जाहिरात
मराठी बातम्या / मनी / तुम्हाला मिळाले का Adani Wilmar कंपनीचे शेअर्स? अशाप्रकारे ऑनलाइन तपासा

तुम्हाला मिळाले का Adani Wilmar कंपनीचे शेअर्स? अशाप्रकारे ऑनलाइन तपासा

तुम्हाला मिळाले का Adani Wilmar कंपनीचे शेअर्स? अशाप्रकारे ऑनलाइन तपासा

देशातील दिग्गज उद्योग समूह असलेल्या अदानी उद्योगाचा हा आयपीओ आहे. तुम्हीदेखील या आयपीओत (IPO) गुंतवणूक केली असेल तर तुमच्या खात्यात शेअर्स आले की नाही हे तुम्ही अगदी सहज तपासू शकता.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 03 फेब्रुवारी: सध्या शेअर बाजारात (Share Market Latest News) तेजीचं वातावरण असून, कोरोना साथीचं (Coronavirus Latest News) सावटही ओसरत असल्यानं अर्थव्यवस्था रुळावर येत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. याचा लाभ शेअर बाजारात येणाऱ्या आयपीओना मिळत आहे. सध्या शेअर बाजारात 3600 कोटी रुपयांच्या अदानी विल्मर आयपीओची (Adani Wilmar Ipo) चर्चा असून, अनेक गुंतवणूकदारांनी यासाठी अर्ज केला आहे. देशातील दिग्गज उद्योग समूह असलेल्या अदानी उद्योगाचा हा आयपीओ आहे. तुम्हीदेखील या आयपीओत (IPO) गुंतवणूक केली असेल तर तुमच्या खात्यात शेअर्स आले की नाही हे तुम्ही अगदी सहज तपासू शकता. शेअर्स मिळाले नसतील तर तुमच्या खात्यात तुम्ही भरलेले पैसे जमा झालेले असतील. यासाठीची पद्धत अगदी सोपी आहे. मुंबई शेअर बाजाराच्या (BSE) अधिकृत वेबसाइटवरून किंवा रजिस्ट्रारच्या वेबसाइटवरून शेअर्सचे मिळाले आहेत की नाहीत याची खात्री करू शकता. हे वाचा- इंटरनेट शिवाय 2 मिनिटात तुमचा PF बॅलन्स जाणून घ्या! ही आहे सोपी पद्धत 218 ते 223 रुपयांचा प्राइस बँड (Price Band) असलेला हा आयपीओ गेल्या आठवड्यात गुरुवारी सबस्क्रिप्शनसाठी खुला झाला होता. त्याला गुंतवणूकदरांचा उदंड प्रतिसाद मिळाला असून तो एकूण 18 पट अधिक सब्स्क्राईब झाला आहे. ग्रे मार्केटमध्ये त्याची किंमत वाढत असून, कालच्या 40 रुपयांवरून आज ती 45 रुपये झाली आहे. कंपनीला आयपीओपूर्वी अँकर गुंतवणूकदारांकडून 940 कोटी रुपये मिळाले होते. bseindia.com या वेबसाइटद्वारे तपासा - सर्वप्रथम https://www.bseindia.com/investors/appli_check.aspx वर जा. - इक्विटी पर्याय निवडा. - इश्युचे नाव निवडा - अर्ज क्रमांक किंवा पॅन क्रमांक भरा. - सर्च बटणावर क्लिक करा. - तुम्हाला शेअर मिळाले आहेत की नाही ते दिसेल. रजिस्ट्रारच्या वेबसाइटवर तपासा - प्रथम https://ris.kfintech.com/iposatus/ipos.aspx या लिंकवर क्लिक करा. - त्यानंतर ड्रॉपडाउन करून आयपीओचे नाव निवडा. - आता तुमचा डीपी आयडी (DP ID) किंवा क्लायंट आयडी (Client ID)किंवा पॅन (PAN No) टाका. - तुमच्याकडे अर्ज क्रमांक असल्यास अर्ज प्रकारावर क्लिक करा. हे वाचा- Cryptocurrency मध्ये करताय गुंतवणूक तर आजपासून सुरू करा हे काम, अन्यथा… - डीपी आयडी किंवा क्लायंट आयडी असेल तर एनएसडीएल (NSDL) किंवा सीडीएसएलपैकी (CDSL) तुमचा डिपॉझिटरी निवडा नंतर तुमचा डीपी आयडी किंवा क्लायंट आयडी टाका. - त्यानंतर कॅप्चा सबमिट करा. - तुम्हाला शेअर वाटपाबाबतची संपूर्ण माहिती दिसेल. ..अन्यथा मिळेल रिफंड तुम्हाला शेअर मिळाले नसल्यास तुम्ही भरलेली सर्व रक्कम तुमच्या बँक खात्यात दोन दिवसात जमा होईल. तेव्हा तुम्ही या आयपीओमध्ये गुतंवणूक केली असेल तर तुम्हाला शेअर्स मिळाले आहेत की नाही ते अगदी घरबसल्या एका क्लिकवर जाणून घ्या.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात