मुंबई, 2 डिसेंबर: स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) अशा अनेक योजना आहेत, ज्या निश्चित उत्पन्नासाठी एक चांगला पर्याय आहेत. अशीच एक योजना SBI वार्षिकी ठेव योजना आहे. या योजनेत एकरकमी पैसे जमा करावे लागतात. त्यानंतर दरमहा व्याजाच्या माध्यमातून कमाईची हमी असते. एसबीआय अॅन्युइटी डिपॉझिट स्कीममध्ये, ग्राहकाला दरमहा मूळ रकमेसह व्याज दिलं जातं. हे व्याज खात्यातील शिल्लक रकमेवर प्रत्येक तिमाहीत चक्रवाढ पद्धतीनं मोजलं जातं. SBI च्या वेबसाईटनुसार या योजनेतील व्याजदर बचत खात्यापेक्षा जास्त आहे. या योजनेत ठेवीवर बँकेच्या एफडी अर्थात फिक्स्ड डिपॉझिटप्रमाणंच व्याज मिळते. यामध्ये युनिव्हर्सल पासबुकही ग्राहकांना दिलं जातं. या योजनेत 36, 60, 84 किंवा 120 महिन्यांसाठी ठेवी ठेवता येतात. ही योजना SBI च्या सर्व शाखांमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये कमाल ठेवीची मर्यादा नाही. त्याच वेळी कमीत कमी डिपॉझिट किमान 1000 रुपये ठेवावं लागेल. हेही वाचा: दोन रुपये द्या अन् 5 लाख मिळवा, समजून घ्या कसं? एन्युटी उत्पन्नावर आकारला जाईल कर- एसबीआयच्या या योजनेत, ठेवीच्या पुढील महिन्यातील देय तारखेपासून एन्युटी दिली जाईल. जर एखाद्या महिन्यात ती तारीख नसेल (29, 30 आणि 31), तर पुढील महिन्याच्या तारखेला एन्युटी प्राप्त होईल. टीडीएस कापल्यानंतर आणि लिंक केलेल्या बचत खात्यात किंवा चालू खात्यात जमा केल्यानंतर एन्युटी दिली जाईल. SBI एन्युटी डिपॉझिट स्कीममध्ये, सामान्य ग्राहक आणि ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेवींवर मिळणारे व्याज मिळते. यामध्ये वैयक्तिक नामांकन सुविधा उपलब्ध आहे. युनिव्हर्सल पासबुक देखील ग्राहकांना जारी केलं जाईल. योजनेचं खातं बँकेच्या एका शाखेतून दुसऱ्या शाखेत हस्तांतरित केलं जाऊ शकतं.
75 टक्केपर्यंत ओव्हरड्राफ्ट घेऊ शकतो- एसबीआयच्या या योजनेत गरजेच्या वेळी खूप काम आहे. गरज भासल्यास, अॅन्युइटीच्या शिल्लक रकमेच्या 75 टक्के पर्यंत ओव्हरड्राफ्ट/कर्ज मिळू शकतं. कर्ज/ओव्हरड्राफ्ट मिळाल्यानंतर अॅन्युइटी पेमेंट कर्ज खात्यात जमा केलं जाईल. तर ठेवीदाराच्या मृत्यूनंतर योजना मुदतीपूर्वी बंद केली जाऊ शकते. याशिवाय 15 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींसाठी वेळेचे प्रीपेमेंट देखील केलं जाऊ शकतं. त्याच वेळी प्री-मॅच्युअर पेनल्टी देखील एफडीच्या दरानं भरावी लागेल. म्हणजेच मुदत ठेवीनुसार या योजनेत प्री-मॅच्युअर पेनल्टी आहे. हे खाते एकट्याचं किंवा संयुक्त असू शकतं.