नवी दिल्ली, 19 जानेवारी : तुमच्याकडेही 50 ते 2000 रुपयांच्या फाटक्या नोटा आल्या असतील तर आता काळजी करण्याची गरज नाही. कारण तुम्ही तुमच्या जवळच्या कोणत्याही बँकेच्या शाखेत जाऊन या नोटा बदलू शकता. आज आम्ही तुम्हाला या फाटलेल्या नोटा कोठून आणि कशा बदलून घेऊ शकता आणि त्या बदल्यात बँक तुम्हाला किती पैसे देते, ते सांगणार (Exchange damaged currency notes) आहोत.
फाटलेल्या नोटांच्या बदल्यात, भारतीय रिझर्व्ह बँकेनं (नोट रिफंड) नियम, 2009 मध्ये अनेक महत्त्वाचे बदल केले आहेत. नियमांनुसार, नोटेच्या स्थितीनुसार, लोक आरबीआय कार्यालय आणि देशभरातील नियुक्त बँक शाखांमध्ये फाटलेली किंवा सदोष नोट बदलू शकतात.
इथं फाटलेल्या नोटा बदला
तुमच्या जवळच्या कोणत्याही बँकेच्या शाखेत जाऊन तुम्ही या नोटा बदलू शकता. मात्र, ही सुविधा प्रत्येक बँकेत उपलब्ध नाही. बँक कर्मचारी तुमची नोट बदलून घेण्यास नकार देऊ शकत नाहीत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) सर्व बँकांना फाटलेल्या नोटा बदलून देण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. यासोबतच त्यांना त्यांच्या शाखांमध्ये या सुविधेबाबतचे फलकही लावणं बंधनकारक आहे.
2000 च्या फाटलेल्या नोटेच्या बदल्यात तुम्हाला इतके रुपये मिळतात
आरबीआयच्या नियमानुसार नोट किती फाटली हे तिच्या स्थितीवर अवलंबून आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, 2000 रुपयांची नोट 88 स्क्वेअर सेंटीमीटर (सेमी) शाबूत असल्यास पूर्ण पैसे उपलब्ध होतील. तर, 44 स्क्वेअर सेंटीमीटर शाबूत फक्त अर्धे पैसे मिळतील.
हे वाचा -
टाटा मोटर्सचं CNG कारच्या दुनियेत मोठं पाऊल; Tiago iCNG आणि Tigor iCNG झाल्या लॉन्च, वाचा सर्व फिचर
बँका कोणतंही शुल्क आकारत नाहीत
फाटलेली नोट बदलण्यासाठी बँक तुमच्याकडून कोणतेही शुल्क आकारत नाही. ही सेवा बँकेकडून मोफत दिली जाते. तथापि, बँक अशा नोटा बदलून देण्यास नकार देऊ शकते, ज्या खूप खराब झाल्या आहेत किंवा अत्यंत वाईटरीत्या जळलेल्या आहेत. नोटेत जाणूनबुजून फेरफार केल्याचा बँकेला संशय असल्यास किंवा त्या जाणीवपूर्वक कापलेल्या आढळल्यास त्या बदलूनही दिल्या जात नाहीत.
हे वाचा -
Hero इलेक्ट्रिक आणि महिंद्राचा मोठा करार; वर्षाला 10 लाख दुचाकी इलेक्ट्रिक गाड्यांची होणार निर्मिती
किती परतावा मिळेल?
50 रु., 100 रु., आणि 500 रु. च्या जुन्या फाटलेल्या नोटांच्या संपूर्ण परताव्यात, तुमच्या नोटेचं 2 भागांमध्ये विभाजन झालेला असणं आवश्यक आहे, त्यापैकी प्रत्येक भाग संपूर्ण नोटेच्या 40 टक्के किंवा त्याहून अधिक भाग फाटलेला असायला हवा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.