मराठी बातम्या /बातम्या /मनी /New Year आधी SBI कडून खास अलर्ट, पाहा कोणाला घेता येणार सुविधेचा लाभ

New Year आधी SBI कडून खास अलर्ट, पाहा कोणाला घेता येणार सुविधेचा लाभ

SBI PO Exam

SBI PO Exam

तुम्ही जर SBI चे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई : तुम्ही जर SBI चे ग्राहक असाल किंवा तुम्ही SBI चं लोन घेतलं असेल किंवा तुम्ही SBI शी निगडीत कोणतीही सेवा हवी असेल शंका असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. SBI ग्राहकांना बँकेनं अलर्ट दिला आहे. बँकेनं ट्वीट करून एक नोटिफिकेशन जारी केलं आहे.

    SBI ने नवीन टोलफ्री क्रमांक जारी केला आहे. या टोल फ्री क्रमांकावर ग्राहक आपल्या शंका विचारू शकतात. यासाठी कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही, अशी माहिती SBI कडून देण्यात आली आहे.

    SBI ने दिलेल्या सूचनेनुसार ग्राहक 1800 1234 किंवा 1800 2100 या दोन्हीपैकी एका नंबरवरून फोन करून आपली शंका विचारू शकतात. ग्राहकांना खात्यावरची रक्कम, ट्रान्झाक्शन, ATM कार्ड ब्लॉक करणं, कार्ड पुन्हा मागवणं अशा काही सेवांचा लाभ या नंबरवरून घेता येणार आहे.

    चेकबुक मिळवण्यासाठी, चेकबुकचं स्टेटस चेक करण्यासाठी देखील या टोलफ्री क्रमांकाचा वापर करता येणार आहे. याशिवाय TDS डिटेल्स, डिपॉझिट इंटरेस्ट सर्टिफिकेट देखील तुम्ही या नंबरवर फोन करून मागवू शकता.

    पासबुक अपडेटसाठी बँकेत जायची गरज नाही, एका क्लीकवर असं मिळवा mPassbook

    ATM कार्ड मिळवण्यासाठी, त्याचे स्टेटस चेक करणं एवढंच नाही तर पिन जनरेट करण्यासाठी सुद्धा आता तुम्ही या नंबरचा वापर करू शकणार आहात. एसबीआय कॉन्टॅक्ट सेंटरकडे आता लक्षात ठेवणे सोपे असल्याचं बँकेनं म्हटलं आहे. एसबीआयच्या कॉन्टॅक्ट सेंटरला 1800 1234 किंवा 1800 2100 वर टोल फ्रीवर कॉल करुन तुमच्या शंकांचं निरसन करण्याचं आवाहन ग्राहकांना दिलं आहे.

    SBI कडून अलर्ट! नव्या वर्षात बदलणार क्रेडिट कार्डचे नियम

    सर्वात महत्त्वाचं म्हणजे गेल्या काही दिवसांपासून फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे ग्राहकांनी गुगलवरून SBI चा कस्टमर केअर नंबर शोधून फोन करू नये. त्यामुळे तुमची फसवणूक होऊ शकते अशी माहिती SBI ने दिली आहे. याशिवाय कोणालाही तुमचा नंबर, OTP आणि खात्याची माहिती देऊ नका असं आवाहन केलं आहे.

    First published:

    Tags: New year, SBI, Sbi account, Sbi alert, SBI Bank News