जाहिरात
मराठी बातम्या / मनी / RD चे एक नाही तर आहेत अनेक फायदे! मिळतो FD पेक्षाही जास्त फायदा

RD चे एक नाही तर आहेत अनेक फायदे! मिळतो FD पेक्षाही जास्त फायदा

रिकरिंग डिपॉझिट स्किम

रिकरिंग डिपॉझिट स्किम

RD म्हणजेच रिकरिंग डिपॉझिटविषयी तुम्ही ऐकलंच असेल. आरडी, एफडीप्रमाणे सुरक्षित गुंतवणूक योजना आहे. आरडीमध्ये गुंतवणूक करणे खूप फायदेशीर आहे. चला तर मग जाणून घेऊया याचे 6 महिन्यापासून ते 10 वर्षांपर्यंतचा प्लान…

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 8 जुलै : सुरक्षित गुंतवणुकीसाठी बँक आणि पोस्ट ऑफिसला सर्वात जास्त बेस्ट ऑप्शन मानलं जातं. तुम्हालाही एकाच वेळी जास्त रक्कम न गुंतवता तुमच्या सेव्हिंगवर चांगले रिटर्न हवे असतील तर रिकरिंग डिपॉझिट तुमच्यासाठी योग्य पर्याय ठरु शकतो. ही स्किम टर्म डिपॉझिटचा एक रुप आहे. रिकरिंग डिपॉझिटमध्ये रेग्यूलर गुंतवणुकीची गरज असते. आरडीवर कोणत्याही रिस्कशिवाय ग्राहकांना चांगले रिटर्न मिळतात. रिकरिंग डिपॉझिट सामान्य बँक डिपॉझिटपेक्षा वेगळी असते. अनेक गुंतवणूकदार, ज्यांना काही काळासाठी बँकेत थोडे थोडे पैसे जमा करावे लागतात, ते फक्त रिकरिंग डिपॉझिटच करतात. करिंग डिपॉझिट देखील फिक्स्ड डिपॉझिटप्रमाणे सुरक्षित असतात. यामध्ये गुंतवणूकदाराला ठराविक कालावधीसाठी दर महिन्याला काही रक्कम जमा करावी लागते. जेव्हा ही योजना मॅच्योर होते, तेव्हा गुंतवणूकदाराला त्याचे जमा पैसे व्याजासह मिळतात. रिकरिंग डिपॉझिट अल्प कालावधीसाठी देखील केलं जाऊ शकतं आणि त्यावरील व्याजदर सामान्यतः केलेल्या बचतीपेक्षा जास्त असतो. PPF अकाउंट मॅच्योर झाल्यावर मिळतात हे 3 ऑप्शन! यात गुंतवणूक केली असेल तर अवश्य घ्या जाणून RD मध्ये गुंतवणूक करण्याचे अनेक फायदे आहेत यामध्ये तुम्ही किमान मासिक 10 रुपयांच्या गुंतवणुकीपासून सुरुवात करू शकता. मात्र ते बँकेवर अवलंबून आहे. ही रक्कम प्रत्येक बँकेत वेगळी असू शकते. RD मध्ये गुंतवणूक करणे खूप लवचिक आहे. तुम्ही तुमच्या सोयीनुसार सहा महिन्यांपासून ते 10 वर्षांपर्यंत आरडी करू शकता. यामध्ये मिळणारे व्याज जवळपास बँक एफडीच्या बरोबरीचे आहे. अनेक बँका तुम्हाला मॅच्युरिटी कालावधीपूर्वीच RD मधून पैसे काढण्याची परवानगी देतात, परंतु यासाठी तुम्हाला काही चार्ज भरावे लागेल. त्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्ही आरडी तारण ठेवूनही कर्ज घेऊ शकता. हे तुमच्या जमा रकमेच्या 80 ते 90 टक्के असू शकते. HDFC बँकेची जास्त व्याज देणारी FD उद्या होणार बंद! सोडू नका अखेरची संधी चांगल्या रिटर्नसाठी ट्राय करा या पद्धती 1. उच्च व्याजदर देणारी विश्वसनीय बँक सिलेक्ट करा. 2. फायनेंशियल टार्गेटच्या हिशोबाने RD टेन्योर निवडा. 3. मासिक वजावट काळजीपूर्वक निवडा. 4. आरडी योजनेतून मुदतपूर्व पैसे काढणे टाळा. FD की RD कोणता ऑप्शन बेस्ट आरडी छोट्या-छोट्या बचतीचा सर्वात चांगला ऑप्शन असतो. ज्या लोकांकडे गुंतवणुकीसाठी एकरकमी रक्कम नाही. त्यांच्यासाठी आरडी चांगला ऑप्शन आहे. एफडी किंवा आरडीमधील काही तरी एक निवडायचं असेल तर तुमच्याकडे गुंतवणुकीसाठी किती पैसा आहे हे पाहा. तुमच्याकडे ठराविक कालावधीसाठी मोठा निधी असल्यास, तुम्ही FD निवडू शकता. यामध्ये तुम्हाला अधिक नफा मिळू शकतो. तुम्हाला दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवायची असेल, तर तुमच्यासाठी RD हा एक चांगला पर्याय आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात