मराठी बातम्या /बातम्या /मनी /शेतकऱ्याचं भन्नाट जुगाड! अख्ख्या गावाला मोफत होतोय गॅस अन् वीज पुरवठा

शेतकऱ्याचं भन्नाट जुगाड! अख्ख्या गावाला मोफत होतोय गॅस अन् वीज पुरवठा

शेतकऱ्याचं भन्नाट जुगाड! अख्ख्या गावाला मोफत होतोय गॅस अन् वीज पुरवठा

शेतकऱ्याचं भन्नाट जुगाड! अख्ख्या गावाला मोफत होतोय गॅस अन् वीज पुरवठा

गगनदीप यांनी आपल्या गावात 140 घनमीटर क्षमतेचा भूमिगत बायोगॅस प्लांट तयार केला आहे. या बायोगॅस प्लांटच्या माध्यमातून ते गावाला मोफत इंधन आणि वीजपुरवठा करत आहेत.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई, 5 जानेवारी: स्वयंपाकासाठी वापरल्या जाणाऱ्या एलपीजी सिलिंडरच्या किमतींमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सिलिंडरची किंमत पुन्हा वाढवण्यात आली आहे. एलपीजीची वाढती मागणी बघता भविष्यात त्याचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. ही सर्व सामान्य नागरिकांसाठी मोठी चिंतेची बाब आहे. पंजाबमधल्या एका शेतकऱ्याने यावर एक उपाय शोधून काढला आहे. या शेतकऱ्याच्या प्रयोगामुळे संपूर्ण गावालाच जेवण शिजवण्याचा खर्च येत नाही. दर महिन्याला एलपीजी सिलिंडरवर होणाऱ्या खर्चात बचत होत आहे. गगनदीप सिंग असं या शेतकऱ्याचं नाव आहे. गगनदीप पंजाबमधल्या रूपनगरचे रहिवासी आहेत. त्यांनी आपल्या गावात 140 घनमीटर क्षमतेचा बायोगॅस प्लांट स्थापन केला आहे.

    गगनदीप यांनी आपल्या गावात 140 घनमीटर क्षjमतेचा भूमिगत बायोगॅस प्लांट तयार केला आहे. या प्लांटमधून त्यांनी गावातल्या प्रत्येक घराला पाइपलाइनद्वारे गॅस कनेक्शन दिलं आहे. या गॅसच्या माध्यमातून संपूर्ण गावातल्या नागरिकांचा अन्न शिजवण्याचा खर्च वाचला आहे. बायोगॅस प्लांटच्या माध्यमातून ते गावाला मोफत इंधन आणि वीजपुरवठा करत आहेत. प्रत्येक घराला दिवसातून तीन वेळा दोन तास गॅस पुरवठा केला जातो.

    हेही वाचा: SBI ग्राहकांसाठी गुडन्यूज! तुमची अर्धी कामं होणार एक फोनवर

    प्लांटजवळ असलेल्या घरांसाठी ही सुविधा 24 तास उपलब्ध आहे. गगनदीप यांच्या या उपक्रमाचं गावात मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. गावकऱ्यांनी सांगितलं, की लॉकडाउनमध्ये गॅस सिलिंडर मिळविण्यासाठी त्यांना खूप त्रास झाला. आता त्यांना कोणत्याही एलपीजी सिलिंडरची गरज नाही. आता सर्व घरांमध्ये स्वयंपाक मोफत शिजवला जात आहे.

    गगनदीप यांच्या पॉवर प्लांटशेजारी एक डेअरी आहे. बायोगॅस पॉवर प्लांट डेअरीच्या दोन्ही बाजूच्या नाल्यांशी जोडलेला आहे. या नाल्यांच्या माध्यमातून गाईंचं मलमूत्र पाण्यासोबत वाहत येऊन प्लांटमध्ये पोहोचतं. प्लांटमध्ये तयार होणारा वायू पाइपमधून वर येतो आणि खाली राहिलेलं शेण खतात रूपांतरित होतं. हे खतदेखील गावातल्या शेतकऱ्यांना वाटलं जात आहे.

    देशभरातले अनेक शेतकरी शेतीसोबत पशुपालनाचाही व्यवसाय करतात. त्यामुळे पाळलेल्या गायी-म्हशींपासून मिळणाऱ्या मल-मूत्राचं प्रमाणही मोठं असतं. त्याचा वापर करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी किंवा नवउद्योजकांनी बायोगॅस निर्मिती केली तर स्वसंपाकाच्या गॅसचा प्रश्न सुटू शकतो. म्हणून गगनदीप सिंग यांच्याकडे आता एक आदर्श म्हणून बघितलं जात आहे.

    First published:

    Tags: Farmer, Gas