नवी दिल्ली, 2 सप्टेंबर: SBI कार्ड्सने नवीन ‘कॅशबॅक SBI कार्ड’ लाँच केलं आहे. हे कार्ड आता पूर्वीपेक्षा जास्त कॅशबॅक देईल. हे प्रत्येक कार्डधारकाला कोणत्याही व्यापारी निर्बंधांशिवाय सर्व ऑनलाइन खर्चांवर 5% पर्यंत कॅशबॅक देईल. एसबीआय कार्ड्सने त्यांचं नवीन कॅशबॅक कार्ड अनेक प्रकारे खास असल्याचा दावा केला आहे. ऑनलाइन (Online) आणि ऑफलाइन (Offline) अशा दोन्ही प्रकारच्या खरेदीवर या कार्डवरून कॅशबॅक मिळेल. तसंच, तुम्ही एखाद्या कंपनी आउटलेटमधून किंवा या प्लॅटफॉर्मवरून एखादं प्रॉडक्ट खरेदी केली तरच तुम्हाला कॅशबॅक मिळेल, अशा प्रकारची कोणतीही अट या कार्डवरून कॅशबॅक मिळवताना पूर्ण करावी लागणार नाही.
कॅशबॅक एसबीआय कार्ड (CASHBACK SBI Card) कॅशबॅकसाठी कोणत्याही प्रकारचं मर्चंट रिस्ट्रिक्शन लावत नाही, असा दावा एसबीआय कार्ड्सने केला आहे. कार्डधारकाने कुठूनही वस्तू खरेदी केल्यास त्याला 5% कॅशबॅक दिला जाईल. देशातील सर्वांत मोठ्या सरकारी बँकेच्या कार्डचा दावा आहे की ही नवीन ऑफर कॅशबॅक देण्याच्या आर्थिक व्यवहाराला एका नवीन लेव्हलवर घेऊन जाणार आहे.
हेही वाचा -
Sumangal Rural Postal Life Insurance Scheme: पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत दररोज भरा 95 रुपये अन् मिळवा 14 लाख; काय आहे योजना?एसबीआय कार्ड स्प्रिंट
कंपनीच्या म्हणण्यानुसार, टियर 2 आणि 3 शहरांसह संपूर्ण भारतातील ग्राहक डिजिटल अॅप्लिकेशन प्लॅटफॉर्म (Digital Application Platform) ‘एसबीआय कार्ड स्प्रिंट’च्या माध्यमातून घरबसल्या ‘कॅशबॅक एसबीआय कार्ड’साठी अर्ज करू शकतात.
ऑटो-क्रेडिट कॅशबॅक सुविधा
कंपनीच्या मते, कॉन्टॅक्टलेस कार्ड घेणं पहिल्या वर्षी मार्च 2023 पर्यंत विशेष ऑफर म्हणून फ्री आहे. त्यात म्हटलंय की, ‘कॅशबॅक SBI कार्ड’ ग्राहकांना सर्व खर्चांवर अनलिमिटेड 1% कॅशबॅक मिळेल. प्रत्येक महिन्याला जास्तीतजास्त 10 हजार रुपयांपर्यंतच्या ऑनलाइन खरेदीवर 5 टक्के कॅशबॅक मिळेल. कॅशबॅक एसबीआय कार्डमध्ये ऑटो-क्रेडिट कॅशबॅक सुविधा आहे. यामुळे स्टेटमेंट जनरेशनच्या दोन दिवसांत तुम्हाला तुमच्या SBI कार्ड अकाउंटमध्ये कॅशबॅक मिळेल.
लाँचिंगवेळी बोलताना SBI कार्डचे एमडी आणि सीईओ राम मोहन राव अमारा म्हणाले, “कॅशबॅक SBI कार्ड आमचा कोअर कार्ड पोर्टफोलिओ आणखी मजबूत करेल. आम्ही विचारपूर्वक ‘कॅशबॅक एसबीआय कार्ड’ तयार केलंय. ते ग्राहकांना प्रत्येक खरेदीवर, प्रत्येकवेळी आणि सर्व ठिकाणी कॅशबॅक देईल. ग्राहक दररोज आणि आगामी सणासुदीच्या काळात याचा जास्तीतजास्त फायदा घेऊ शकतात.”
कार्डचे वार्षिक चार्जेस किती
या कार्डच्या रिन्युअलसाठी, कार्ड होल्डरला वर्षभरात 999 रुपये चार्जेस आणि त्यावर लागू टॅक्स भरावा लागेल. वर्षभरात किमान 2 लाख रुपयांपर्यंतची खरेदी करणाऱ्या कार्डधारकांना 999 रुपये वार्षिक चार्जेस परत केले जातील. हे कॅशबॅक एसबीआय कार्ड व्हिसा प्लॅटफॉर्मवर (Visa Platform) उपलब्ध आहे.