Home /News /money /

Shark Tank India : कोणत्या 'शार्क'ची किती स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक? कुणी गुंतवले सर्वाधिक पैसे?

Shark Tank India : कोणत्या 'शार्क'ची किती स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक? कुणी गुंतवले सर्वाधिक पैसे?

Shark Tank India या शोमध्ये एकूण 7 जज सहभागी झाले होते. यापैकी कुणी किती गुंतवणूक केली यावर एक नजर टाकूया. या शोमध्ये 117 उद्योजकांनी आपल्या व्यवसायाची माहिती दिली. त्यापैकी 67 डील झाल्या आहेत.

    मुंबई, 13 फेब्रुवारी : शार्क टँक इंडिया (Shark Tank India) या रिअॅलिटी टीव्ही शोमध्ये अनेक स्टार्टअप्सनी चांगले स्थान मिळवले. शोचा पहिला सीझन आता संपला आहे. या अनेक तरुणांच्या कल्पनांना शार्क अर्थात शोच्या जजकडून फंडिंगही मिळाली आहे. ही फंडिंग तरुणांना त्यांच्या स्टार्टअप्सला नव्या उंचीवर घेऊन जाण्यास मदत करेल. या शोबाबत लोकांची क्रेझ वाढत आहे. या शोमध्ये आपण विविध वयोगटातील उद्योजक पाहिले आहेत, ज्यांचे वय 20 ते 50 आणि 60 वर्षांपर्यंत होते. या शोमध्ये देशातील अनेक भागातून उद्योजक सहभागी झाले होते. असे अनेक स्टार्टअप्स आहेत ज्यांना शोच्या जजकडून गुंतवणूक मिळाली आहे, तर असे अनेक स्टार्टअप्स आहेत ज्यांना निराश होऊन परतावं लागलं आहे. या शोमध्ये एकूण 7 जज सहभागी झाले होते. यापैकी कुणी किती गुंतवणूक केली यावर एक नजर टाकूया. या शोमध्ये 117 उद्योजकांनी आपल्या व्यवसायाची माहिती दिली. त्यापैकी 67 डील झाल्या आहेत. अमन गुप्ता यांची 28 डीलमध्ये 9.358 कोटीं गुंतवणूक BoAt चे सह-संस्थापक, अमन गुप्ता (Aman Gupta) केलॉग स्कूल ऑफ मॅनेजमेंटमधून एमबीए आहेत. त्यांनी 28 डीलमध्ये 9.358 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. अमन गुप्ता यांनी या शोमध्ये सर्वाधिक गुंतवणूक केली आहे. तरुण उद्योजकांना पाठिंबा द्यायचा आहे, असे त्यांनी शोमध्ये अनेकदा नमूद केले. त्यामुळेच त्यांनी तरुणांसोबत अनेक डील केल्या. पीयूष बन्सल यांची 27 डीलमध्ये 8.297 कोटींची गुंतवणूक गुंतवणुकीच्या बाबतीत Lenskart चे पियुष बन्सल (Piyush Bansal) यांचे नाव दुसऱ्या क्रमांकावर येते. शोच्या सुरुवातीच्या टप्प्यात पियुष बन्सल नव्हते. बन्सल यांनी 27 डीलमध्ये 8.297 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. जुगाडू कमलेशच्या स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करून त्यांनी सर्वांची मने जिंकली. तुमचा आवडता शार्क कोण आहे असे जर एखाद्याला विचारले तर पियुष बन्सल हे सर्वात सामान्य उत्तर असेल. नमिता थापर यांची 22 डीलमध्ये 6.383 कोटींची गुंतवणूक नमिता थापर (Namita Thapar) गुंतवणुकीच्या बाबतीत तिसर्‍या क्रमांकावर आहेत. त्यांनी 22 डीलमध्ये 6.383 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. नमिता थापर या आरोग्य सेवा क्षेत्रातील आहेत. नमिता थापर या Emcure फार्मास्युटिकल्सच्या कार्यकारी संचालक आहेत. अश्नीर ग्रोव्हर यांची 21 डीलमध्ये 5.383 कोटींची गुंतवणूक शो दरम्यान अनेक वादांनी घेरलेल्या अश्नीर ग्रोवर (Ashneer Grover) यांनी 21 डीलमध्ये 5.383 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. अनुपम मित्तल यांची 24 डीलमध्ये 5.338 कोटींची गुंतवणूक अनुपम मित्तल (Anupam Mittal) हा एकमेव असा शार्क होता, जो प्रत्येक एपिसोडमध्ये उपस्थित होता. शो दरम्यान त्यांनी 24 डीलमध्ये 5.338 कोटी रुपये गुंतवले. मित्तल हे पीपल ग्रुपचे संस्थापक आणि सीईओ आहेत. ज्यामध्ये Shaadi.com, Makaan.com ची सुरुवात केली आहे. विनिता सिंह यांची 15 डीलमध्ये 3.042 कोटींची गुंतवणूक विनिता सिंग यांनी (Vinita Singh) शार्क टँक इंडियावर एकूण 15 डीलमध्ये 3.042 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. महिला उद्योजकांशीही त्यांनी अनेक डील केल्या आहेत. गझल अलघ यांची 7 डीलमध्ये 1.2 कोटींची गुंतवणूक गझल अलघ (Ghazal Alagh) हे मामाअर्थच्या (Mamaearth) संस्थापक आहेत. हा एक ब्युटी ब्रँड आहे, ज्याला शिल्पा शेट्टी एन्डॉर्स करताना दिसते. त्यांनी 7 स्टार्टअपमध्ये 1.2 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्यानी सर्वात कमी गुंतवणूक केली आहे.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Business, Investment

    पुढील बातम्या