Home /News /money /

आर्थिक संकटात न अडकता चिंतामुक्त जीवन जगा! पर्सनल फायनान्स मॅनेजमेंटसाठी फॉलो करा 'या' पाच टिप्स

आर्थिक संकटात न अडकता चिंतामुक्त जीवन जगा! पर्सनल फायनान्स मॅनेजमेंटसाठी फॉलो करा 'या' पाच टिप्स

पर्सनल फायनान्स सिक्युरिटी व्यवस्थित जपली तर तुम्‍ही कर्जाच्या (Debt) ओझ्याखाली आणि तणावात (Stress) राहणार नाही. शिवाय यामुळे तुम्हाला घरच्‍या आर्थिक जबाबदाऱ्‍यादेखील व्यवस्थित पार पाडता येतील.

मुंबई, 9 मे : कोरोना महामारीने अनेक धडे दिल्यानंतर सध्या जगातील प्रत्येक व्यक्ती विविध मार्गांनी आपली संपत्ती वाढवण्यात व्यस्त आहे. बचत करण्याची (Savings) आणि खर्चाचं नियोजन (Cost Planning) करण्याची सवय या दोन गोष्टी पैसे (Money) वाढवण्यासाठी सर्वांत महत्त्वाच्या ठरतात. कारण तुमची कमाई कितीही जास्त असेल मात्र, तुम्ही बचत किंवा खर्चाचं नियोजनच केल नाही तर तुम्ही कधीही रस्त्यावर येऊ शकता. एका  नवउद्योजकानं (Entrepreneur)  तर या दोन गोष्टींकडे कटाक्षानं लक्ष दिलं पाहिजे. नवउद्योजकाला एकाचवेळी विविध जबाबदाऱ्या पार पाडाव्या (Multifunctional) लागतात. त्यानं कामाची परिस्थिती, डेली न्यूज इत्यादींबद्दल जागरुक असलं पाहिजे. बहुतेक उद्योजक आपली कंपनी उभी करण्यासाठी आपल्या पर्सनल अकाउंटमधील (Personal Account) पैशांची गुंतवणूक करतात. हे पैसे चांगल्या ठिकाणी गुंतवले जात असले तरी त्यापूर्वी पर्सनल फायनान्सचं (Personal Finance) व्यवस्थित प्लॅनिंग केलं पाहिजे. त्यासाठी काही टिप्स फॉलो केल्या पाहिजेत. Entrepreneur या वेबसाईटने याबाबतची माहिती प्रसिद्ध केली आहे. पर्सनल फायनान्स सिक्युरिटी व्यवस्थित जपली तर तुम्‍ही कर्जाच्या (Debt) ओझ्याखाली आणि ताणात (Stress) राहणार नाही. शिवाय यामुळे तुम्हाला घरच्‍या आर्थिक जबाबदाऱ्‍यादेखील व्यवस्थित पार पाडता येतील. स्वत: ला शिक्षित व्हा: तुम्ही पर्सनल फायनान्सशी संबंधित गोष्टींबद्दल माहिती मिळवण्यास सुरुवात केली पाहिजे. या विषयाबद्दल जास्तीत जास्त ज्ञान Knowledge मिळवणं हा तुमच्या पैशाचं योग्य व्यवस्थापन करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. त्यामुळे तुमच्यात एक प्रकारचा आत्मविश्वास (Confidence) निर्माण होईल आणि कुठल्याही आर्थिक संकटातून तुम्ही मार्ग काढू शकाल. Gold Price Today: ऐन लग्नसराईत सोन्याच्या दरात वाढ; चांदीही महागली, चेक कर नवे दर स्वत: चं बजेट तयार करा: तुमचं स्वत: चं एक बजेट (Budget) तयार करा. त्यामुळे तुम्हाला तुमचं मासिक उत्पन्न (Monthly Income) आणि खर्चाचं (Expenses) गणित बसवण्यास मदत होईल. यासाठी तुम्ही विविध डिजिटल अॅप्ससारख्या साधनांचा वापर करू शकता किंवा मायक्रोसॉफ्ट एक्सेल (Excel) यासारख्या पारंपरिक टूलचाही वापर करू शकता. तुमच्या कमाईपेक्षा तुमचा खर्च जास्त तर नाही ना, याची खात्री केली पाहिजे. असं केल्यास बचत करणं सोप होईल. तुमचं क्रेडिट स्टेटस नियमित चेक करा: तुम्हाला तुमची क्रेडिट हिस्ट्री (Credit History) माहीत असणं आवश्यक आहे. तुम्ही ती नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. ही एक अशी गोष्ट आहे ज्यामुळे तुम्हाला तुमच्या मनी मॅनेजमेंटबद्दल माहिती मिळते. तुमच्या क्रेडिट हिस्ट्रीमुळे कर्ज देणाऱ्यांना (Lenders) तुम्ही किती विश्वासपात्र आहात याची कल्पना येते. त्यानुसार मग तुम्हाला कर्ज द्यायचं की नाही, याचा निर्णय ते घेतात त्यामुळे तुमची क्रेडिट हिस्ट्री क्लिन ठेवा. ती क्लिन असल्यास तुमचं इम्प्रेशन चांगलं पडेल व भविष्यात जर तुम्हाला तुमचा बिझनेस वाढवण्यासाठी कर्जाची गरज पडली तर तेही सहज उपलब्ध होईल. कर्जाची परतफेड करा: जर तुम्ही कर्ज घेतलेलं असेल तर ते शक्य तितक्या लवकर फेडण्याची तयारी ठेवा. तुमच्या सर्व कर्जांची यादी तयार करून या गोष्टीची सुरुवात करा. तुमच्या सध्याचा इन्कमचा अॅडव्हान्स, किमान मासिक पेमेंट आणि घराच्या कर्जाचा व्याजदराचा यामध्ये समावेश करा. ही सर्व माहिती जमा केल्यानंतर, तुम्ही तुमच्या कर्जाचा हप्ता (Debt Payments) भरताना किती अधिक पैसे भरू शकता ते ठरवा. कर्ज कमी करण्यासंबंधी रिसर्च करणं सर्वांत जास्त फायदेशीर आहे. शिवाय आपत्कालीन परिस्थितींसाठी (Emergencies) तुमच्याकडे बचत केलेले पैसे असणंही महत्त्वाचं आहे. रेल्वेतील बेशिस्त प्रवाशांचा इतरांना फटका; मुंबईतील अनेक स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिटांच्या दरात पाच पट वाढ सेव्हिंग प्लॅन तयार करा: कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमच्याकडे प्लॅन बी तयार असला पाहिजे. आर्थिक संकटावेळी तुमचं सेव्हिंग (Savings) प्लॅन बीचं काम करू शकतं. एका वर्षाचं उद्दिष्ट ठेवून सेव्हिंग करण्यास सुरुवात करा. अशा पर्यायांमध्ये गुंतवणूक (Investment) करण्यास सुरुवात करा ज्यातून चांगले रिटर्न्स (Returns) मिळतील. आपले पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक स्ट्रेटजीज (Strategies) उपलब्ध आहेत. तुम्हाला फक्त तुमच्या गरजेनुसार सर्वात चांगला ऑप्शन शोधणं गरजेचं आहे. वरील टिप्सचा अवलंब करून तुम्ही पर्सनल फायनान्स व्यवस्थित मॅनेज करू शकाल.
First published:

पुढील बातम्या