जाहिरात
मराठी बातम्या / मनी / चांदीच की! FD वर तब्बल 9 टक्के व्याज दर, ‘या’ बँकेची विशेष योजना

चांदीच की! FD वर तब्बल 9 टक्के व्याज दर, ‘या’ बँकेची विशेष योजना

एफडीच्या व्याजदरात लवकरच वाढ होण्याची शक्यता

एफडीच्या व्याजदरात लवकरच वाढ होण्याची शक्यता

Unity Small Finance Bank FD: युनिटी स्मॉल फायनान्स बँक (Unity Bank) ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेवींवर जोरदार व्याज देत आहे. एफडीचा कार्यकाळही फार मोठा नाही. इतर लोक देखील या बँकेच्या एफडी योजनेत गुंतवणूक करून प्रचंड व्याजदराचा लाभ घेऊ शकतात.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 11 डिसेंबर: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं (RBI) पुन्हा एकदा रेपो दरात वाढ केली आहे. रेपो दरात 0.35 टक्क्यांनी वाढ केल्यानंतर बँकांनी त्यांची कर्जे महाग करण्यास सुरुवात केली आहे. यासोबतच देशातील बँका येत्या काही दिवसांत मुदत ठेवीवरील (FD) व्याजदरातही वाढ करू शकतात. परंतु बँक ज्येष्ठ नागरिकांच्या मुदत ठेवींवर जोरदार व्याज देत आहे. तुम्ही ज्येष्ठ नागरिक असल्यास, युनिटी स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडच्या मुदत ठेव योजनेत गुंतवणूक करून तुम्हाला चांगलं व्याज मिळू शकतं. FD योजना किती दिवसांसाठी आहे? युनिटी स्मॉल बँक ज्येष्ठ नागरिकांसाठी मुदत ठेवीवर 9 टक्के व्याज देत आहे. 9 टक्के दराने व्याज मिळविण्यासाठी, ज्येष्ठ नागरिकांना युनिटी स्मॉल फायनान्स बँकेत 181 आणि 501 दिवसांच्या मुदत ठेवी गुंतवाव्या लागतील. यानंतर त्यांना वार्षिक 9 टक्के व्याज मिळू शकतं. दुसरीकडे, किरकोळ गुंतवणूकदारांना या कालावधीसाठी मुदत ठेवींवर 8.50 टक्के व्याज मिळेल. त्यामुळे आजकाल तुम्ही एफडी घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. हेही वाचा:  शेवटची संधी! ‘या’ बँकेचे ग्राहक असाल तर आजच करा हे काम, अन्यथा बंद होईल खातं इतरांसाठी व्याज दर- ज्येष्ठ नागरिकांव्यतिरिक्त, इतर वयोगटातील लोकांना 181 दिवसांत परिपक्व होणाऱ्या एफडीवर 8.50 टक्के दराने व्याज मिळेल. बँक 182 दिवस ते 364 दिवसांच्या मुदतीच्या FD वर 6.75 टक्के दरानं व्याज देत आहे. युनिटी बँक ही श्येड्यूल्ड कमर्शियल बँक आहे. सेंट्रम फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड हे जॉईंट इन्व्हेस्टरच्या म्हणून रेसिलियंट इनोव्हेशन्स प्रायव्हेट लिमिटेडसह प्रमोटर आहे. FD वर व्याज दर- युनिटी स्मॉल बँक 7-14 दिवसांत मुदत ठेवींवर 4.50 टक्के दराने व्याज देत आहे. त्याच वेळी, ते 15 ते 45 दिवसांच्या एफडीवर 4.75 टक्के व्याज दर देत आहे. जर एखाद्यानं 46 ते 60 दिवसांत मुदतपूर्ती FD मध्ये गुंतवणूक केली तर त्याला 5.25 टक्के दरानं व्याज मिळेल. बँकेला 61 ते 90 दिवसांत परिपक्व होणाऱ्या FD वर 5.50 टक्के आणि 91 ते 180 दिवसांत परिपक्व होणाऱ्या FD वर 5.75 टक्के व्याजदर मिळेल.

News18लोकमत
News18लोकमत

नॉन-कॉलेबल डिपॉझिट म्हणजे काय? याशिवाय, नॉन-कॉलेबल बल्क डिपॉझिटचा कमाल व्याज दर 8.10 टक्के प्रतिवर्ष आहे, तर कॉल करण्यायोग्य बल्क डिपॉझिटवर वार्षिक 8 टक्के दराने व्याज मिळेल. नॉन-कॉलेबल ठेवी म्हणजे ज्यामध्ये मुदतीपूर्वी पैसे काढण्याचा पर्याय नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात