मराठी बातम्या /बातम्या /मनी /

रुपया नीचांकी पातळीवर: तुमचं सोनं, इक्विटी गुंतवणुकीवर कसा परिणाम होईल? वाचा तज्ज्ञांचा सल्ला

रुपया नीचांकी पातळीवर: तुमचं सोनं, इक्विटी गुंतवणुकीवर कसा परिणाम होईल? वाचा तज्ज्ञांचा सल्ला

BSE बेंचमार्क सेन्सेक्स सोमवारी 367.39 अंकांनी घसरून 54,468.19 अंकांवर व्यवहार करत होता, तर NSE निफ्टी 110.1 अंकांनी घसरून 16.301.15 अंकांवर व्यापार करत होता.

BSE बेंचमार्क सेन्सेक्स सोमवारी 367.39 अंकांनी घसरून 54,468.19 अंकांवर व्यवहार करत होता, तर NSE निफ्टी 110.1 अंकांनी घसरून 16.301.15 अंकांवर व्यापार करत होता.

BSE बेंचमार्क सेन्सेक्स सोमवारी 367.39 अंकांनी घसरून 54,468.19 अंकांवर व्यवहार करत होता, तर NSE निफ्टी 110.1 अंकांनी घसरून 16.301.15 अंकांवर व्यापार करत होता.

  मुंबई, 9 मे : देशातील गुंतणवूकदारांसाठी (Investments) महत्वाची बातमी समोर आली आहे. सोमवारी सुरुवातीच्या व्यापारादरम्यान भारतीय रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 77.52 च्या आतापर्यंतच्या सर्वात नीचांकी पातळीवर घसरला (rupee at all-time low) आहे. इक्विटी गुंतवणूकदारांना त्यांच्या पोर्टफोलिओवर त्याचा त्रास होऊ शकतो. सोन्याच्या किमतीत वाढ होण्याचीही शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. विश्लेषकांनी सांगितले की, रुपयाची घसरण एफपीआयना इक्विटी (Equity) विक्री सुरू ठेवण्यास प्रवृत्त करू शकते, तर भारतात सोन्याच्या (Gold) किमती वाढू शकतात. चला याबद्दल सविस्तर जाणून घेऊ. व्यापारादरम्यान सोमवारी भारतीय रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 77.52 च्या विक्रमी नीचांकी पातळीवर घसरला. मजबूत यूएस नोकऱ्यांचा डेटा आणि आक्रमक यूएस फेड दर वाढीच्या शक्यतांमुळे डॉलरचा भाव वधारला. मेहता इक्विटीजचे उपाध्यक्ष (Commodities) राहुल कलंत्री म्हणाले, “सतत विदेशी निधीचा बाहेरचा प्रवाह, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि डॉलरची सामान्य ताकद यामुळे रुपयाची घसरण झाली आहे. बीएसई बेंचमार्क सेन्सेक्स सोमवारी 367.39 अंकांनी घसरून 54,468.19 अंकांवर व्यवहार करत होता, तर एनएसई निफ्टी 110.1 अंकांनी घसरून 16.301.15 अंकांवर व्यापार करत होता. विदेशी निधीचा प्रवाह आणि मिश्रित कॉर्पोरेट कमाई यामुळे गुंतवणूकदार आधीच त्यांच्या इक्विटी पोर्टफोलिओमध्ये घसरण पाहत आहेत. रिझव्‍‌र्ह बँकेने (आरबीआय) केलेल्या अचानक व्याजदर वाढीमुळेही शुक्रवारी बाजार खाली आला. कलंत्री म्हणाले, “इक्विटी मार्केटला USD-INR वाढणे आवडत नाही आणि ते नेहमी USD-INR च्या विरुद्ध दिशेने जातात. दरम्यान, रुपयाच्या कमकुवतपणामुळे देशांतर्गत सोन्या-चांदीला बळ मिळते. पण, डॉलरचा वाढता भाव आंतरराष्ट्रीय सोन्यासाठीही प्रतिकूल आहे.

  आर्थिक संकटात न अडकता चिंतामुक्त जीवन जगा! पर्सनल फायनान्स मॅनेजमेंटसाठी फॉलो करा 'या' पाच टिप्स

   कलंत्री पुढे म्हणाले की, गेल्या काही दिवसांत डॉलर निर्देशांकांत 103 च्या आसपास चढ-उतार होत आहे आणि 20 वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला आहे. कारण, गुंतवणूकदारांनी 40 वर्षांच्या उच्च चलनवाढीवर नियंत्रण आणण्यासाठी यूएस फेडरल रिझर्व्हकडून आणखी आर्थिक कडक करण्यावर पैज लावली आहे.
  यूएस फेडरल रिझर्व्हने गेल्या आठवड्यात आपल्या बेंचमार्क कर्ज दरात 50 बेसिस पॉइंट्सने वाढ केली, जी दोन दशकांतील सर्वात तीव्र वाढ आहे. फेडच्या मुख्य दरातील वाढीमुळे ते 0.75 टक्के ते 1 टक्क्यांच्या श्रेणीत वाढले, दोन वर्षांपूर्वी साथीच्या रोगाचा आघात झाल्यापासूनचा सर्वोच्च बिंदू आहे. 2000 नंतरची सर्वात आक्रमक हाफ-पॉइंट वाढ, असे सुचवते की आणखी मोठ्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. रुपयाच्या घसरणीचा फायदा होऊ शकणार्‍या काही क्षेत्रांबद्दल जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे मुख्य गुंतवणूक धोरणकार व्ही के विजयकुमार म्हणाले, “रुपयाची घसरण निर्यात क्षेत्रांसाठी, विशेषतः आयटी (माहिती तंत्रज्ञान) कंपन्यांसाठी चांगली आहे. फार्मास्युटिकल निर्यातदार, विशेष रसायने आणि कापड यांचाही फायदा होईल." डिजीलॉकरवरही EPFO ​​सुविधा उपलब्ध, कर्मचाऱ्यांना वापर करण्यासाठी काय करावे लागेल? त्यामुळे आयटी, फार्मास्युटिकल्स, स्पेशॅलिटी केमिकल्स आणि टेक्सटाइल्स यांसारख्या निर्यात-केंद्रित क्षेत्रातील समभागांवर रुपयाच्या घसरणीदरम्यान चांगली बाजी मारली जाऊ शकते; तर फास्ट-मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स (FMCG), धातू आणि बँकिंग यांसारखी क्षेत्रे प्राप्त होत आहेत. विजयकुमार पुढे म्हणाले की यूएस डॉलरच्या सुरक्षित खरेदीने डॉलर निर्देशांक 104 वर ढकलला आहे, ज्यामुळे इतर चलनांवर, विशेषतः उच्च चालू खात्यातील तूट असलेल्या उदयोन्मुख बाजारातील चलनांवर परिणाम झाला आहे. “सोन्याचे मूल्य डॉलरमध्ये असल्याने, डॉलरच्या वाढीमुळे सोन्याच्या किमती कमी होतात. परंतु, रुपयाच्या घसरणीमुळे महागड्या आयातीमुळे भारतीय सोन्याच्या किमती वाढतील,” असे ते म्हणाले. Gold Price Today: ऐन लग्नसराईत सोन्याच्या दरात वाढ; चांदीही महागली, चेक कर नवे दर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) आणि यूएस फेडरल रिझर्व्हने व्याजदर वाढवल्यानंतर चालू महिन्याच्या पहिल्या चार ट्रेडिंग सत्रांमध्ये विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPIs) भारतीय इक्विटी मार्केटमधून 6,400 कोटी रुपये काढले आहेत. कोटक सिक्युरिटीजचे प्रमुख (इक्विटी रिसर्च-रिटेल) श्रीकांत चौहान म्हणाले की, कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती, चलनवाढ, कडक आर्थिक धोरण या सर्व बाबी लक्षात घेता, भारतातील FPIs चा प्रवाह नजीकच्या काळात अस्थिर राहण्याची अपेक्षा आहे.
  Published by:Rahul Punde
  First published:

  Tags: Investment

  पुढील बातम्या