मुंबई : अटल पेन्शन योजनेची सुरुवात 9 मे 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. यामाध्यमातून 1 हजार रुपयांपासून 5 हजार रुपये प्रति महिना पेन्शन मिळू शकते. सुरुवातीला या योजनेचा कुणीही लाभ घेऊ शकत होतं, पण गेल्या वर्षी यामद्ये बदल करण्यात आला. आता तुम्ही टॅक्स भरत असाल तर या योजनेंतर्गत गुंतवणूक करू शकत नाही. या योजनेत 5 कोटींहून जास्त लोकांनी रजिस्ट्रेशन केलं आहे. तुम्हाला 5 हजार रुपयांची पेन्शन मिळवण्यासाठी वय आणि हफ्ता यांचे मेळ साधावा लागेल. तुमच्या वयानुसार तुम्हाला किती रक्कमेचा हफ्ता भरल्यास 5 हजार रुपये पेन्शन मिळेल हे आम्ही सांगणार आहे.
FD करण्याचे आहेत 9 नुकसान, गुंतवणूक करण्यापूर्वी एकदा वाचाच!एखाद्या 18 वर्षांच्या व्यक्तीने अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक सुरू केली तर त्याला वयाच्या 60 वर्षापर्यंत दर महिन्याला 210 रुपये जमा करावे लागतील. तेव्हा त्या व्यक्तीला महिन्याला 5 हजार रुपये पेन्शन मिळेल. अशाच पद्धतीने 168 रुपये जमा केल्यास 4 हजार, 126 रुपये जमा केल्यास 3 हजार आणि 84 रुपये जमा केल्यास 2 हजार तर 42 रुपये जमा केल्यास वयाच्या 60 वर्षानतंर दरमहा 1 हजार रुपये पेन्शन मिळेल. एखाद्या व्यक्तीने वयाच्या 40 व्या वर्षी गुंतवणूक सुरू केली तर त्याला 5 हजार रुपयांची पेन्शन हवी असल्याच दरमहा 1454 रुपये जमा करावे लागतील. जर तो दर महिन्याला 291 जमा करत असल्यास 60 वर्षांनंतर 1 हजार रुपये दरमहा पेन्शन मिळण्यास पात्र असले. 582 रुपये भरल्यास भरल्यास 2 हजार रुपये, तर 873 रुपये भरल्यास 3 हजार आणि 1164 रुपये भरल्यास दरमहा 4 हजार रुपये पेन्शन मिळेल.
लोनही असतात गुड आणि बॅड! पण ते कसं ओळखायचं? ही आहे ट्रिकदर महिन्याला तुम्हाला हफ्ता भरावाच लागेल असं नाही. अटल पेन्शन योजनेत तुम्हाला 3 महिने आणि 6 महिन्याला हफ्ता भरण्याची सुविधा मिळते. तुम्ही तुमच्या बँक अकाउंटमधून ऑटो डेबिट फीचर ऑन करू शकता. यामुळे निश्चित कालावधीत तुमच्या खात्यावरून तेवढी रक्कम कट होईल. जर व्यक्तीचा मृत्यू झाला तर त्याची पेन्शन जोडीदाराला दिली जाते. जर दोघांचाही मृत्यू झाला तर वारसदाराला 60 वर्षांपर्यंत जमा केलेली रक्कम परत दिली जाईल. तुम्हाला या योजनेसाठी कोणत्याही बँकेत खाते उघडता येते.