मुंबई, 17 फेब्रुवारी : चालू आर्थिक वर्ष 2021-22 (FY 2022-23) संपण्यासाठी दीड महिना उरला आहे. जर तुम्ही आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांची कमाल मर्यादा टॅक्स वाचवण्यासाठी (Tax Saving) पूर्णपणे वापरली असेल, तर तुम्ही कलम 80D अंतर्गत कर सवलतीचा लाभ देखील घेऊ शकता. आयकर कलम 80D अंतर्गत आरोग्य विमा योजनेसाठी भरलेल्या प्रीमियमवर अतिरिक्त कर लाभ उपलब्ध आहे. या विभागातील तरतुदींद्वारे, तुम्ही तुमच्या आणि तुमच्या पालकांसाठी आरोग्य विमा प्रीमियमवर (Health Insurance) 1 लाखांपर्यंत कर सूट मिळवू शकता. मर्यादा संपल्यानंतरही एक संधी विमा आणि गुंतवणूक सल्लागार मनोज स्वीटी जैन म्हणतात की तुम्ही जरी 80C ची पूर्ण मर्यादा वापरली असेल तरीही तुम्हाला एक लाख रुपयांपर्यंत कर वाचवण्याची संधी आहे. 60 वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तीला आरोग्य विमा प्रीमियमवर 25,000 रुपयांपर्यंत कर सूट मिळते. 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या लोकांसाठी ही मर्यादा 50,000 रुपये आहे. Instant Loan : पर्सनल लोनसाठी आता बँकेत जायची गरज नाही; Google Pay वर झटपट मिळवा लोन बचतीचे गणित समजून घ्या जर करदात्याचे वय 60 वर्षांपेक्षा कमी असेल आणि त्याने स्वत:साठी आणि 60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या त्याच्या पालकांसाठी आरोग्य विमा पॉलिसी खरेदी केली तर, प्रीमियमवर 75 हजार रुपयांपर्यंत बचत होऊ शकते. जर करदात्याचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त असेल, तर तो स्वत:साठी आणि त्याच्या पालकांसाठी आरोग्य विम्याच्या प्रीमियमवर 1 लाख रुपयांपर्यंतचा कर वाचवू शकतो. Paytm कडून मिळतंय विना गॅरंटी 5 लाखांचं झटपट लोन, काय करावं लागले? फक्त कर बचतीसाठी पॉलिसी घेऊ नका कलम 80D अंतर्गत वैयक्तिक पॉलिसी किंवा मेडिक्लेम, फॅमिली फ्लोटर प्लॅन, क्रिटिकल इलनेस पॉलिसी, लाईफ इंश्युरन्स प्लानवर आणि आरोग्य विम्याच्या इतर प्रकारांच्या हेल्थ कव्हर योजनांवर कर लाभ मिळू शकतात. तथापि, तज्ञांचे मत आहे की आरोग्य विमा योजना केवळ कर सवलतींमुळे खरेदी करू नयेत, तर या पॉलिसींचे फायदे आणखी मोठे आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.