मराठी बातम्या /बातम्या /मनी /

RupeeVsDollar: रुपयाची ऐतिहासिक घसरण, डॉलरच्या तुलनेत 80 रुपयांचा टप्पा पार; तुमच्यावर काय परिणाम होईल?

RupeeVsDollar: रुपयाची ऐतिहासिक घसरण, डॉलरच्या तुलनेत 80 रुपयांचा टप्पा पार; तुमच्यावर काय परिणाम होईल?

 विदेशी गुंतवणूकदारांकडून शेअर बाजारातून पैसे काढून घेणे हे रुपयाच्या घसरणीचे सर्वात मोठे कारण आहे. याशिवाय कच्च्या तेलावर होणारा जास्त खर्चही यासाठी कारणीभूत आहे.

विदेशी गुंतवणूकदारांकडून शेअर बाजारातून पैसे काढून घेणे हे रुपयाच्या घसरणीचे सर्वात मोठे कारण आहे. याशिवाय कच्च्या तेलावर होणारा जास्त खर्चही यासाठी कारणीभूत आहे.

विदेशी गुंतवणूकदारांकडून शेअर बाजारातून पैसे काढून घेणे हे रुपयाच्या घसरणीचे सर्वात मोठे कारण आहे. याशिवाय कच्च्या तेलावर होणारा जास्त खर्चही यासाठी कारणीभूत आहे.

    मुंबई, 19 जुलै : इतिहासात पहिल्यांदाच अमेरिकन चलन डॉलरच्या तुलनेत रुपयाने 80 रुपयांची पातळी ओलांडली आहे. मंगळवारी बाजार उघडताच, सुरुवातीच्या व्यापारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया सात पैशांनी घसरला आणि प्रति डॉलर 80.05 या सर्वकालीन नीचांकी पातळीवर पोहोचला. सोमवारी 15 पैशांच्या घसरणीसह रुपया प्रति डॉलर 79.97 च्या विक्रमी नीचांकी पातळीवर बंद झाला. रुपयाच्या घसरणीचा अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम होत आहे. रुपयाच्या घसणीचं कारण काय? पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अर्थमंत्र्यांनी लोकसभेत माहिती दिली की 2014 आणि 2022 दरम्यान डॉलरच्या तुलनेत रुपया 25 टक्क्यांपेक्षा जास्त कमजोर झाला आहे. तज्ज्ञांच्या मते विदेशी गुंतवणूकदारांकडून शेअर बाजारातून पैसे काढून घेणे हे रुपयाच्या घसरणीचे सर्वात मोठे कारण आहे. याशिवाय कच्च्या तेलावर होणारा जास्त खर्चही यासाठी कारणीभूत आहे. Home Loan चा EMI भरायला उशीर झाला तर नेमकं काय होतं? रशिया-युक्रेन युद्धामुळे आलेला जागतिक बाजाराचा दबाव हे रुपयाच्या कमजोरीचे सर्वात मोठे कारण आहे. जागतिक बाजारपेठेतील कमोडिटीवरील दबावामुळे गुंतवणूकदार डॉलरला प्राधान्य देत आहेत, कारण जागतिक बाजारपेठेतील बहुतांश व्यवहार डॉलरमध्ये होतात. सततच्या मागणीमुळे डॉलर सध्या 20 वर्षांतील सर्वात मजबूत स्थितीत आहे. याशिवाय विदेशी गुंतवणूकदार सध्या भारतीय बाजारातून सतत भांडवल काढून घेत आहेत, त्यामुळे परकीय चलन कमी होत आहे आणि रुपयावर दबाव वाढत आहे. तुमच्यावर काय परिणाम होईल? भारतात अनेक वस्तू या परदेशातून आयात केल्या जातात. यात पेट्रोलियम पदार्थांसह खाद्यतेल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू यांचा समावेश आहे. आज तकच्या वृत्तानुसार, रुपयाची घसरण सुरु राहिली आणि डॉलरची किंमत वाढत राहिली तर आयात वस्तूंवर आपल्याला जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार आहे. म्हणजे आयात वस्तूंवर खर्च वाढल्यास देशात विक्रीसाठी देखील त्या वस्तूंच्या किमती वाढणार आहे. रिफाइंड ऑईल, मोबाईल आणि लॅपटॉपपर्यंत अनेक वस्तू महाग होऊ शकतात. Home Loan : 'या' 5 कारणामुळं बँक फेटाळू शकते गृहकर्जाचा अर्ज, वेळीच घ्या काळजी खाद्यतेल महागण्याची शक्यता भारत मोठ्या प्रमाणात खाद्यतेलाची आयात करतो. आतंतराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाची खरेदी ही डॉलरमध्ये केली जाते. अशा परिस्थितीत जर रुपया कमजोर झाला तर देशांतर्गत बाजारात खाद्यतेलाच्या किमती वाढू शकतात. काही दिवसांपूर्वीच सरकारने खाद्यतेल स्वस्त करण्यासाठी आयात शुल्क रद्द केले आहे. वैद्यकीय खर्च वाढू शकतो भारत मोठ्या प्रमाणात औषधांची देखील निर्यात करतो. सोबत औषध निर्मितीसाठीच्या मशिनरीज देखील भारत निर्यात करतो. यासाठी जर जास्तीचे पैसे मोजावे लागले तर याचा थेट परिणाम सर्वसामान्यांवर होणार आहे आणि वैद्यकीय खर्चासाठी नागरिकांना जास्त पैसे मोजावे लागू शकतात. परदेशातील शिक्षण महागणार? रुपयाच्या घसरणीचा मुलांच्या शिक्षणावरही परिणाम होऊ शकतो. भारतातून परदेशात गेलेल्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च वाढणार आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण झाल्याने मुलांच्या पालकांना जास्त पैसे मुलांना आता पाठवावे लागणार आहेत. तसेच विदेशात फिरायला जाण्याचा कुणी विचार करत असेल आणि एक बजेट ठरवलं असेल तर त्या बजेटपेक्षा नक्कीच खर्च आता वाढणार आहे.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Rupee, Rupee weakness

    पुढील बातम्या