जाहिरात
मराठी बातम्या / मनी / 'आधार कार्ड'शिवाय सरकारी योजनांचा लाभ मिळणार नाही; UIDAIचं सर्व मंत्रालय, राज्यांना परिपत्रक जारी

'आधार कार्ड'शिवाय सरकारी योजनांचा लाभ मिळणार नाही; UIDAIचं सर्व मंत्रालय, राज्यांना परिपत्रक जारी

'आधार कार्ड'शिवाय सरकारी योजनांचा लाभ मिळणार नाही; UIDAIचं सर्व मंत्रालय, राज्यांना परिपत्रक जारी

Aadhar Card: जर कोणाकडे अद्याप आधार क्रमांक नसेल, तर त्याला सरकारी सेवा, लाभ किंवा अनुदानासाठी ताबडतोब आधार नोंदणी करावी लागेल. जोपर्यंत आधार क्रमांक येत नाही, तोपर्यंत नोंदणी स्लिप दाखवून सरकारी सेवांचा लाभ घेता येतो.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 16 ऑगस्ट : आधार कार्ड आज देशातील प्रत्येक नागरिकाची ओळख बनलं आहे. कोणत्याही ठिकाणी आधार कार्ड पुरावा म्हणून महत्त्वाचा दस्तावेज आहे. कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आधार कार्डशिवाय ते शक्य नाही. त्यामुळे आत्तापर्यंत तुमच्याकडे आधार क्रमांक नसेल किंवा आधारसाठी नोंदणी केली नसेल, तर सावध व्हा. कारण जर तुमच्याकडे आधार नसेल तर आता तुम्हाला मोठा तोटा सहन करावा लागणार आहे. News18 ला मिळालेल्या विशेष माहितीनुसार, UIDAI ने केंद्र सरकार आणि राज्य सरकारांच्या सर्व मंत्रालयांना सर्व सरकारी अनुदान आणि लाभांसाठी आधार क्रमांक अनिवार्य करण्यासाठी परिपत्रक जारी केले आहे. न्यूज 18 कडे UIDAI ने 11 ऑगस्ट रोजी जारी केलेल्या परिपत्रकाची प्रत आहे, ज्यानुसार आधारचे नियम कडक करण्यात आले आहेत. आधार कायद्याच्या कलम 7 मध्ये आधार नसलेल्या व्यक्तीला सुविधा देण्याची सध्याची तरतूद आहे. अशा व्यक्तींना ओळखीच्या पर्यायी आणि व्यवहार्य माध्यमांद्वारे सरकारी लाभ, सबसिडी आणि सेवा मिळण्याची तरतूद आहे. मात्र, देशातील 90 टक्के प्रौढांकडे आधार क्रमांक असल्याचेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. आधारकार्ड नसेल तर काय करावं लागेल? या पार्श्‍वभूमीवर आधार कायद्याच्या कलम 7 मधील तरतुदीनुसार, जर एखाद्या व्यक्तीकडे अद्याप आधार क्रमांक नसेल, तर तो त्यासाठी अर्ज करेल, असे या परिपत्रकात म्हटले आहे. जोपर्यंत अशा व्यक्तीला आधार क्रमांक दिला जात नाही तोपर्यंत त्या व्यक्ती आधार नोंदणी ओळख (EID) क्रमांक/स्लिपसह ओळखण्याच्या पर्यायी आणि व्यवहार्य माध्यमांद्वारे सरकारी लाभ, अनुदाने आणि इतर सेवांचा लाभ घेऊ शकतात. याचा अर्थ असा की, जर कोणाकडे अद्याप आधार क्रमांक नसेल, तर त्याला सरकारी सेवा, लाभ किंवा अनुदानासाठी ताबडतोब आधार नोंदणी करावी लागेल. जोपर्यंत आधार क्रमांक येत नाही, तोपर्यंत नोंदणी स्लिप दाखवून सरकारी सेवांचा लाभ घेता येतो. देशातील 99 टक्के प्रौढांकडे आधार ओळखपत्र आहे, ज्यामुळे अनेक प्रकारच्या सेवा आणि फायदे त्यांना थेट हस्तांतरित केले जातात. आधारमुळे सरकारी योजनांमधील गळती आणि घोटाळे रोखण्यात मोठ्या प्रमाणात मदत झाली आहे, असंही परिपत्रकात म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात