• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • 'या' उपाययोजना करा अन्यथा रिकामं होईल खातं; स्टेट बँकेनं ग्राहकांना दिला सावधगिरीचा इशारा

'या' उपाययोजना करा अन्यथा रिकामं होईल खातं; स्टेट बँकेनं ग्राहकांना दिला सावधगिरीचा इशारा

sbi

sbi

भारतीय स्टेट बँकेत (State bank of India) तुमचं खातं असेल तर फिशिंग (Phishing) टाळण्यासाठी बँकेनं सांगितलेल्या या उपाययोजना राबवा आणि आपलं खातं सुरक्षित ठेवा.

  • Share this:
नवी दिल्ली 21 एप्रिल : देशातील सर्वांत मोठी सार्वजनिक बँक असणाऱ्या भारतीय स्टेट बँकेत (State bank of India) तुमचं खातं असेल तर फिशिंग (Phishing) टाळण्यासाठी बँकेनं सांगितलेल्या या उपाययोजना राबवा आणि आपलं खातं सुरक्षित ठेवा. आजकाल इंटरनेटच्या माध्यमातून होणाऱ्या फसवणूकीचे प्रकार वाढल्याच्या पार्श्वभूमीवर बँकेनं आपल्या लाखो ग्राहकांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. स्टेट बँकेनं आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून (Twitter Handle) एका ट्विटद्वारे ग्राहकांना सतर्क केलं आहे. अशी फसवणूक टाळण्यासाठी काय उपाययोजना राबवाव्यात, कशी दक्षता घ्यावी याबाबत माहिती दिली आहे. सध्या फसवणूक करणारे विविध प्रकारच्या नवनवीन मार्गांचा वापर करून ग्राहकांना लुबाडत आहेत. खोटे फोन कॉल्स, मेसेजेस, ईमेल्स पाठवून बँक खात्याची माहिती घेऊन खात्यातील रक्कम लंपास करत आहेत. अशी फसवणूक टाळण्यासाठी ग्राहकांनी सतर्क राहाणे गरजेचे असून आपली गोपनीय माहिती कोणालाही देऊ नये, असं आवाहन बँकेनं केलं आहे. ट्विटवरद्वारे संदेश : स्टेट बँकेनं आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर याबाबत ट्वीट केलं आहे. ग्राहकांनी आपली वैयक्तिक माहिती, आधार क्रमांक ई-केवायसी तपशील, एटीएम कार्ड नंबर, एटीएम पिन, मोबाइल नंबर, युपीआय व्हीपीए, युपीआय पिन आदी माहिती कोणत्याही एसएमएस, अॅप किंवा मोबाइल नंबरवर शेअर करू नये. बँकेशी संबंधित कोणत्याही सेवेची माहिती मिळवण्यासाठी हेल्पलाइन नंबर किंवा वेबसाइटचा वापर करावा,असं बँकेनं या संदेशात म्हटलं आहे. फिशिंग म्हणजे काय आणि ते कसे टाळता येते : -फिशिंग हल्ल्यात ग्राहकांची वैयक्तिक ओळख पटवणारा डेटा आणि आर्थिक खात्यांची माहिती चोरण्यासाठी सोशल इंजिनीअरिंग आणि तंत्रज्ञानाच्या आधारे फसवणूक या मार्गांचा वापर केला जातो. -इंटरनेट बँकिंग वापर करणाऱ्या ग्राहकाला अधिकृत ई-मेलवरूनच आल्यासारखा वाटणारा बनावट ई-मेल पाठवला जातो -त्या ई-मेलमध्ये ग्राहकाला दिलेल्या हायपर लिंकवर क्लिक करण्यास सांगितले जाते. -ग्राहकानं त्या हायपर लिंकवर क्लिक केलं की खऱ्या अधिकृत इंटरनेट बँकिंग साइटसारखी दिसणारी पण प्रत्यक्षात बनावट असणारी वेबसाइट उघडली जाते. -सामान्यत: या ई-मेलमध्ये काही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर बक्षीस देण्याची किंवा प्रक्रिया पूर्ण न केल्याबद्दल दंड आकारण्याची सूचना दिलेली असते. -ग्राहकाला लॉग-ईन किंवाप्रोफाइल किंवा पासवर्ड तसंच बँक खाते क्रमांक इत्यादी गोपनीय माहिती देण्यास सांगितलं जातं. -ग्राहक विश्वासानं माहिती देतो आणि‘सबमिट’बटणावर क्लिक करतो, तेव्हा त्याच्यासमोर एरर पेज येतं. -ग्राहक फिशिंग हल्ल्याच्या जाळ्यात अडकतो. अशी फसवणूक टाळण्यासाठी काय करावे: -नेहमी अ‍ॅड्रेस बारमध्ये योग्य यूआरएल टाइप करुन साइटवर लॉग ऑन करावं. -अधिकृत लॉग ईन पेजवरच आपला अधिकृत आयडी आणि पासवर्ड भरावा. -आपला अधिकृत आयडी आणि पासवर्ड देण्यापूर्वी, लॉग ईन पेजचे युआरएल (URL) ‘https: //’ यापासून सुरू होत असल्याचं आणि‘http: //’नसल्याची खात्री करून घ्या. यातील ‘एस’चा (s) अर्थ पेज ‘सुरक्षित’आहे, असा होतो. या पेजसाठी एन्क्रीप्शनचा वापर केलेला आहे, असं यावरून स्पष्ट होतं. -नेहमी, ब्राउझरच्या खाली आणि व्हेरीसाईन प्रमाणपत्राच्या उजवीकडे आणि सर्वांत खाली असलेलं लॉक चिन्ह शोधा. -फोन किंवा इंटरनेटवर बोलणाऱ्या व्यक्तीबाबत खात्री करून घेतल्यानंतरच आपली वैयक्तिक माहिती द्या. - बँक आपल्या खात्याच्या माहितीसाठी कधीही ई-मेलद्वारे संपर्क साधत नाही, हे लक्षात ठेवा.
Published by:Kiran Pharate
First published: