Home /News /money /

जगातील सर्वात सक्षम हॉटेल ब्रँड म्हणून 100 वर्षांची परंपरा असलेल्या टाटा ग्रुपच्या 'Taj' हॉटेल्सची निवड

जगातील सर्वात सक्षम हॉटेल ब्रँड म्हणून 100 वर्षांची परंपरा असलेल्या टाटा ग्रुपच्या 'Taj' हॉटेल्सची निवड

Tata Group Taj Hotel: ताज देशातील एक प्रसिध्द हॉटेल. तसं पाहायला गेलं तर ताज हॉटेलला (Taj Hotel) 100 वर्षांचा रोचक असा इतिहास आहे.

नवी दिल्ली, 28 जून: ताज देशातील एक प्रसिध्द हॉटेल. तसं पाहायला गेलं तर ताज हॉटेलला (Taj Hotel) 100 वर्षांचा रोचक असा इतिहास आहे. टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा (Jamshedji Tata) यांनी त्याकाळी आधुनिक भारतचं स्वप्न पाहिलं होतं. हे केवळ स्वप्न नव्हतं तर त्यासाठी त्यांनी मोठं योगदानही दिलं आहे. ताज हॉटेल्स हे या स्वप्नांचा एक भाग. मुंबईतील (Mumbai) गेट वे ऑफ इंडियासमोर 1903 मध्ये हे ताज हॉटेल सुरु झालं. पण ही सुरुवात नक्कीच अगदी सहज झालेली नाही. त्यामागे रंजक आणि प्रेरणादायी कहाणी आहे. जाणून घेऊया कशी झाली `ताज`ची पायाभरणी... आज तक ने दिलेल्या वृत्तानुसार, `ताज` हा टाटा समूहाच्या (Tata Group) इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेडचा एक ब्रँड (Brand) आहे. नुकताच जगातील सर्वात सक्षम हॉटेल ब्रँड म्हणून `ताज`ची निवड करण्यात आली आहे. ब्रिटनमधील ब्रँड व्हॅल्युएशन कन्सलटन्सीने (Brand Valuation Consultancy) आपला वार्षिक हॉटेल्स 50 2021 (‘Hotels 50 2021' report) हा अहवाल प्रसिध्द केला आहे. या अहवालात टाटा समूहाच्या या हॉटेल्स ब्रँडला जगातील सर्वात सक्षम हॉटेल ब्रँड असे संबोधले गेले आहे. मात्र या हॉटेलच्या स्थापनेमागील कहाणी प्रेरणादायी अशी म्हणता येईल. हे हॉटेल सुरु करुन जमशेदजी टाटा यांनी अपमानाचा बदला घेतला. सर्वात अनोखी गोष्ट म्हणजे ब्रिटीशांनी (British) केलेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी सुरु केलेले हे हॉटेल्स आज जगातील सर्वात सक्षम हॉटेल्स ब्रँड असल्याचं संबोधत खुद्द ब्रिटिशांनी या ब्रँडचा गौरव केला आहे. हेही वाचा- 26/11 मधील शहीद तुकाराम ओंबाळे यांचा आगळावेगळा सन्मान अशी आहे कहाणी टाटा समूहाचे संस्थापक जमशेदजी टाटा यांनी आधुनिक भारतासाठी अनेक स्वप्न पाहिली होती. त्यापैकी ताज हॉटेल हे एकमेव स्वप्न आहे की जे त्यांच्या हयातीत पूर्ण झाले. देशातील पहिले ताज हॉटेल 1903 मध्ये मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे सुरु झाले. टाटा समुहाच्या वेबसाईटवरील माहितीनुसार, जमशेदजी टाटा यांना त्यांच्या एका विदेशी मित्राने मुंबईतील एका प्रसिध्द हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलावले. परंतु, ते जेव्हा आपल्या मित्रासोबत त्या हॉटेलमध्ये पोहोचले तेव्हा हॉटेलच्या मॅनेजरने त्यांना दरवाज्यातच रोखले आणि आम्ही भारतीयांना आत येण्याची परवानगी देत नाही, असे सुनावले. त्याकाळी बऱ्याच ब्रिटिश हॉटेल्समध्ये वर्णभेद केला जात असे. ही घटना टाटा यांच्या जिव्हारी लागली. त्यानंतर त्यांनी ताजची उभारणी सुरु केली. केवळ ताज हॉटेलचा वारसा त्याला उत्कृष्ट बनवत नाही तर हॉटेल मजबूतपणे आजही उभं आहे ही बाब त्याच्या वैभवाचा एक भाग ठरते. 2008 मध्ये जेव्हा 26/11 ला मुंबईवर हल्ला झाला, त्याचा हे हॉटेलदेखील साक्षीदार आहे. केवळ पाहुण्यांची नाहीतर कर्मचाऱ्यांची देखील काळजी घेणे, ही ताजची परंपरा आहे. `ताज` या ब्रँडविषयी ब्रँड फायनान्सचे सीईओ डेव्हिड हेग म्हणतात की, ताज हॉटेल्सला 100 वर्षांची परंपरा आहे. सध्या महामारीमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत असतानाही भारतीय हॉस्पिटॅलिटीसाठी (Indian Hospitality) हे हॉटेल भक्कमपणे उभे आहे. हेही वाचा- डेल्टा प्लस व्हेरिएंटवर कशी कराल मात?, वाचा 62 वर्षीय रुग्णाचा अनुभव ताज हॉटेल्सला नुकताच जो सन्मान मिळाला त्याबाबत आयसीएचएलचे एमडी आणि सीईओ पुनीत चटवाल यांनी सांगितले की, जागतिक मंचावर झालेलं कौतुक ही भारतीय हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीसाठी अभिमानास्पद बाब आहे. आमच्याप्रती आमच्या ग्राहकांनी व पाहुण्यांनी दाखवलेला हा विश्वास आहे.
Published by:Pooja Vichare
First published:

Tags: Ratan tata, Waah taj

पुढील बातम्या