नवी दिल्ली, 17 फेब्रुवारी: देशात यंदा 316.6 दशलक्ष टन इतकं विक्रमी अन्नधान्य उत्पादन होणार असल्याचा अंदाज कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने (Ministry of Agriculture and Farmers Welfare) वर्तवला आहे. 2021-22 या वर्षासाठी जारी केलेल्या अन्नधान्य उत्पादनाबाबतच्या दुसऱ्या अंदाज अहवालात (Second Advance Estimates of Foodgrains Production) ही बाब नमूद करण्यात आली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण 53 लाख टन अधिक आहे. 2020-21 मध्ये 310.7 दशलक्ष टन अन्नधान्याचे उत्पादन झाले होते. यावेळी तेलबिया आणि कडधान्यांचे विक्रमी उत्पादन (Oilseeds And Pulses Production) होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे डाळी आणि मोहरीच्या तेलाच्या किमती कमी होऊ शकतात. परिणामी सर्वसामान्य जनतेला महागाईपासून काहीसा दिलासा मिळू शकतो. कृषी मंत्रालयाच्या मते, 2021-22 या वर्षातील उत्पादन गेल्या पाच वर्षांच्या (2016-17 ते 2020-21) सरासरी अन्नधान्य उत्पादनापेक्षा 253 दशलक्ष टन अधिक असण्याची शक्यता आहे. हे वाचा- Gold Price Today : सोन्याची किंमत वर्षभरातील उच्चांकाजवळ, काय आहेत नवे दर? तांदूळ आणि गव्हाचे उत्पादनही अधिक 2021-22 मध्ये तांदळाचे एकूण उत्पादन (Rice Production) विक्रमी 12.79 दशलक्ष टन होईल असा अंदाज आहे. गेल्या पाच वर्षांतील सरासरी 116.4 दशलक्ष टन उत्पादनापेक्षा हे प्रमाण 11.50 दशलक्ष टनांनी जास्त आहे. 2021-22 या वर्षात गव्हाचे एकूण उत्पादन (Wheat Production) 111.3 दशलक्ष टन होण्याचा अंदाज असून, हे पाच वर्षांच्या सरासरी 10.39 दशलक्ष टन उत्पादनापेक्षा 74.4 लाख टन अधिक आहे. त्याचप्रमाणे तृणधान्यांचे उत्पादनही 498 दशलक्ष टन होण्याचा अंदाज असून, ते सरासरी उत्पादनापेक्षा 328 लाख टन अधिक आहे. कडधान्यं आणि तेलबियांचंही विक्रमी उत्पादन 2021-22 या वर्षात एकूण 26.90 दशलक्ष टन कडधान्य (Pulses Production) उत्पादन होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गेल्या पाच वर्षांतील 23.8 दशलक्ष टनांच्या सरासरी उत्पादनापेक्षा ते 31.4 लाख टन अधिक आहे. यावेळी तेलबिया उत्पादनात मागील सर्व विक्रम मोडीत निघण्याची अपेक्षा आहे. 2021-22 मध्ये देशातील एकूण तेलबियांचे उत्पादन 37.10 दशलक्ष टन होण्याचा अंदाज असून, ते 2020-21 या वर्षातील 35.90 दशलक्ष टन उत्पादनापेक्षा 12 लाख टन अधिक आहे. हे वाचा- LIC IPO : शेअर बाजारात कोणकोणत्या शेअर्समध्ये LIC ची किती गुंतवणूक? ऊस आणि कापूसही जास्त 2021-22 या वर्षात देशातील ऊस उत्पादन (Sugarcane Production 2022) 41.40 दशलक्ष टन असल्याचा अंदाज आहे, जे सरासरी 37.34 दशलक्षपेक्षा 40.6 दशलक्ष टन अधिक आहे. कापूस उत्पादनही (Cotton Production 2022) 2022 मध्ये 3.40 कोटी गाठी (प्रति 170 किलो) होईल, असा अंदाज आहे. हे उत्पादन सरासरी 3.29 कोटी गाठींच्या उत्पादनापेक्षा 11.2 लाख गाठी जास्त आहे. ताग आणि मेस्ताचे उत्पादनही 95.7 लाख गाठी (प्रति 180 किलो) होण्याचा अंदाज आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.