• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • अवघ्या 40 रुपयांचा हा शेअर घेतल्यास होईल मोठा फायदा

अवघ्या 40 रुपयांचा हा शेअर घेतल्यास होईल मोठा फायदा

Share Market: शेअरमध्ये पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल किंवा चांगला फायदा मिळवण्यासाठी अगदी कमी गुंतवणूक करता येईल असा शेअर शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे.

  • Share this:
नवी दिल्ली, 21 जून: सध्या तुम्ही कोणत्याही शेअरमध्ये पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल किंवा चांगला फायदा मिळवण्यासाठी अगदी कमी गुंतवणूक करता येईल असा शेअर शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त आहे. एसएमसी ग्लोबल सिक्युरिटीजनं (SMC Global Securities) आपल्या ताज्या अहवालात कॅप्टन पॉलिप्लास्ट लिमिटेड म्हणजेच सीपीएलचे (CPL) शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या शेअर्ससाठी 55 रुपये उद्दिष्ट देण्यात आलं आहे. शेअर बाजारातील कामकाजाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी या शेअरची किंमत फक्त 40 रुपये होती. कंपनीचे आर्थिक निकाल उत्तम : मुंबई शेअर बाजार अर्थात बीएसईवर (BSE) नोंदणीकृत असलेल्या कॅप्टन पॉलीप्लास्ट लिमिटेडनं चौथ्या तिमाहीत तिमाही निकालाच्या तुलनेत 63 टक्के वाढ नोंदविली असून, 2 टक्के लाभांशही (Divident) जाहीर केला आहे. 2015-2021 या आर्थिक वर्षात सीपीएलनं आपलं उत्पन्न सुमारे 99 कोटी रुपयांवरून 166 कोटी रुपयांवर नेलं आहे. याच कालावधीत ईबीआयटीडीए (EBITDA) दुप्पटीपेक्षा अधिक तर पीएटी (PAT) 5.4 पट वाढलं आहे. आंध्र प्रदेशमध्ये कंपनीचं नवीन प्रॉडक्शन युनिट कार्यरत झालं असूनआपलं उत्पन्न 250 कोटी रुपयांपर्यंत नेण्याची कंपनीची क्षमता आहे. कंपनी पुढील काही वर्षांत पीएटीमध्ये 20 टक्के सीएजीआर (CAGR) देण्याची अपेक्षा आहे, असं या अहवालात म्हटलं आहे. कंपनीबद्दल अधिक माहिती : सीपीएल एक मायक्रो इरिगेशन (Micro Irrigation) सोल्यूशन प्रोव्हायडर आणि उत्पादक कंपनी आहे. सीपीएलकडे राजकोट (गुजरात) आणि कुरनूलमध्ये (आंध्र प्रदेश) उत्पादन सुविधा आहे. कंपनीचे देशातील 16 राज्यांत मार्केटिंग आणि डीस्ट्रीब्युशन नेटवर्क असून ते देशातील मायक्रो इरिगेशन बाजारपेठेतील जवळपास 90 टक्के हिस्सा व्यापते. कंपनीची 18 विक्री कार्यालये, 11 डेपो आणि 250 कर्मचाऱ्यांची मार्केटिंग टीम आहे. सीपीएलचे उत्तर, पश्चिम आणि दक्षिणेकडील राज्यांमध्ये 750 डीलर्स आहेत. या व्यतिरिक्त कंपनी आपली उत्पादने आखाती देश, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेच्या बाजारपेठेत निर्यात करते. सीपीएलने कुरनूल प्रकल्पात 2 पीव्हीसी लाइन्स आणि 1 एचडीपीई / स्प्रिंकलर लाइन उभारून प्रकल्पाची क्षमता वाढवली आहे. याव्यतिरिक्त सीपीएल सौर ऊर्जा (Solar EPC) क्षेत्रात आपली उपस्थिती वाढवित आहे. किरकोळ, व्यावसायिक आणि मोठ्या प्रकल्पांसाठी खास टीम्सची स्थापना केली आहे. आतापर्यंत कंपनीने 340पेक्षा अधिक ग्राहकांसाठी 1500 किलोवॅटपेक्षा जास्त क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत. सध्या त्यांच्याकडे 5000 किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पांच्या ऑर्डर्स असून या आर्थिक वर्षात आणखी काही प्रकल्प सुरू होण्याची अपेक्षा आहे. कंपनीचे अध्यक्ष काय म्हणतात : कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रमेश खिचडिया म्हणाले की, मायक्रो इरिगेशनच्या उत्पादनांच्या वाढत्या मागणीमुळे कंपनीची प्रगती झाली आहे. आर्थिक वर्ष 2022 च्या अर्थसंकल्पात सरकारनं मायक्रो इरिगेशनसाठी 10 हजार कोटी रुपये दिले आहेत. आगामी 5 वर्षात 10 दशलक्ष हेक्टर क्षेत्राचे उद्दीष्ट ठेवून देण्यात आलेला हा निधी आधीच्या वर्षांच्या तुलनेत दुप्पट आहे. येत्या आर्थिक वर्षात मायक्रो इरिगेशनच्या आमच्या मूळ व्यवसायाला याचा फायदा होईल. चौथ्या तिमाहीत आम्ही दक्षिणेकडील राज्यांमध्ये झालेल्या पीव्हीसी पाईप्सच्या जोरदार विक्रीमुळे कुरनूलमध्ये उत्पादन क्षमता वाढवली आहे. यामुळं या राज्यांमधील पाईप विक्री नेटवर्क वाढवण्यास मदत होईल. या वर्षात आम्ही झपाट्यानं वाढणार्‍या सौरऊर्जा क्षेत्रावर लक्ष केंद्रित केलं आहे, ज्यामुळे आमच्या प्रगतीला आणखी गती मिळेल अशी अपेक्षा आहे. एसएमसीच्या अहवालानुसार, कंपनीचं एकूण मार्जिन आर्थिक वर्ष 2015 मधील 31.6 टक्क्यांवरून आर्थिक वर्ष 2021 मध्ये 39.2 टक्क्यांपर्यंत वाढलं आहे, तर ईबीआयटीडीए मार्जिन याच काळात 13.3 टक्क्यांवरून 15.2 टक्क्यांपर्यंत गेलं आहे. एबीआयटीडीए मार्जिनच्या सहाय्यानं कंपनीनं गेल्या पाच वर्षात सरासरी 16.5 टक्के आरओई आणि 21.8 टक्के आरओसीई दिला आहे.
Published by:Pooja Vichare
First published: