मुंबई, 2 ऑगस्ट: काल म्हणजेच ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच दिवशी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत कपात करण्यात आली होती, मात्र घरगुती गॅस सिलिंडरच्या (एलपीजी) किमती कायम होत्या. सरकारनं केवळ प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या (PMUY) लाभार्थ्यांसाठी अनुदान (LPG सबसिडी) कायम ठेवले आहे. उर्वरित एलपीजी ग्राहकांसाठी सबसिडी रद्द करण्यात आली आहे. परंतु सरकारनं संसदेत सादर केलेल्या आकडेवारीवरून असं दिसून आलं आहे की, उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांपैकी मोठ्या संख्येनं एलपीजी सिलिंडर एकदाही रिफिल केलेला नाही. राज्यमंत्र्यांनी सांगितली आकडेवारी- काल केंद्र सरकारनं उज्ज्वला योजनेअंतर्गत (PM Ujjwala Yojana) दिलेल्या गॅस कनेक्शनच्या रिफिलिंगची आकडेवारी संसदेत दिली. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले की उज्ज्वला योजनेच्या 4.13 कोटी लाभार्थ्यांनी एकदाही एलपीजी सिलेंडर रिफिल केलेला नाही. त्याचवेळी 7.67 कोटी लाभार्थ्यांनी फक्त एकदाच सिलिंडर भरला आहे. विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांची माहिती मागवली होती. रामेश्वर तेली म्हणाले की, 2017-18 या वर्षात उज्ज्वला योजनेच्या 46 लाख लाभार्थ्यांनी एकही सिलेंडर भरला नाही. त्याच वेळी, एकदा रिफिल केलेल्या लोकांची संख्या 1.19 कोटी होती. राज्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, 2018-19 मध्ये 1.24 कोटी, 2019-20 मध्ये 1.41 कोटी, 2020-21 मध्ये 10 लाख आणि 2021-22 मध्ये 92 लाखांनी एकदाही सिलिंडर भरला नाही. त्यांनी एकदा सिलिंडर रिफिल करणाऱ्यांची आकडेवारीही दिली. हेही वाचा- Suicide :‘लिव्ह इन’ पार्टनरकडून फसवणूक, तरुणीनं गळफास घेत संपवलं आयुष्य सबसिडी किती होती? रामेश्वर तेली म्हणाले की, सन 2018-19 मध्ये 2.90 कोटी, 2019-20 मध्ये 1.83 कोटी, 2020-21 मध्ये 67 लाख आणि 2021-22 मध्ये 1.08 कोटी ज्वाला योजनेच्या लाभार्थ्यांनी फक्त एकदाच सिलिंडर रिफिल केले. त्यांनी असंही सांगितलं की, 2021-22 या वर्षात एकूण 30.53 कोटी घरगुती गॅस ग्राहकांपैकी 2.11 कोटींनी एकदाही गॅस सिलिंडर रिफिल केलेला नाही. त्याच वेळी, 2.91 कोटी ग्राहकांनी एकदा घरगुती गॅस सिलिंडर भरले आहेत. एप्रिल 2020 पर्यंत उज्ज्वला गॅसचे सिलिंडर भरल्यावर गरिबांना 162 रुपये अनुदान परत मिळायचे. नवीन नियम काय आहे? उज्ज्वला योजनेंतर्गत सरकारनं 9 कोटी मोफत एलपीजी कनेक्शन वितरित केली आहेत. या सर्व लोकांना एलपीजी सबसिडी म्हणून 200 रुपये प्रति सिलिंडर निश्चित करण्यात आलं आहे. सरकारनं वर्षाला 12 सिलिंडरवर सबसिडी देण्याचा नियम केला आहे. 21 मे 2022 ते 2022-23 पर्यंत सरकारनं हे नियम ठरवले आहेत. उज्ज्वला योजनेंतर्गत सरकार गरीब कुटुंबातील महिलांना मोफत गॅस कनेक्शन देते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.