मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

ठाण्यात सापडलेल्या कोळ्याच्या नव्या जातीला शहीद तुकाराम ओंबाळे यांचं नाव

ठाण्यात सापडलेल्या कोळ्याच्या नव्या जातीला शहीद तुकाराम ओंबाळे यांचं नाव

26/11 braveheart cop Tukaram Omble:  महाराष्ट्रात सापडलेल्या कोळ्याच्या एका नव्या जातीला (New Species of Spider) शहीद तुकाराम ओंबाळे यांचं नाव देण्यात आलं आहे.

26/11 braveheart cop Tukaram Omble: महाराष्ट्रात सापडलेल्या कोळ्याच्या एका नव्या जातीला (New Species of Spider) शहीद तुकाराम ओंबाळे यांचं नाव देण्यात आलं आहे.

26/11 braveheart cop Tukaram Omble: महाराष्ट्रात सापडलेल्या कोळ्याच्या एका नव्या जातीला (New Species of Spider) शहीद तुकाराम ओंबाळे यांचं नाव देण्यात आलं आहे.

ठाणे, 28 जून: 26/11 चा मुंबईवरचा दहशतवादी हल्ला कोणीही विसरणं शक्य नाही. तसंच  तुकाराम ओंबाळे, हेमंत करकरे, विजय साळसकर, अशोक कामटे या पोलीस अधिकाऱ्यांचं बलिदानही कायम सर्वांच्या स्मरणात राहील. स्मारकाबरोबरच या अधिकाऱ्यांच्या नावाने विविध उपक्रम राबवून त्यांच्या स्मृती जतन केल्या जात आहेत. महाराष्ट्रात सापडलेल्या कोळ्याच्या एका नव्या जातीला (New Species of Spider) शहीद तुकाराम ओंबाळे यांचं नाव देण्यात आलं आहे. 'इंडिया टुडे'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

Indian Spiders अर्थात भारतीय कोळ्यांच्या जाती-प्रजातींवर संशोधन करणारे ध्रुव प्रजापती यांनी महाराष्ट्रात सापडलेल्या कोळ्यांच्या दोन नव्या जातींची आणि त्यांच्या शास्त्रीय नामकरणाबद्दलची (Scientific Nomenclature and Classification) माहिती काल (27 जून) ट्विटरवर जाहीर केली. त्यापैकी एका जातीला (Species) शहीद तुकाराम ओंबाळे यांच्या स्मरणार्थ Icius tukarami (इशियस तुकारामी) असं नाव देण्यात आलं आहे. या जातीचा कोळी ठाण्यात (Thane) सापडला असल्याचं ध्रुव प्रजापती यांनी म्हटलं आहे. 'शहीद तुकाराम ओंबाळे यांनी कसाबला (Kasab) जिवंत पकडण्यात महत्त्वाची भूमिका निभावली आणि स्वतःच्या अंगावर 23 गोळ्या झेलल्या. त्यांच्या स्मरणार्थ कोळ्याच्या या नव्या जातीला त्यांचं नाव देण्यात येत आहे,' असं ध्रुव प्रजापती यांनी लिहिलं आहे. पीएचडी करत असलेले निसर्गप्रेमी ध्रुव प्रजापती (Dhruv Prajapati) यांनी ट्विटरवरच्या 'बायो'मध्ये भारतीय सशस्त्र सैन्यदलांचा चाहता असल्याचंही आवर्जून लिहिलं आहे.

हेही वाचा- डेल्टा प्लस व्हेरिएंटवर कशी कराल मात?, वाचा 62 वर्षीय रुग्णाचा अनुभव

दुसऱ्या नव्या जातीचा कोळी ठाणे आणि मुंबईतल्या आरे मिल्क कॉलनी (Aarey Milk Colony) परिसरात आढळल्याचं प्रजापती यांनी म्हटलं आहे. प्रजापती यांनी आपला मित्र कमलेश चोळके (Kamlesh Cholke) यांच्या स्मरणार्थ दुसऱ्या जातीच्या कोळ्याला Phintella cholkei (फिन्टेला चोळकी) असं शास्त्रीय नाव दिल्याचं सांगितलं.

रिसर्चगेट डॉट नेट (Researchgate.net) नावाच्या वेबसाइटवर याबद्दलचा रिसर्च पेपर उपलब्ध आहे. ध्रुव प्रजापती यांच्यासह सोमनाथ कुंभार (Somnath Kumbhar), जॉन सेलेब (John Celeb), राजेश सानप (Rajesh Sanap) या चार जणांनी हे संशोधन करून रिसर्च पेपर प्रसिद्ध केला आहे.

हेही वाचा- रोग प्रतिकारशक्तीच्या गोळ्या सांगून दिलं विष, तिघांचा मृत्यू

सहायक पोलीस उपनिरीक्षक असलेल्या तुकाराम ओंबाळे यांनी 26/11च्या हल्ल्यावेळी पळून जात असलेले दहशतवादी अजमल कसाब आणि इस्माइल खान यांना गिरगाव चौपाटीजवळ अडवलं. त्यांच्या या कार्यामुळे पोलिसांच्या दुसऱ्या टीमला कसाबला घेरणं आणि त्याला जिवंत पकडणं शक्य झालं. ओंबाळे यांनी कसाबच्या समोर उभं ठाकून 23 गोळ्या अंगावर झेलल्या. त्यामुळे बाकीच्या पोलिसांचे प्राण वाचू शकले. त्यांच्या या शौर्याबद्दल त्यांना अशोक चक्र हा सर्वोच्च पुरस्कार मरणोत्तर प्रदान करण्यात आला.

First published:

Tags: 26/11 mumbai attack