मराठी बातम्या /बातम्या /मनी /

'या' योजनेद्वारे दररोज केवळ 1 रुपयाची गुंतवणूक करा आणि बनवा 15 लाखांचा फंड

'या' योजनेद्वारे दररोज केवळ 1 रुपयाची गुंतवणूक करा आणि बनवा 15 लाखांचा फंड

सुकन्या समृद्धी योजनेत केवळ 250 रुपयांपासून अकाउंट सुरू केलं जाऊ शकतं.

सुकन्या समृद्धी योजनेत केवळ 250 रुपयांपासून अकाउंट सुरू केलं जाऊ शकतं.

सुकन्या समृद्धी योजनेत केवळ 250 रुपयांपासून अकाउंट सुरू केलं जाऊ शकतं.

नवी दिल्ली, 27 जून : तुम्ही गुंतवणुकीचं (Investment) नियोजन करत असाल, तर आज आम्ही तुम्हाला अशा एका शासकीय योजनेविषयी सांगणार आहोत, की ज्या माध्यमातून तुम्ही कमीत कमी गुंतवणूक करून मोठी रक्कम जमा करू शकता. या शासकीय योजनेचं नाव सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana) असं आहे. या योजनेद्वारे तुम्ही तुमच्या मुलीचं भविष्य सुरक्षित करू शकता. तसंच गुंतवणुकीसाठी योग्य पर्याय निवडल्याने तुम्हाला आयकरातही सूट मिळू शकते. या योजनेचा लाभ दररोज केवळ 1 रुपयाची गुंतवणूक करूनही घेता येऊ शकतो. जाणून घेऊ या योजनेची सविस्तर माहिती...

सुकन्या समृद्धी योजना काय आहे?

सुकन्या समृद्धी योजना ही लहान मुलींसाठी (Girl Child) केंद्र सरकारने (Central Government) सुरू केलेली छोटीशी बचत योजना आहे. ही योजना बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेअंतर्गत सुरू करण्यात आली. लहान बचत योजनांमध्ये सुकन्या समृद्धी योजना सर्वांत चांगला व्याज दर (Interest Rate) देणारी योजना आहे.

किती रुपयांपासून केली जाऊ शकते गुंतवणूक?

सुकन्या समृद्धी योजनेत केवळ 250 रुपयांपासून अकाउंट सुरू केलं जाऊ शकतं. याचाच अर्थ असा, की रोज एक रुपयाची बचत करूनही तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. कोणत्याही एका आर्थिक वर्षात किमान 250 रुपये या योजनेत जमा करणं गरजेचं आहे. कोणत्याही एका आर्थिक वर्षात एसएसवाय (SSY) खात्यात एका वेळी किंवा अनेक वेळा मिळून 1.5 लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा करता येणार नाही.

FD मधून जबरदस्त कमाईची संधी! बँक आणि पोस्ट ऑफिसपेक्षाही मिळेल अधिक व्याज

व्याज किती मिळतं?

सध्या 'एसएसवाय'मध्ये 7.6 टक्के दराने व्याज दिलं जातं. तसंच आयकरातूनदेखील (Income Tax) सूट मिळते. यापूर्वी या योजनेतून 9.2 टक्के व्याज मिळत होते. वयाच्या 8व्या वर्षानंतर मुलीच्या उच्च शिक्षणाच्या खर्चासाठी 50 टक्क्यांपर्यंत रक्कम या योजनेतून काढता येते.

मॅच्युरिटीनंतर 15 लाखांपेक्षा अधिक रक्कम

समजा, तुम्ही या योजनेत प्रतिमहिना 3000 रुपये गुंतवणूक करत असाल, तर वर्षाला 36,000 रुपये जमतील. तुम्हाला 7.6 टक्के प्रतिवर्ष चक्रवाढ व्याजानुसार एकूण 14 वर्षांच्या कालावधीत 9,11,574 रुपये मिळतील. 21व्या वर्षी म्हणजे मॅच्युरिटीनंतर (Maturity) ही रक्कम सुमारे 15,22,221 रुपये होईल. सध्या एसएसवायमध्ये 7.6 टक्के व्याज दिलं जातं.

कसं सुरू कराल खातं?

सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत खातं पोस्ट ऑफिस किंवा सरकारी किंवा कमर्शिअल बॅंकेच्या शाखेत सुरू करता येतं. या योजनेनुसार मुलीच्या जन्मानंतर तिच्या वयाच्या 10व्या वर्षापर्यंत किमान 250 रुपये भरून खातं सुरू केलं जाऊ शकतं. एका आर्थिक वर्षात सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये तुम्ही जमा करू शकता. सुकन्या समृद्धी योजनेचं खातं एकदा सुरू केल्यानंतर मुलगी 21 वर्षांची होईपर्यंत किंवा वयाच्या 18 व्या वर्षानंतर तिचा विवाह होईपर्यंत सुरू ठेवता येऊ शकतं.

First published:

Tags: Investment, Money