जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Post Office ची फ्रँचायजी सुरु करुन कमाईची संधी, उत्पन्न कसं आणि किती मिळतं?

Post Office ची फ्रँचायजी सुरु करुन कमाईची संधी, उत्पन्न कसं आणि किती मिळतं?

Post Office ची फ्रँचायजी सुरु करुन कमाईची संधी, उत्पन्न कसं आणि किती मिळतं?

पोस्ट ऑफिसची फ्रँचायजी सुरु करण्यासाठी तुम्हाला फक्त 5000 रुपयांची गरज आहे. देशभरात पोस्ट ऑफिसच्या दीड लाखांपेक्षाही जास्त शाखा (More Than 150000 Branches ) आहेत. आता आणखी काही नव्या शाखा सुरु करण्याची आवश्यकता पोस्ट ऑफिसला वाटत आहे.

    मुंबई, 31 मे : अगदी खेडेगावांपासून ते महानगरांपर्यंत आणि अशिक्षित ते साक्षर लोकापर्यंत सगळ्यांमध्ये लोकप्रिय असलेली देशातील महत्त्वाची संस्था म्हणजे पोस्ट ऑफिस (Post Office). आयटीच्या जमान्यातही संदेश, पत्रं, भेटवस्तूंची सुस्थितीत देवाण-घेवाण करण्यासाठी पोस्ट ऑफिस हे सगळ्यांत जास्त विश्वासार्ह समजलं जातं. गुंतवणुकीसाठीचा विश्वासार्ह पर्याय (Reliable Option For Investment) म्हणूनही पोस्ट ऑफिसचा विचार केला जातो. पोस्ट ऑफिसच्या विविध प्रकारच्या गुंतवणुकीच्या योजना सर्वसामान्यांमध्ये बऱ्याच लोकप्रिय आहेत. गुंतवणुकीबरोबरच पोस्ट ऑफिसच्या फ्रँचायजीच्या (Post Office Franchise) माध्यमातून तुम्हाला उत्पन्नाचा एक उत्तम मार्ग सापडू शकतो. अगदी थोडी गुंतवणूक करून तुम्ही पोस्ट ऑफिसची फ्रँचायजी सुरु करू शकता. याच्या माध्यमातून तुम्ही अनेक मार्गांनी पैसा कमवू शकता.

    पोस्ट ऑफिसची फ्रँचायजी सुरु करण्यासाठी तुम्हाला फक्त 5000 रुपयांची गरज आहे. देशभरात पोस्ट ऑफिसच्या दीड लाखांपेक्षाही जास्त शाखा (More Than 150000 Branches ) आहेत. आता आणखी काही नव्या शाखा सुरु करण्याची आवश्यकता पोस्ट ऑफिसला वाटत आहे. पोस्ट ऑफिसच्या फ्रँचायजी दोन प्रकारच्या असतात- फ्रँचायजी आउटलेट (Franchise Outlet) आणि पोस्टल आउटलेट (Postal Outlet). फ्रँचायजी सुरु करण्यासाठी तुम्ही पोस्ट ऑफिसमधून फॉर्म घेऊन अर्ज करू शकता.

    होम लोन फेडण्यासाठी ‘हा’ पर्याय निवडा, लाखो रुपयांची बचत सहज शक्य होईल

    पात्रता (Eligibility)

    >> वयाची अट (Age): फ्रँचायजी घेणाऱ्या व्यक्तीचं वय 18 वर्षांपेक्षा अधिक असावं.

    >> राष्ट्रीयत्व (Nationality): भारताचा कोणीही नागरिक पोस्ट ऑफिसची फ्रँचायजी घेऊ शकतो.

     » शैक्षणिक पात्रता (Educational Qualifications): कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेमधून इयत्ता 8 वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.

    उत्पन्न कसं आणि किती मिळतं?

    नोंदणीकृत वस्तूंच्या बुकिंगसाठी, प्रत्येक व्यवहारामागे 3 रुपये कमिशन निश्चित करण्यात आलं आहे. स्पीड पोस्ट (Speed Post) बुकिंगसाठी प्रतिदेवाण-घेवाण 5 रुपये कमिशन मिळतं. मनी ऑर्डरसाठीही (Money Order) कमिशन देण्यात येतं. 100 ते 200 रुपयांदरम्यानच्या मनी ऑर्डरसाठी साडेतीन रुपये कमिशन मिळतं. 200 रुपयांवरील मनी ऑर्डरसाठी प्रतिव्यवहार 5 रुपये कमिशन दिलं जातं. फ्रँचायजी एजंट 100 रुपयांपेक्षा कमी मनी ऑर्डर बुक करू शकत नाही. मनी ऑर्डरसाठी कमीतकमी मर्यादा 100 रुपये आहे.

    Business Idea : भारतीय रेल्वेसोबत काम करा आणि कमवा भरपूर पैसे, संधी गमावू नका

    1000 नोंदणीकृत आणि स्पीड पोस्टच्या बुकिंगचं मासिक लक्ष्य पूर्ण केल्यास 20 टक्के अतिरिक्त कमिशन दिलं जातं. पोस्टाची तिकीटं आणि स्टेशनरी विक्रीवर जेवढी विक्री झाली आहे त्या रकमेच्या 5 टक्के कमिशन निश्चित करण्यात आलं आहे. महसुली शिक्के, केंद्रीय भर्ती शुल्क तिकीटं इ.च्या विक्रीसह किरकोळ सेवांसाठी मिळालेल्या उत्पन्नाच्या 40 टक्के कमिशन पोस्ट ऑफिसद्वारा निश्चित केलं आहे.

    त्यामुळे देशातील ज्या भागात पोस्टाच्या सेवेची गरज आहे अशा भागात तुम्ही जर ही फ्रँचायजी घेऊन चालवली तर नक्कीच तुम्ही महिन्याचं उद्दिष्ट पूर्ण करून चांगली कमाई करू शकता.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात