाठी नवीन दर 3 टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. 46 ते 179 दिवसांसाठी इंटरेस्ट रेट 50 बेसिस पॉइंट वाढवून 4.50 टक्के, 180 ते 210 दिवसांसाठी 60 बेसिक पॉइंट्स वाढवून 5.25 टक्के, 211 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी 80 बेसिस पॉइंट्सनी वाढवून 5.50 टक्के आणि 1 वर्षापेक्षा जास्त ते 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD साठी, व्याज दर 50 बेसिस पॉइंट्सने वाढवून 6.10 टक्के करण्यात आला आहे.2 वर्षांपासून ते 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवरील व्याजदर 60 बेसिस पॉइंट्सने वाढवून 6.25 टक्के करण्यात आला आहे. तर, 3 वर्षांपासून ते 5 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या FD वरील इंटरेस्ट रेट 30 बेसिस पॉईंट्सने वाढवून 6.10 टक्के करण्यात आला आहे आणि 5 वर्षे ते 10 वर्षांपर्यंतच्या एफडीवर इंटरेस्ट रेट 25 बेसिस पॉईंट्सने वाढवून तो 6.10 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे. त्यामुळे तुम्ही विचार करत असाल तर आजच या योजनेत पैसे गुंतवू शकता.