जाहिरात
मराठी बातम्या / मनी / काय सांगता! येथे कमी वेगाने गाडी चालवणे गुन्हा, भरावा लागतो 9 हजार रुपयांचा दंड

काय सांगता! येथे कमी वेगाने गाडी चालवणे गुन्हा, भरावा लागतो 9 हजार रुपयांचा दंड

ड्रायव्हिंग स्पीड

ड्रायव्हिंग स्पीड

Traffic Rules : आपल्या देशात कमी स्पीडने गाडी चालवणं योग्य मानलं जातं. मात्र एक असे ठिकाणी जिथे 120 Kmph पेक्षा कमी स्पीडने गाडी चालवणं गुन्हा मानला जातो. एवढच नाही तर असं केल्यास तब्बल 9 हजारांचा दंडही भरावा लागतो.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 5 एप्रिल: रस्त्यावर वेगाने वाहन चालवल्यावर चालान भरावा लागतो असं तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. मात्र रोडवर कमी गतीने गाडी चालवल्यावही दंड भरावा लागू शकतो असं तुम्ही कधी ऐकलंय का? तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, एक असा रस्ता आहे ज्यावर 120 किलोमीटर प्रति तासाच्या स्पीडपेक्षा कमी गतीने गाडी चालवल्यास तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. एवढंच काय तर हे चालान फक्त 500 किंवा 1000 रुपयांच नाही तर तब्बल 8938.80 रुपयांचा दंड तुम्हाला भरावा लागेल. हा रस्ता संयुक्त अरब अमिरातीतील अबुधाबीमधील शेख मोहम्मद बिन रशीद रोड आहे. या रस्त्यावर कमाल सोबतच किमान वेगमर्यादाही निश्चित करण्यात आली आहे.

News18लोकमत
News18लोकमत

या रस्त्यावर 1 एप्रिलपासून किमान वेगमर्यादा लागू करण्यात आली आहे. त्याचे उल्लंघन करणाऱ्यांकडून सध्या चलन वसूल केले जात नाही. याबाबत सध्या वाहन चालकांमध्ये प्रबोधन करण्यात येतेय. 1 मेपासून या रस्त्यावर ताशी 120 किमीपेक्षा कमी वेगाने वाहन चालवणाऱ्यांवर दंड आकारला जाईल. यूएई पोलिसांनी गुरुवारी याबाबत माहिती दिली.

कमाल वेग 140 किमी प्रतितास असेल

अबू धाबी पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, UAE च्या प्रमुख महामार्गावरील कमाल वेग 140 किमी प्रतितास असेल आणि किमान वेग 120 किमी प्रतितास हा डावीकडून पहिल्या आणि दुसऱ्या लेनवर लागू होईल. धीम्या गतीच्या वाहनांना तिसऱ्या लेनमध्ये चालवण्यास परवानगी देण्यात आली आहे. जड वाहने रस्त्याच्या शेवटच्या लेनमध्ये धावतील आणि किमान वेगमर्यादा पाळण्याचा त्यांच्यावर कोणताही दबाव राहणार नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

Railway Track Stones: रेल्वे ट्रॅकवर का असतात टोकदार दगडं? जाणून घ्या रोचक तथ्य

पोलिस वाहन चालकांना करताय जागृक

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सेंट्रल ऑपरेशन्स सेक्टरचे डायरेक्टर मेजर जनरल अहमद सैफ बिन जैतून अल मुहारी म्हणतात की, किमान वेग लागू करण्याचा उद्देश रस्ता सुरक्षेला प्रोत्साहन देणे आहे. यामुळे संथ गतीने चालणारी वाहने त्यांच्या नेमून दिलेल्या लेनमध्ये चालतील. किमान वेगमर्यादा न पाळल्यास वाहनचालक चुकीच्या लेनमधून वाहने चालवतात, त्यामुळे अपघात होतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात