आठवड्याच्या सुरुवातीला चांगली बातमी! भारतीय शेअर्समुळे Sensex ची उसळी

आठवड्याच्या सुरुवातीला चांगली बातमी! भारतीय शेअर्समुळे Sensex ची उसळी

भारतीय शेअर्सचे (BSE) भाव वधारल्याने आर्थिक विश्वात आशायादी वातावरण निर्माण झालं आहे.

  • Share this:

मुंबई, 7 डिसेंबर : आठवड्याच्या सुरुवातीलाच अर्थविषयक एक चांगली बातमी आली आहे. Coronavirus च्या प्रादुर्भावामुळे धडपडलेली अर्थव्यवस्था जरा कुठे उभारी घेऊ लागली असतानाच शेअर मार्केटनेही चांगले संदेश देत निर्देशांक वधारले आहेत. गेल्या काही दिवसात सलग पाचव्यांदा शेअर निर्देशांकाने उसळी घेत नवी उंची गाठली. त्यातली भारतीय शेअर्सचे भाव वधारल्याने आर्थिक विश्वात आशायादी वातावरण निर्माण झालं आहे.

सोमवारी भारतीय शेअर बाजार विक्रमी अंकानी वाढला. बाजार बंद झाला त्या वेळी NSE Nifty चा निर्देशांक 0.73%  50 अंकांनी वाढून 13,355.75 बंद झाला. मुंबई शेअर निर्देशांकानेही (BSE) उसळी घेतली. 0.77 टक्क्यांनी निर्देशांक वाढला आणि  45,426.97 वर बंद झाला.  कोरोना लशीबद्दल (Corona Vaccine) सकारात्मक बातम्या यायला लागल्यानंतर भारतीय शेअर बाजारात चैतन्य पसरलं आहे. सगल पाचव्या आठवड्यात चांगल्या निर्देशांकाचे संकेत मिळाले आहेत.

शेअर बाजारात सर्वाधिक सळसळ जाणवली ती ग्राहकोपयोगी वस्तूंच्या व्यापार आणि उद्योगांमुळे (consumer-goods). या क्षेत्रातल्या हिंदुस्तान युनिलिव्हर (HUL) आणि ITC Advanced या दोन कंपन्यांमुळे निफ्टीने तेजी घेऊन विक्रमी अंकावर बंद झाला आहे.  खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेला (HDFC) थोड्याफार प्रमाणात तोटा सहन करावा लागत असला तरी एकूण शेअर बाजारात उत्साहाचं वातावरण होतं.

कोरोना विषाणूच्या लशीसंदर्भात आलेल्या आंनदाच्या बातमीमुळे दोन्ही निर्देशांकात सलग पाच आठवड्यांपासून नफा नोंदवला गेला आहे.

लस निर्मितीचा सर्वात मोठी उत्पादक संस्था म्हणू जगभरात प्रसिद्ध असणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने AstraZeneca या कोविड -19 लशीच्या आपत्कालीन वापरासाठी नुकताच औपचारिक अर्ज केला आहे. जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असणारा दुसऱ्या क्रमांकाचा देश भारताने विविध सण - उत्सवाच्या काळातही कोरोना प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवलं आहे. याचा परिणाम व्यापार उदीम आणि अर्थव्यवस्थेवर दिसू लागला आहे.

स्वतंत्र भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच देशात मंदीची (Technical Recession) औपचारिक नोंद नुकतीच झाली. त्या पार्श्वभूमीवर शेअर बाजाराची उसळी ही निश्चितच चांगली बातमी आहे.

First published: December 7, 2020, 5:10 PM IST

ताज्या बातम्या