जाहिरात
मराठी बातम्या / मनी / लवकरच लॉन्च होणार मारुतीची नवीन एसयूव्ही, जाणून घ्या कारचे फीचर्स

लवकरच लॉन्च होणार मारुतीची नवीन एसयूव्ही, जाणून घ्या कारचे फीचर्स

मारुती टाटा पंच

मारुती टाटा पंच

फ्रोंक्स एक बलेनो-बेस्ड एसयूव्ही कूप आहे. ती हार्टेक्ट मोनोकोक प्लेटफॉर्मवर तयार करण्यात आलीये.

  • -MIN READ Local18 Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    बाजारात नवनवीन कार्स लाँच होत आहेत. अनेक बड्या कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवनवीन टेक्नॉलॉजी असलेल्या गाड्या बाजारात आणत आहेत. अशातच मारुती सुझुकी लवकरच फ्रोंक्स कॉम्पॅक्ट क्रॉसओव्हर लाँच करणार आहे. तिची किंमत या आठवड्यात जाहीर होऊ शकते. लाँच झाल्यानंतर ही कार टाटा पंच, निसान मॅग्नाइट व रेनॉ कायगरसारख्या एसयूव्हींना टक्कर देईल. यासंदर्भात ‘झी न्यूज हिंदी’ने वृत्त दिलंय.

    News18लोकमत
    News18लोकमत

    फ्रोंक्स एक बलेनो-बेस्ड एसयूव्ही कूप आहे. ती हार्टेक्ट मोनोकोक प्लेटफॉर्मवर तयार करण्यात आलीये. तिचे काही बॉडी पॅनल बलेनो हॅचबॅकसारखे आहेत. तसंच तिचा स्प्लिट हेडलँप सेटअप व मोकळा अपराइट फ्रंट ग्रँड व्हिटाराकडून घेण्यात आलाय. फॉक्स स्किड प्लेट्स व क्रोमचा वापर करून गाडीला स्पोर्टी फ्रंट व रियर बंपर्स देण्यात आलेत. साइड प्रोफाइलने 17 इंचाचे अलॉय व्हील्स दिसतात व कूप स्टाइल रूफलाइनही दिसते.

    डायमेन्शन व कलर

    या गाडीची लांबी, रुंदी आणि उंची अनुक्रमे 3995मिमी, 1550मिमी व 1765 मिमी आहे. ही गाडी 9 कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे. यात आर्कटिक व्हाइट, ऑप्युलंट रेड, स्प्लेंडिड सिल्व्हर, ग्रँडर ग्रे, नेक्सा ब्लू, अर्दन ब्राउन, ब्लॅक रूफसह स्प्लेंडिड सिल्व्हर, ब्लॅक रूफ-अर्दन ब्राउन व ब्लॅक रूफ-ऑप्युलंट रेड रंग आहेत.

    स्टँडर्ड फीचर्स

    एंट्री-लेव्हल सिग्मा व्हेरियंटमध्ये ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, की-लेस एंट्री व गो, ड्युल-टोन इंटिरिअर, फॅब्रिक सीट अपहोल्स्ट्री, पॉवर्ड विंडो, टिल्ट अॅडजस्टमेंटसह स्टीअरिंग, 60:40 रिअर सीट स्प्लिट, डुअल एयरबॅग, रिव्हर्स पार्किंग सेन्सर, रियर डिफॉगर, हिल होल्ड असिस्ट, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्रॅम, हॅलोजन प्रोजेक्टर हेडलँप व व्हील कव्हरसह स्टील व्हीलसारखी फीचर्सही मिळतील.

    Railway Track Stones: रेल्वे ट्रॅकवर का असतात टोकदार दगडं? जाणून घ्या रोचक तथ्य

    इतर फीचर्स

    या कॉम्पॅक्ट क्रॉसओव्हरमध्ये वायरलेस अँड्रॉइड ऑटो व अॅपल कारप्ले कनेक्टिव्हिटीसह 7.0-इंच स्मार्टप्ले प्रो टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम, व्हॉइस असिस्टेड फीचर्स, 6-स्पीकर साउंड सिस्टिम, इलेक्ट्रिकली अॅडजेस्टेबल विंग मिरर, वायरलेस चार्जर, रिअर एसी व्हेंट्स, सुझुकी कनेक्टेड कार फीचर्स, रिअर व्ह्यू कॅमेरा, फास्ट USB चार्जिंग पोर्ट, हेड-अप डिस्प्ले, 360 डिग्री कॅमेरा, क्रूझ कंट्रोल व लेदर रॅप्ड स्टीअरिंग व्हीलसारखी फीचर्सही असतील. ही फीचर व्हेरियंट्सच्या आधारे मिळतील.

    काय सांगता! येथे कमी वेगाने गाडी चालवणे गुन्हा, भरावा लागतो 9 हजार रुपयांचा दंड

    इंजिन

    फ्रोंक्सच्या इंजिन सेटअपमध्ये नवीन 1.0L, 3-सिलिंडर टर्बो पेट्रोल बूस्टरजेट व 1.2L, 4-सिलिंडर नॅचरली अॅस्पिरेटेड (NA) पेट्रोल युनिटचा समावेश आहे. टर्बो इंजिन 100bhp व 147.6Nm नॅचरली अॅस्पिरेटेड इंजिन 90bhp आणि 113Nm टॉर्क जनरेट करते. यात 5-स्पीड मॅन्युअल गियरबॉक्स स्टँडर्ड येतो, तसेच टर्बो इंजिनसह 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक आणि NA इंजिनसह 5-स्पीड AMT गियरबॉक्सचे ऑप्शनही उपलब्ध असतील.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात