मराठी बातम्या /बातम्या /मनी /

एका महिन्यात 107% उसळलेला टाटा ग्रुपचा 'हा' स्टॉक जोरात का कोसळला?

एका महिन्यात 107% उसळलेला टाटा ग्रुपचा 'हा' स्टॉक जोरात का कोसळला?

, टाटा स्टील मायनिंग आणि एस अँड टी मायनिंग या कंपन्या टाटा स्टीलमध्ये विलीन करण्याचा निर्णय घेतला आहे.

, टाटा स्टील मायनिंग आणि एस अँड टी मायनिंग या कंपन्या टाटा स्टीलमध्ये विलीन करण्याचा निर्णय घेतला आहे.

, टाटा स्टील मायनिंग आणि एस अँड टी मायनिंग या कंपन्या टाटा स्टीलमध्ये विलीन करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई : गेल्या एका वर्षापासून मल्टिबॅगर रिटर्न देणाऱ्या टाटा ग्रूपच्या (Tata Group) टीआएफ लिमिटेड (TRF Limited Share Price) या मेटल स्टॉकच्या तेजीवर शुक्रवारी (23 सप्टेंबर) ब्रेक लागला. गुरुवारी (22 सप्टेंबर) आपला 52 आठवड्यांचा नवा उच्चांक गाठणाऱ्या या शेअरची शुक्रवारी जोरदार विक्री झाली आणि शेअरमध्ये लोअर सर्किट लागलं.

टीआरएफचा शेअर शुक्रवारी 4.99 टक्क्यांनी घसरून 356.65 रुपयांवर बंद झाला. गुरुवारी त्याची किंमत 357.40 रुपये होती. टाटा समूहाच्या आणखी 6 कंपन्यांसह टीआरएफदेखील टाटा स्टीलमध्ये (Tata Steel) विलीन करण्याच्या बातम्यांनंतर टीआरएफच्या शेअरच्या भावामध्ये मोठी घसरण झाली आहे.

टाटा स्टीलच्या बोर्डाने गुरुवारी टाटा समूहाच्या 7 कंपन्यांचं टाटा स्टीलमध्ये विलिनीकरण करण्यास मान्यता दिली होती. या वृत्तानंतर टाटा स्टीलचा शेअर शुक्रवारी 1.50 टक्क्यांनी वाढला. टाटा स्टीलने टाटा स्टील लाँग प्रॉडक्ट, टाटा मेटलिक्स, टिन प्लेट कंपनी, टीआरएफ, इंडियन स्टील अँड वायर प्रॉडक्ट, टाटा स्टील मायनिंग आणि एस अँड टी मायनिंग या कंपन्या टाटा स्टीलमध्ये विलीन करण्याचा निर्णय घेतला आहे.

एकापेक्षा जास्त Bank Account असणं कसं फायद्याचं? तज्ज्ञांनी सांगितली महत्त्वाची गोष्ट

दिलाय मल्टिबॅगर रिटर्न

टीआरएफच्या स्टॉकमध्ये सलग 5 सत्रांत अपर सर्किट लागल्यानंतर शुक्रवारी स्टॉकच्या दरामध्ये मोठी घसरण झाली. मार्केट सुरू होताच या शेअरमध्ये लोअर सर्किट लागला. गेल्या एका महिन्यात हा शेअर 107% वाढला आहे. त्याचप्रमाणे, गेल्या 6 महिन्यांत या शेअरने गुंतवणूकदारांना सुमारे 147 टक्के रिटर्न दिला आहे. 2022 मध्ये आतापर्यंत हा शेअर 160 टक्क्यांनी वाढला आहे. एका वर्षात या शेअरने गुंतवणूकदारांना 186 टक्के नफा दिला आहे.

टाटा मेटलिक्सची जोरदार विक्री

विलीनीकरणाच्या वृत्तानंतर टाटा समूहाच्या टाटा मेटलिक्स या आणखी एका शेअरचीही जोरदार विक्री झाली. शुक्रवारी मार्केट उघडल्यानंतर सुरुवातीला शेअर घसरला आणि शेवटपर्यंत तो 4.86 टक्क्यांनी घसरला आणि 764.90 रुपयांवर बंद झाला. एका वर्षात टाटा मेटलिक्सच्या शेअरमध्ये तब्बल 24 टक्क्यांची घसरण झाली आहे.

टाटा स्‍टीलचा मर्जर प्‍लान काय आहे?

टाटा समूहाने मेगा मर्जर प्लानची घोषणा केली आहे. यानुसार समूहातल्या 7 कंपन्यांचे टाटा स्टील कंपनीमध्ये विलिनीकरण करण्यात येणार आहे. या सातही कंपन्या मेटल व्यवसायाशी संबंधित आहेत. विलिनीकरणाचा उद्देश व्यवसाय आणि मॅनेजमेंट स्ट्रक्चर सुधारून ते सुलभ करणं, सर्व कंपन्यांच्या क्षमता आणि संधी एकत्र आणून त्यांचा जास्तीत जास्त फायदा घेणं हा आहे. स्टील आणि TRF चा स्वॅप रेशो 17 ते 10 असेल. याचा अर्थ 10 TRF शेअर्सवर टाटा स्टीलचे 17 शेअर्स मिळतील. टाटा स्टील लाँग प्रॉडक्टच्या 10 शेअर्ससाठी टाटा स्टीलचे 67 शेअर्स मिळतील. टिन प्लेटच्या 10 शेअर्ससाठी, टाटा स्टीलचे 33 शेअर्स मिळतील. टाटा मेटलिक्सच्या 10 शेअर्समागे टाटा स्टीलचे 79 शेअर्स मिळतील.

First published:

Tags: Liquor stock, Stock exchanges, Stock Markets