मुंबई 24 सप्टेंबर : कुठलाही व्यवसाय करायचा म्हटलं, की भरमसाठ भांडवल लागतं असा समज आहे; पण अगदी कमी भांडवलामध्येही तुम्ही उत्तमरीत्या व्यवसाय करू शकता. विशेष म्हणजे अशा व्यवसायांतून मिळणारा नफाही चांगला असतो. फक्त मेहनत आणि चिकाटीच्या बळावर अशा व्यवसायांत यश मिळवता येतं. अगदी मोजक्या भांडवलात करण्यासारखा उत्तम पर्याय म्हणजे केटरिंग व्यवसाय होय. केटरिंग व्यवसायाचं वैशिष्ट्य म्हणजे या व्यवसायात कमी भांडवल गुंतवून तुम्ही चांगला नफा कमावू शकता. केवळ 10 हजार रुपयांच्या भांडवलातून या व्यवसायाची सुरुवात करता येऊ शकते. सद्यस्थितीत स्वच्छता असलेल्या ठिकाणचे पदार्थ खाण्यास ग्राहकांची पसंती असते. हा व्यवसाय सुरू करताना तुमच्याकडे स्वच्छ किचन असणं गरजेचं आहे. थोडीफार भांडी आणि गॅस सिलिंडर असेल तर कुठूनही आणि कधीही याची सुरुवात करता येऊ शकते. किराणा सामान आणि पॅकेजिंगवरही खर्च करावा लागतो. ही एक सिक्रेट Scheme 25 वर्षात तुम्हाला करणार करोडपती, टॅक्समधूनही मिळतेय सूट दर महिन्याला होऊ शकते मोठी कमाई सध्या छोट्या-मोठ्या पार्टीजसाठी अनेकजण चांगल्या केटरर्सच्या शोधात असतात. या व्यवसायात लेबरचीही आवश्यकता भासते. सुरुवातीच्या काळात प्रति महिना 25 हजार ते 50 हजार रुपये कमावू शकता. व्यवसायात वृद्धी झाल्यावर मात्र यातून महिन्याला लाखो रुपयेही मिळू शकतात. सातत्यानं चालणारा व्यवसाय योग्य नियोजन आणि चिकाटीनं हा व्यवसाय केला तर यात निश्चितच तोटा होणार नाही. कारण हा सातत्यानं चालत राहणारा व्यवसाय आहे. ग्राहकांना चोख सेवा मिळाल्यास ते नेहमी केटरिंगसाठी तुम्हालाच ऑर्डर देतील. पार्टी, सोहळे, कार्यक्रम कधीही थांबत नाहीत आणि जेव्हा केव्हा कार्यक्रम होतात तेव्हा खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यासाठी केटरर्सची आवश्यकता भासतेच. त्यामुळे आपले ग्राहक टिकवून ठेवल्यास या व्यवसायात वृद्धी होतच राहते. Saving Account वर तुम्ही किती पैसे ठेवू शकता? टॅक्सचा नियम काय सांगतो? सोशल मीडिया, मित्रमंडळीत करा प्रचार कुठलाही एखादा व्यवसाय सुरू करताना त्या व्यवसायाबद्दल पूर्ण माहिती असणं आवश्यक असतं. मार्केटमध्ये या व्यवसायाशी निगडित काय घडामोडी होत आहेत, हे जाणून घेणंही तितकचं महत्त्वाचं आहे. केटरिंगच्या व्यवसायातही ही बाब लागू पडते. केटरिंगच्या व्यवसायात उतरल्यानंतर तुम्ही ज्या सेवा देणार आहात त्याची माहिती ऑनलाइन, सोशल मीडिया आणि मित्रमंडळीच्या माध्यमातून देऊ शकता. सुरुवातीला कदाचित कमी ऑर्डर मिळतील; पण तुमची सेवा आणि चव पाहून ऑर्डरची संख्या निश्चितच वाढू शकते आणि यातून भरमसाठ नफाही कमावू शकता. दरम्यान, केटरिंगचा व्यवसाय करताना बाजारात आपले स्पर्धक कोण आहेत आणि ते कशी सेवा देतात याची माहितीही काढायला हवी. प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत काही वेगळं देण्याचा प्रयत्न करून अन्नपदार्थांचा दर्जा उत्तम ठेवला तर निश्चितच व्यवसायात चांगला फायदा होईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.