मराठी बातम्या /बातम्या /मनी /

SBI WhatsApp Banking : आता बँकेत जाण्याची गरजच नाही; WhatsApp वरच करा बँकेची ही कामं

SBI WhatsApp Banking : आता बँकेत जाण्याची गरजच नाही; WhatsApp वरच करा बँकेची ही कामं

 दिवसेंदिवस ई-बँकिंगच्या सुविधांमध्ये वाढ होत आहे. खासगी बँका त्यांच्या ग्राहकांना घरबसल्या मोबाईल बँकिंगच्या माध्यमातून सर्व सोयीसुविधा देत आहेत.

दिवसेंदिवस ई-बँकिंगच्या सुविधांमध्ये वाढ होत आहे. खासगी बँका त्यांच्या ग्राहकांना घरबसल्या मोबाईल बँकिंगच्या माध्यमातून सर्व सोयीसुविधा देत आहेत.

दिवसेंदिवस ई-बँकिंगच्या सुविधांमध्ये वाढ होत आहे. खासगी बँका त्यांच्या ग्राहकांना घरबसल्या मोबाईल बँकिंगच्या माध्यमातून सर्व सोयीसुविधा देत आहेत.

मुंबई, 22 जुलै-   दिवसेंदिवस ई-बँकिंगच्या सुविधांमध्ये वाढ होत आहे. खासगी बँका त्यांच्या ग्राहकांना घरबसल्या मोबाईल बँकिंगच्या माध्यमातून सर्व सोयीसुविधा देत आहेत. त्यातच आता सार्वजनिक क्षेत्रातील सर्वांत मोठी बँक असलेल्या स्टेट बँक इंडियाने  त्यांच्या खातेदारांसाठी व्हॉट्सअ‍ॅप बँकिंगची सेवा उपलब्ध केली आहे. एसबीआयचे खातेदार आता मिनी स्टेटमेंटसह बँक खात्यातील शिल्लक रकमेची  माहिती घेऊ शकतील. ‘आज तक हिंदी’ने या संदर्भात वृत्त दिलं आहे.एसबीआयने त्यांच्या व्हॉट्सअ‍ॅप बँकिंग सेवेची माहिती त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर दिली आहे. विशेष म्हणजे बँकिंग सेवा घेण्यासाठी युजर्सना वेगळं अ‍ॅप डाउनलोड करण्याची गरज नाही. तसंच बँक खात्यातील रक्कम माहिती करून घेण्यासाठी एटीएमपर्यंत जाण्याचीही आवश्यकता नसेल. व्हॉट्सअ‍ॅप सेवेचा फायदा घेण्यासाठी एसबीआयच्या ग्राहकांना केवळ +91 9022690226 या क्रमांमावर Hi असा मॅसेज करावा लागेल.

एसबीआयच्या व्हॉट्सअ‍ॅप बँकिंग सेवेचा असा घ्या फायदा

युजरला सर्वांत आधी एसबीआय व्हॉट्सअ‍ॅप बँकिंग  सेवेचा फायदा घेण्यासाठी त्याच्या अकाउंटची नोंदणी करावी लागेल. त्यानंतर +91 7208933148 या क्रमांकावर ‘WAREG A/c No’ असा एसएमएस करावा लागेल. रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरून एमएमएस करणं आवश्यक आहे.

व्हॉट्सअ‍ॅपवर अशाप्रकारे मिळणार डिटेल्स

नोंदणी  पूर्ण झाल्यानंतर +91 9022690226 या क्रमांकावर Hi असा मेसेज पाठवावा लागेल. यानंतर युजरला 'Dear Customer, Welcome to SBI WhatsApp Banking Services!' असा मेसेज येणार आहे. यानंतर आपल्या सुविधेनुसार कुठलाही एक पर्याय निवडता येतो. युजरला अकाउंट बॅलन्स, मिनी स्टेटमेंट आणि डी-रजिस्टर असे तीन पर्याय दिसतील. त्यातील कुठलाही पर्याय निवडता येतो. युजरला अकाउंट बॅलन्स तपासण्यासाठी 1 आणि मिनी स्टेटमेंटसाठी 2 टाइप करावं लागेल. रिप्लाय दिल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅपवर खात्याची माहिती मिळेल. एसबीआय युजरला क्रेडिट कार्डसाठी व्हॉट्सअ‍ॅप आधारित सेवा मिळते. या सेवेच्या मदतीने क्रेडिट कार्ड युजरला अकाउंट समरी, रिवॉर्ड पॉईंट, आउटस्टँडिंग बॅलन्स, मेक कार्ड पेमेंट आणि इतर काही पर्याय पाहता येतात.

(हे वाचा: अकाउंटमध्ये शून्य रक्कम असली तरी काढता येणार पैसे; जाणून घ्या कसं )

दरम्यान, बँक खात्याबद्दलची माहिती घेण्यासाठी पूर्वी बँकांसमोर रांगा लावून ताटकळत उभं राहावं लागत होतं; पण आता स्मार्टफोन आणि इंटरनेटमुळे घरबसल्या एका क्लिकवर माहिती मिळते. एसबीआयने व्हॉट्सअ‍ॅप सेवा सुरू केल्याने खातेदारांना आता त्याचा चांगला फायदा होणार आहे. बहुतांशी लोकांकडून व्हॉट्सअ‍ॅपचा वापर केला जातो. त्यामुळे बँकिंग सेवा या प्लॅटफॉर्मवर मिळाल्याने बँक खात्याची माहिती घेण्यासाठी बँकेपर्यंत जाणाऱ्या अनेक लोकांच्या वेळ व श्रमाची बचत होणार आहे, हे नक्की.

First published:

Tags: Money, SBI, SBI bank