मुंबई, 17 फेब्रुवारी : भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीत वाढ झाली आहे. रशिया आणि युक्रेनमधील तणाव (Russia-Ukraine Tension) दरम्यान, मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचा भाव 50,250 रुपये प्रति 10 ग्रॅम पार केला. त्यामुळे सोन्याचे दर एक वर्षाच्या उच्चांकाच्या जवळ पोहोचले. जागतिक बाजारात स्पॉट गोल्ड 1 टक्क्यांनी वाढून 1,885.65 डॉलर प्रति औंस झाले. जाणून घ्या आज सोन्याचा भाव किती आहे? दिल्ली सराफा बाजारात आज सोन्याच्या दरात 513 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली. त्याचवेळी, आज चांदीच्या दरात 190 रुपयांची उसळी नोंदवली गेली. दिल्ली सराफा बाजारात गुरुवारी सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 513 रुपयांनी वाढून 49,738 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला. गेल्या ट्रेडिंग सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोने 49,225 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. आज चांदीचे दर काय? दिल्ली सराफा बाजारात चांदीचा भाव 190 रुपयांनी वाढल्यानंतर 63,222 रुपये प्रति किलोवर बंद झाला. गेल्या ट्रेडिंग सेशनमध्ये दिल्ली सराफा बाजारात चांदीचा भाव 63,032 रुपये प्रति किलोवर बंद झाला होता. Instant Loan : पर्सनल लोनसाठी आता बँकेत जायची गरज नाही; Google Pay वर झटपट मिळवा लोन ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याच्या दराने गाठला होता उच्चांक ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याच्या किमतीने उच्चांक गाठला होता. त्यावेळी सोन्याने 56,000 रुपये प्रति 10 ग्रॅमचा टप्पा पार केला होता. सोन्याव्यतिरिक्त चांदीचा भाव 76006 रुपये प्रति किलो या सार्वकालिक उच्चांकावर पोहोचला होता. तज्ज्ञांच्या मते सोन्याचा तेजीचा कल कायम राहू शकतो. कशी तपासाल सोन्याची शुद्धता? तुम्हाला सोन्याची शुद्धता तपासायची असेल तर त्यासाठी सरकारने एक अॅप बनवले आहे. ‘BIS Care App’द्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अॅपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधी कोणतीही तक्रारही करू शकता. या अॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळून आल्यास ग्राहक त्याबाबत तत्काळ तक्रार करू शकतात. या अॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदवण्याबाबत तत्काळ माहितीही मिळणार आहे. LIC IPO : शेअर बाजारात कोणकोणत्या शेअर्समध्ये LIC ची किती गुंतवणूक? घरबसल्या मिस कॉलद्वारे जाणून घ्या सोन्याचा दर सोन्याचा दररोजचा दर हा तुम्ही घरबसल्या जाणून घेऊ शकता. सोन्याचे भाव जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही आपल्या मोबाईलने 8955664433 या नंबरवर मिस्ड कॉल द्या. त्यानंतर लगेच तुम्हाला तुमच्या मोबाईलवर सोन्याच्या किंमतीबद्दल मेसेज येईल. त्यामध्ये तुम्ही सोन्याच्या किंमतीबद्दल सविस्तर माहिती वाचू शकता. घरबसल्या मिस कॉलद्वारे जाणून घ्या सोन्याचा दर सोन्याचा दररोजचा दर हा तुम्ही घरबसल्या जाणून घेऊ शकता. सोन्याचे भाव जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही आपल्या मोबाईलने 8955664433 या नंबरवर मिस्ड कॉल द्या. त्यानंतर लगेच तुम्हाला तुमच्या मोबाईलवर सोन्याच्या किंमतीबद्दल मेसेज येईल. त्यामध्ये तुम्ही सोन्याच्या किंमतीबद्दल सविस्तर माहिती वाचू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.