मराठी बातम्या /बातम्या /मनी /TATAची सर्वाधिक विक्री होणारी एसयुव्ही, पाहा फीचर्स आणि किंमत

TATAची सर्वाधिक विक्री होणारी एसयुव्ही, पाहा फीचर्स आणि किंमत

तुम्ही जर बजेटमध्ये चांगला मायलेज देणारी, चांगले फीचर्स असणारी व आरामदायी गाडी खरेदी करण्याचा विचार करीत असाल, तर नेक्सॉन गाडी तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे.

तुम्ही जर बजेटमध्ये चांगला मायलेज देणारी, चांगले फीचर्स असणारी व आरामदायी गाडी खरेदी करण्याचा विचार करीत असाल, तर नेक्सॉन गाडी तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे.

तुम्ही जर बजेटमध्ये चांगला मायलेज देणारी, चांगले फीचर्स असणारी व आरामदायी गाडी खरेदी करण्याचा विचार करीत असाल, तर नेक्सॉन गाडी तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई, 10 मार्च : देशात ‘एसयूव्ही’चा ट्रेंड झपाट्यानं वाढलाय. विशेषत: मध्यम आकाराच्या एसयूव्हीला अनेकांची पसंती मिळतेय. त्यातही ह्युंदाई क्रेटाची लोकप्रियता नेहमीच जास्त राहिलीय. 10.84 लाख रुपयांपासून या गाडीची किंमत सुरु होते. पण क्रेटा गाडीला आता टाटाच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या एसयूव्ही नेक्सॉननं मागं टाकलं आहे. होय, हे खरं आहे. विक्रीच्या बाबतीत नेक्सॉननं क्रेटाला मागं टाकलं आहे. या आलिशान टाटा एसयूव्हीची किंमतदेखील क्रेटापेक्षा कमी आहे. नेक्सॉन गाडीची एक्स शोरूम किंमत ही 7.80 लाख ते 14.35 लाख रुपयांपर्यंत आहे.

    टाटा नेक्सॉन हीसुद्धा एक जबरदस्त एसयूव्ही आहे. ही अनेक लेटेस्ट आणि अ‍ॅडव्हॉन्स्ड फीचर्ससह मिळते. या गाडीत अँड्रॉइड ऑटो आणि अ‍ॅपल कारप्लेसह 7-इंचांची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, एक डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, व्हॉईस कमांड, एक कूल्ड ग्लोव्ह बॉक्स, रिटर व्हेंटसह ऑटो एसी, क्रूझ कंट्रोल आणि रेन-सेन्सिंग वाइपर आदी फीचर्स आहेत. तर, टॉप मॉडेलमध्ये हवेशीर फ्रंट सीट्स, ऑटो-डिमिंग आयआरव्हीएम, 8-स्पीकर साउंड सिस्टीम, सनरूफ आणि एअर क्वालिटी डिस्प्लेसोबत प्युरिफायर आदी फीचर्स आहेत.

    यापेक्षा बेस्ट दुसरं काही आहे का? Tata NEXON ची पाहा किंमत आणि फीचर्स

    ही आहेत सेफ्टी फीचर्स

    टाटा नेक्सॉनला ग्लोबल एनसीएपी कडून 5-स्टार सेफ्टी रेटिंग मिळालंय. यात ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, ईबीडी सह एबीएस, रियर पार्किंग सेन्सर, रिअर व्ह्यू कॅमेरा, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्रॅम (ESP), टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS) आणि ISOFIX चाइल्ड-सीट अँकर यांसारखी सेफ्टी फीचर्स आहेत. क्रेटा व्यतिरिक्त नेक्सॉन ही गाडी भारतीय बाजारपेठेत किया सोनेट, महिंद्रा एक्सयूव्ही 300, मारूती सुझुकी ब्रिझा, निसान मॅग्नाइट, ह्युंडाई व्हेन्यू आदी गाडींना टक्कर देतेय.

    इंजिन आणि मायलेज

    पाच सीटर सबकॉम्पॅक्ट एसयूव्हीमध्ये पेट्रोल आणि डिझेल इंजिन दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. या गाडीत 1.2-लिटर 3-सिलेंडर टर्बो-पेट्रोल इंजिन आहे, जे 120PS पॉवर आणि 170Nm टॉर्क जनरेट करते. याशिवाय या गाडीत 1.5-लिटर 4-सिलेंडर डिझेल इंजिनदेखील मिळते, जे 110PS पॉवर आणि 260Nm पीक टॉर्क निर्माण करते. दोन्ही इंजिन 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन किंवा 6-स्पीड एएमटी शी जोडले जातात. कंपनीचा दावा आहे की, ही कार 24 किलोमीटर प्रतिलिटरपर्यंत मायलेज देते.

    First published:
    top videos

      Tags: Vehicles