मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Sukanya Samriddhi Yojana: सुकन्या समृद्धी योजनेच्या नियमात बदल, जुळ्या मुली असल्यास दोघींना मिळणार लाभ

Sukanya Samriddhi Yojana: सुकन्या समृद्धी योजनेच्या नियमात बदल, जुळ्या मुली असल्यास दोघींना मिळणार लाभ

Sukanya Samriddhi Yojana: सुकन्या समृद्धी योजनेच्या नियमात बदल, जुळ्या मुली असल्यास दोघींना मिळणार लाभ

Sukanya Samriddhi Yojana: सुकन्या समृद्धी योजनेच्या नियमात बदल, जुळ्या मुली असल्यास दोघींना मिळणार लाभ

Sukanya samriddhi yojana 2022: सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत गुंतवणूक करून तुम्ही तुमच्या मुलीच्या शिक्षणापासून ते लग्नापर्यंतच्या खर्चासाठी पैसे जमवू शकता. सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत, 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींचं खातं त्यांच्या पालकांच्या नावावरच उघडलं जातं.

पुढे वाचा ...
    मुंबई, 3 ऑगस्ट: अलीकडच्या काळात पालक आपल्या मुलांच्या भविष्याबाबत प्रचंड जागरूक असतात. त्यांच्या भविष्यासाठी गुंतवणूक करण्यावर त्यांचा भर असतो.  खासकरून जेव्हा घरात मुलगी जन्माला येते, त्यावेळी तिच्या सुखकर भविष्यासाठी पालक जास्त खबरदारी घेतात. तिच्या शिक्षणापासून लग्नापर्यंत सर्व गोष्टींसाठी पालक पैसे जमवत असतात. आपल्या मुलीच्या भवितव्याची त्यांना नेहमीच काळजी असते. पण आता सरकारही मुलींच्या भविष्यासाठी पालकांना मदत करत आहे. सरकार मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजना (Sukanya samriddhi yojana) राबवत आहे. या योजनेत गुंतवणूक करून पालक आपल्या मुलींचे भविष्य सुरक्षित करू शकतात. सुकन्या समृद्धी योजनेचा फायदा कसा घ्यावा? सुकन्या समृद्धी योजना ही अशीच एक दीर्घकालीन योजना आहे. यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही तुमच्या मुलीच्या शिक्षणापासून ते लग्नाच्या खर्चासाठी पैसे जोडू शकता. सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत, तुम्ही तुमच्या मुलीच्या नावावर किमान 250 रुपयांचे खाते उघडू शकता. तर या योजनेत वर्षाला जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये जमा करता येतात. एका कुटुंबातील किती मुलींचं खातं उघडता येईल- यापूर्वी या योजनेत 80C अंतर्गत कर सूट फक्त दोन मुलींच्या खात्यावर उपलब्ध होती. पण आता त्यात बदल झाला असून नव्या नियमानुसार एका मुलीनंतर दोन जुळ्या मुली जन्माला आल्यास त्या दोघींच्या खात्यालाही करात सूट मिळणार आहे. खाती कधी बंद करता येतील? सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत उघडलेलं खातं दोन परिस्थितीत बंद केलं जाऊ शकतं. मुलीचा मृत्यू झाल्यास किंवा मुलीचा पत्ता बदलल्यास हे खाते बंद केलं जाऊ शकतं. मात्र नव्या बदलानंतर खातेदाराच्या जीवघेण्या आजाराचाही त्यात समावेश करण्यात आला आहे. सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत उघडलेलं खातं पालकांच्या मृत्यूनंतरही मुदतीपूर्वी बंद केलं जाऊ शकतं. हेही वाचा-PM Ujjwala योजनेचं वास्तव आलं समोर, तब्बल 4.3 कोटी लोकांनी एकदाही भरला नाही सिलेंडर खातं कसं उघडायचं? या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा बँकेत जाऊन खातं उघडू शकता. सुकन्या समृद्धी योजना 21 वर्षात परिपक्व होते. मात्र, मुलीचं वय 18 वर्षे झाल्यानंतर या खात्यातून शिक्षणासाठी रक्कम काढता येऊ शकते. मात्र 21 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच संपूर्ण रक्कम काढता येते. सुकन्या समृद्धी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे- सुकन्या समृद्धी योजनेंतर्गत खाते उघडताना मुलीचे जन्म प्रमाणपत्र पोस्ट ऑफिस किंवा बँकेत देणं आवश्यक आहे. तसेच, मुलगी आणि तिच्या पालकांचं ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा आवश्यक आहे. खात्यात रक्कम कशी जमा होईल? सुकन्या समृद्धी योजना खात्यात गुंतवलेली रक्कम रोख, चेक, डिमांड ड्राफ्ट किंवा बँकेनं स्वीकारल्याप्रमाणे अशा कोणत्याही प्रकारे जमा केली जाऊ शकते. गुंतवणुकीवर किती व्याज मिळेल? सध्या सुकन्या समृद्धी योजनेतील गुंतवणुकीवर 7.6 टक्के दराने व्याज मिळत आहे. या योजनेंतर्गत, थोडीशी गुंतवणूक करून, तुम्ही लाखो रुपये जोडू शकता. सुकन्या समृद्धी योजनेवर बँक किंवा पोस्ट ऑफिसच्या सर्व बचत योजनांपेक्षा जास्त व्याज मिळत आहे. जर तुम्ही या योजनेत दरमहा रु. 1000 पर्यंत गुंतवणूक केली तर 7.6 टक्के व्याजदरानुसार तुम्हाला 10 लाखांपेक्षा जास्त रक्कम मिळेल.
    • 1 महिन्याची जमा -1000 रुपये
    • 12 महिन्यांतील एकूण ठेव- 12000 रुपये
    • 15 वर्षांपर्यंतच्या ठेवींवर -18,0000 रुपये
    • 21 वर्षांसाठी ठेवींवर एकूण व्याज + एकूण ठेव - 329,212 रूपये
    • 21 व्या वर्षी, एकूण ठेव + एकूण व्याज - 10,18,425 रुपये परत मिळतली.
    • अशा प्रकारे, तुमची मुलगी 21 वर्षांची झाल्यावर तिच्या नावावर लाखो रुपये जमा होतील. जर तुम्हाला तुमच्या मुलीचं लग्न करायचं असेल तर तुम्ही हे पैसे सहज काढू शकता.
    Published by:Suraj Sakunde
    First published:

    Tags: Savings and investments, Scheme, Small girl

    पुढील बातम्या