मुंबई : टाटा नेक्सॉन ही सेगमेंटमध्ये सर्वाधिक विक्री होणारी एसयूव्ही आहे. सध्या बाजारपेठेत याची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गेल्या फेब्रुवारी महिन्यात, मारुती ब्रेझा नंतर देशातील सर्वाधिक विक्री होणारी दुसरी SUV होती. आता कंपनी अनेक मोठे बदल करून फेसलिफ्ट मॉडेलमध्ये सादर करण्याच्या तयारीत आहे. (प्रातिनिधीक फोटो)
कंपनी नव्या लूकमध्ये दोन्ही बाजूला काही बदल करण्याची शक्यता आहे. ऑटो एक्स्पोमध्ये कंपनीने आपलं नवीन मॉडेल सादर केलं होतं. (प्रातिनिधीक फोटो)
10.25 इंच टच स्क्रीन इंफोटेंमेंट सिस्टम लेन्स देखील या कारला लावण्यात आले आहेत. याशिवाय ग्राहकांसाठी खास नवीन फीचर्स देखील यामध्ये असणार आहेत. (प्रातिनिधीक फोटो)
ही गाडी पाहूनच तुम्ही त्याच्या प्रेमात पडाल असा दावा कंपनीने केला आहे. 1.2 लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन 125hp पावर आणि 225Nm टॉर्क जनरेटर करण्याची क्षमता असल्याचा दावा कंपनीने केला आहे.
Tata Nexon फेसलिफ्ट लाँच करण्याबाबत कोणतीही टाइमलाइन शेअर केलेली नाही. या गाडीची सध्या चाचणी सुरू आहे.(प्रातिनिधीक फोटो)
ही कार कंपनी पुढील वर्षात बाजारात लॉन्च करू शकते. सध्याचे मॉडेल चांगले प्रदर्शन करत आहे, गेल्या फेब्रुवारी महिन्यात मारुती ब्रेझा नंतर देशातील दुसरी सर्वाधिक विक्री होणारी SUV बनली आहे. (प्रातिनिधीक फोटो)
नवीन अपडेटनंतर, त्याची किंमत थोडी वाढू शकते, सध्याच्या मॉडेलची किंमत 7.80 लाख रुपयांपासून सुरू होते.(प्रातिनिधीक फोटो)