जाहिरात
मराठी बातम्या / मनी / सुप्रीम कोर्टाचा IHH आणि फोर्टिसला मोठा दणका, नेमकं काय प्रकरण वाचा सविस्तर

सुप्रीम कोर्टाचा IHH आणि फोर्टिसला मोठा दणका, नेमकं काय प्रकरण वाचा सविस्तर

सुप्रीम कोर्टाचा IHH आणि फोर्टिसला मोठा दणका, नेमकं काय प्रकरण वाचा सविस्तर

सुप्रीम कोर्टाकडून IHH आणि फोर्टिसच्या डीलवर स्थगिती, नेमकं काय प्रकरण वाचा सविस्तर

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

असीम मनचंदा, प्रतिनिधी मुंबई : फोर्टिस आणि IHH ला सुप्रीम कोर्टाने मोठा दणका दिला आहे. कोर्टाने IHH च्या ओपन ऑफरला रोखलं आहे. दिल्ली हायकोर्ट याबाबत अंतिम निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता फोर्टिसचं काय होणार असा प्रश्न आहे. IHH आणि फोर्टिससाठी हा मोठा धक्का असल्याची चर्चा आहे. दिल्ली हायकोर्ट फॉरेन्सिक ऑडिट करण्याबाबत विचार करावा. त्यानंतर IHH आणि फोर्टिसच्या डीलवर निर्णय होऊ शकतो अशी आता माहिती मिळाली आहे. दिल्ली हायकोर्टाच्या निर्णयावर डील अवलंबून असणार आहे. त्यामुळे फोर्टिसचं टेन्शन वाढलं आहे. या प्रकऱणी सुप्रीम कोर्टाने कोर्टाच्या आदेशाचा अवमान केल्या प्रकरणी सिंह बंधूंना ६ महिन्यांची शिक्षा सुनावली आहे. हे वाचा- US फेडर रिजर्व्हकडून सलग तिसऱ्यांदा व्याजदरात वाढ, आशियातील बाजारपेठेवर मोठा परिणाम काय आहे प्रकरण? फोर्टिस हॉस्पिटल हे अनेक अडचणींचा सामना करत आहे. मलेशियाच्या IHH कंपनीने २०१८ मध्ये फोर्टिसची भागीदारी घेतली होती. नियामानुसार या कंपनीने केवळ २६ टक्के ओपन ऑफर देऊन भागीदारी घेणं गरजेचं होतं. मात्र त्याऐवजी ३१ टक्के भागीदारी घेतली. दाईची यांनी या डील न्यायालयात नेलं. तिथे या कराराला विरोध दर्शवला. दिल्ली हायकोर्ट आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टात हे प्रकरण गेलं. कंपनीने आपले ३६०० कोटी रुपये वसूल करण्यासाठी न्यायालयाचं दार ठोठावलं. या ऑफरला सुप्रीम कोर्टानं स्थगित केलं. सुप्रीम कोर्टात यावर सुनावणी सुरू होती. कोर्टानं निर्णय सुरक्षित ठेवला आहे. या प्रकरणामुळे शेअर बाजारातही फोर्टिसला मोठा धक्का सहन करावा लागला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात