मुंबई, 15 मार्च : भारतसह जगभरातील शेअर बाजारात (share market) अस्थिरतेचं वातावरण आहे. त्यात महागाई (Inflation) देखील दिवसेंदिवस वाढत आहे. युक्रेन-रशिया युद्ध (Russia-Ukraine war), क्रुड ऑईलचे (Crude oil) गगनाला भिडलेले दर, युएस फेड व्याजदराची चर्चा अशा अनेक कारणांमुळे हे अनिश्चिततेचं वातावरण आहे. मात्र या सर्वांमध्ये सगळीकडे तोटा होत असताना गुंतवणूकदारांचं लक्ष आता सोन्याकडे वळताना दिसत आहे. कारण या अनिश्चिततेच्या काळात सुरक्षितता म्हणून सोन्याकडे पाहिले जाते. कोरोना काळातही लोकांनी ते अनुभवलं आहे. सोनं मिळकत देणारी संपत्ती नसली तरी ते मौल्यवान राहते. अनिश्चिततेच्या काळात महागाई सर्वात मोठा शत्रू ठरतो. ज्यामुळे कागदी चलनाचंही मुल्य कमी होतं. मात्र चनलाप्रमाणे सोन्याचे अवमुल्यन केले जाऊ शकत नाही. त्यामुळे सोन्यातील गुंतवणूक महागाईच्या काळातही प्रभावीपणे संरक्षण करते. कारण महागाई दरात वाढ झाल्यास सोन्याच्या किंमती निश्चित वधारतात. Income Tax Alert : सोन्यातील गुंतवणुकीवर कर कसा आकारला जातो? डिटेल्स चेक करा सोन्यात गुंतवणुकीचे पर्याय सोन्यात गुंतवणुकीचे अनेक पर्याय आहेत. सॉवरेन गोल्ड बाँड हा गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम पर्याय मानला जातो. सरकारच्या वतीने रिझर्व्ह बँकेकडून तो जारी केला जातो, त्यामुळे परतावा मिळण्याची हमी असते. यामध्ये गुंतवणूकदाराला सोन्याच्या वाढत्या किमतीचा फायदा तर मिळतोच, शिवाय अतिरिक्त व्याजही मिळते. याशिवाय, गोल्ड म्युच्युअल फंड आणि गोल्ड ईटीएफ द्वारे अल्प रकमेची गुंतवणूक देखील केली जाऊ शकते. तुम्ही डिजिटल गोल्डद्वारे सोने खरेदी करू शकता. डिजीटल गोल्ड ऑफरर्स देखील एका ठराविक मर्यादेनंतर तुम्हाला सॉलिड सोने देतात. शेवटी गुंतवणुकीचा सर्वात सामान्य मार्ग म्हणजे सोन्याचे दागिने खरेदी करणे. Senior Citizen Saving Scheme : 31 मार्च आधी बचत खाते लिंक करा, अन्यथा रोख व्याज मिळणार नाही सोन्याचे सध्याचे दर सोन्याच्या दरात नुकत्याच झालेल्या विक्रमी वाढीमुळे भारतातील सोने खरेदीदार अडचणीत आले आहेत. जे सोने खरेदी करू पाहत होते त्यांनी खरेदीचा बेत सोडला आहे. गेल्या आठवड्यात सोन्याने दर 55,558 प्रति 10 ग्रॅमचा उच्चांक गाठला होता. जे ऑगस्ट 2020 मध्ये नोंदवलेल्या रेकॉर्डपेक्षा कमी आहेत. मंगळवारी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6:23 वाजता सोन्याचा भाव 51,508 रुपयांवर होता. (टीप - सध्याच्या अस्थिरतेच्या काळात सोन्यात गुंतवणूक करावी की नाही याबाबत तज्ज्ञांचा सल्ला घेऊन निर्णय घ्यावा.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.