मराठी बातम्या /बातम्या /मनी /मुलीच्या भविष्यासाठी रोजचा खर्च कमी करून 'या' योजनेत करा बचत

मुलीच्या भविष्यासाठी रोजचा खर्च कमी करून 'या' योजनेत करा बचत

सुकन्या योजना

सुकन्या योजना

आज आम्ही तुम्हाला अशाच एका योजनेबद्दल सांगणार आहोत, जी आरोग्यासाठी हानिकारक असलेल्या पान-गुटख्यावरचा खर्च कमी करून तुम्ही एखाद्याचं भविष्य घडवण्यात मदत करु शकते.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  मुंबई 12 जानेवारी : थेंबे थेंबे तळे साचे अशी म्हण आहे. या म्हणीचा वापर प्रत्यक्ष जीवनात केला, तर भविष्याची चिंता करण्याची गरज भासणार नाही. सिगारेट, पान-गुटखा यांसारखी व्यसनं किंवा अन्यही अनेक प्रकारच्या रोजच्या अनावश्यक खर्चात कपात केली तर बचतीच्या माध्यमातून मोठा निधी तयार होऊ शकतो. हेअर कट करण्यासाठी महिन्यातून चार वेळा सलूनमध्ये जात असाल तर त्याऐवजी दोन वेळाच जावं. अशा पद्धतीने काही खर्च कमी करता येऊ शकतो. अशा पद्धतीने बचत करून तुम्ही 15 लाखच काय अगदी 65 लाख रुपयांपर्यंत निधी जमवू शकता.

  आज आम्ही तुम्हाला अशाच एका योजनेबद्दल सांगणार आहोत, जी आरोग्यासाठी हानिकारक असलेल्या पान-गुटख्यावरचा खर्च कमी करून तुम्ही एखाद्याचं भविष्य घडवण्यात मदत करु शकते. सुकन्या समृद्धी योजना अर्थात एसएसवाय असं या योजनेचं नाव आहे. मुलींचं आर्थिक भविष्य सुरक्षित करण्यासाठी एसएसवाय ही सर्वांत लोकप्रिय अल्पबचत योजना आहे. एसएसवाय खातं मुलींच्या पालकांपैकी कोणीही किंवा कायदेशीर पालकांद्वारे चालवता येतं.

  हे ही वाचा : Credit Card वापरणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर कर्जाची परतफेड कोण करतं?

  रोज 100 रुपयांची बचत देईल 15 लाख रुपये

  मुलगी 15 वर्षांची होईपर्यंत एसएसवायच्या अकाउंटमध्ये बचत करावी लागते, असा गैरसमज अनेक पालकांमध्ये आहे. याबाबतचा नेमका नियम काय ते जाणून घेऊ. 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीसाठी सुकन्या समृद्धी योजनेतर्गत अकाउंट उघडता येतं.

  रोज 100 रुपयांची बचत करून मुलीसाठी 15 लाख रुपयांचा निधी उभारू शकता. हा निधी तिच्या चांगल्या भविष्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरेल.

  एसएसवाय अकाउंटमध्ये किती कालावधीपर्यंत बचत करता येते?

  सुकन्या समृद्धी योजना 2019नुसार, एसएसवाय अकाउंट उघडल्याच्या तारखेपासून 15 वर्षांपर्यंत त्यात बचत करता येते. उदाहरणार्थ, तुम्ही जर मुलगी नऊ वर्षाची असताना तिच्या नावाने एसएसवाय अकाउंट उघडलं, तर तुम्ही 15 वर्षं म्हणजेच ती 24 वर्षांची होईपर्यंत या अकाउंटमध्ये पैसे भरू शकता.

  मॅच्युरिटीसंदर्भात असा आहे नियम

  एसएसवाय 2019च्या नियमानुसार, अकाउंट उघडल्याच्या तारखेपासून पंधरा वर्षांचा कालावधी पूर्ण होईपर्यंत या अकाउंटमध्ये बचत करता येते. एसएसवायचं ठेव खातं सुरू केल्याच्या तारखेपासून 21 वर्षांनी ते मॅच्युअर होतं. याचा अर्थ मुलगी नऊ वर्षांची झाल्यावर अकाउंट सुरू केलं, तर 21 वर्षांनी म्हणजेच मुलगी 30 वर्षांची झाल्यावर ते अकाउंट मॅच्युअर होईल.

  एसएसवाय अकाउंट कधीपर्यंत ऑपरेट करू शकता?

  ठेवीदारांनी हे लक्षात घेतलं पाहिजे, की मुलगी 18 वर्षाची होईपर्यंत एसएसवाय अकाउंट पालक किंवा कायदेशीर पालक ऑपरेट करू शकतात. मुलीला 18 वर्षं झाल्यानंतर अकाउंट होल्डर स्वतः आवश्यक कागदपत्रं सादर करून अकाउंट ऑपरेट करू शकते.

  अकाउंट बंद करण्याचे नियम कोणते?

  अकाउंट होल्डरने विवाह किंवा इतर कोणत्याही कारणामुळे अकाउंट बंद करण्यासाठी अर्ज केल्यास, 21 वर्षं पूर्ण होण्यापूर्वी म्हणजेच मुदतपूर्व एसएसवाय अकाउंट बंद करण्यास परवानगी आहे. याशिवाय अकाउंट होल्डरच्या शिक्षणाच्या उद्देशाने एसएसवाय अकाउंटमधली 50 टक्क्यांपर्यंत रक्कम काढण्याची परवानगीदेखील आहे.

  First published:
  top videos

   Tags: Father, Investment, Money, Personal banking, Savings and investments, Viral