मराठी बातम्या /बातम्या /मनी /

SBI की पोस्ट ऑफिस? FD वर मिळवा 10 लाखांचा रिटर्न, फक्त करावी लागेल 'ही' एक गोष्ट

SBI की पोस्ट ऑफिस? FD वर मिळवा 10 लाखांचा रिटर्न, फक्त करावी लागेल 'ही' एक गोष्ट

SBI की पोस्ट ऑफिस? FD वर मिळवा10 लाखांचा रिटर्न, फक्त करावी लागेल 'ही' एक गोष्ट

SBI की पोस्ट ऑफिस? FD वर मिळवा10 लाखांचा रिटर्न, फक्त करावी लागेल 'ही' एक गोष्ट

SBI FD मध्ये 6.10 टक्के दरानं व्याज दिल्यास ग्राहकाला 3 वर्षांच्या मुदतीनंतर 10.01 लाख रुपयांचा परतावा मिळेल. यामध्ये 1,66,296 रुपये व्याज म्हणून मिळतील, तेही केवळ 3 वर्षांत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Suraj Sakunde

मुंबई, 26 सप्टेंबर: मुदत ठेवीमध्ये (FD) गुंतवणूक करू पाहणाऱ्यांसाठी चांगले  दिवस आले आहेत. रेपो दरात वाढ झाल्यानं एफडी दरातही वाढ होत आहे. आता एफडीचे दर किती वाढवायचे, यासाठी बँकांमध्ये चढाओढ सुरु आहे. यामुळं ग्राहकांमध्ये निश्चितच आनंदाचं वातावरण आहे. पहिल्या 3-4 टक्क्यांवर असणारा FD दर आज 6-6.50 टक्के आहे. रिझर्व्ह बँकेची एमपीसीची बैठक 30 सप्टेंबरला आहे. जर रेपो रेट पुन्हा वाढला तर एफडीचा दर आणखी वाढू शकतो. फिक्स्ड डिपॉझिट हे एक असं साधन आहे जे तुम्हाला निश्चित कमाईचा स्रोतच देत नाही तर कोणताही मोठा खर्च सहजतेनं पूर्ण करतं. एवढेच नाही तर 5 लाख रुपयांपर्यंतची रक्कम बुडणार नाही. कारण डिपॉझिटची रक्कमेची डीआयसीजीसीनं पूर्णपणे हमी दिली आहे. एफडीमध्ये इतक्या सुविधा उपलब्ध असताना जास्तीत जास्त परतावा मिळवण्यासाठी गुंतवणूक कुठं करायची हा प्रश्न उभा राहतो.

 SBI ची FD योजना-

स्टेट बँक ऑफ इंडियानं आझादी का अमृत महोत्सवात विशेष उत्सव डिपॉझिट स्कीम सुरू केली आहे. या योजनेत ग्राहकांना अधिक परतावा दिला जात आहे. ही FD योजना 15 ऑगस्ट 2022 पासून सुरू झाली असून ती 28 ऑक्टोबर 2022 पर्यंत चालेल. ही सुमारे 3 वर्षे किंवा 1000 दिवसांची विशेष एफडी योजना आहे. उत्सव ठेव योजनेत ज्येष्ठ नसलेल्या नागरिकांना त्यांच्या ठेवींवर 6.10 टक्के व्याज दिलं जात आहे तर ज्येष्ठ नागरिकांना 6.60 टक्के परतावा मिळत आहे.

अशा प्रकारे, जर एखाद्या ग्राहकानं SBI उत्सव ठेव योजनेत एकरकमी 835000 रुपये जमा केले तर 3 वर्षानंतर त्याला चांगला परतावा मिळेल. 6.10 टक्के दरानं परतावा मिळाल्यास 3 वर्षांच्या मुदतीनंतर ग्राहकाला 10.01 लाख रुपयांचा परतावा मिळेल. यामध्ये 1,66,296 रुपये व्याज म्हणून मिळतील, तेही केवळ 3 वर्षांत. अशा प्रकारे, एक सामान्य ग्राहक 8,35,000 रुपये जमा करून 3 वर्षात 10 लाखांपेक्षा जास्त रक्कम जमवू शकतो.

हेही वााचा: TCS चा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय, नियम मोडणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई

पोस्ट ऑफिस एफडी-

त्याचप्रमाणे 10 लाख रुपयांचा परतावा मिळविण्यासाठी पोस्ट ऑफिस एफडीमध्ये किती पैसे गुंतवावे लागतील ते जाणून घेऊया. पोस्ट ऑफिस स्मॉल सेव्हिंग स्कीम अंतर्गत, पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट खातं चालवते, ज्यामध्ये बँकांप्रमाणे व्याजाचा लाभ मिळतो. तुम्हाला माहिती आहेच की, पोस्ट ऑफिसची प्रत्येक योजना सरकार पुरस्कृत असते. त्यामुळे पैसे गमावण्याचा धोका नाही. पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट स्कीममध्ये, एफडी खातं किमान 1000 रुपयांनी उघडावं लागतं किंवा तुम्हाला हवं असल्यास तुम्ही 100 रुपयांच्या पटीत जमा करू शकता.

1, 2, 3 किंवा 5 वर्षांच्या कालावधीसाठी ठेवी ठेवल्या जाऊ शकतात. पोस्ट ऑफिस टर्म डिपॉझिट्स 1 ते 3 वर्षांच्या ठेवींवर 5.5 टक्के व्याज दर देत आहेत, तर 5 वर्षांच्या मुदतीच्या ठेवींवर वार्षिक 6.7 टक्के व्याज दर मिळेल. व्याजाची गणना तिमाही आधारावर केली जाते.

5.5 टक्के व्याज आणि 3 वर्षांचा कालावधी लक्षात घेऊन 10.01 लाख रुपयांची मॅच्युरिटी रक्कम मिळविण्यासाठी पोस्ट ऑफिस मुदत ठेव खात्यात 8.50 लाख रुपये 3 वर्षांसाठी गुंतवावे लागतील. 5 वर्षात 10 लाख रुपयांची मॅच्युरिटी रक्कम मिळविण्यासाठी, गुंतवणूकदाराला 6.7 टक्के व्याज दर आणि 5 वर्षांचा कालावधी गृहीत धरून पोस्ट ऑफिस एफडी खात्यात 7.18 लाख रुपये जमा करणं आवश्यक आहे. अशाप्रकारे 5 वर्षांत त्या ठेवीदाराला 6.7 टक्के दरानं 10 लाखांपेक्षा जास्त रक्कम मिळतील, तर त्यासाठी 7.18 लाख रुपये गुंतवावे लागतील.

First published:

Tags: Fixed Deposit, Sbi fixed deposit