Home /News /money /

Rules Change : आजपासून हे नियम बदलणार, तुमच्या खिशावर होणार परिणाम

Rules Change : आजपासून हे नियम बदलणार, तुमच्या खिशावर होणार परिणाम

एलपीजी सिलेंडर ते बँकिंग सेवांच्या किंमतीत बदल करण्यात आले आहेत. आजपासून गॅस सिलेंडरच्या दरात बदल करण्यात आला आहे. या नियमांबद्दल जाणून घेऊया.

    मुंबई, 1 मार्च : सर्वसामान्यांना आजपासून पुन्हा धक्का बसणार आहे. 1 मार्च 2022 पासून तुमच्या पैशांशी संबंधित अनेक नियम बदलत आहेत. या अंतर्गत एलपीजी सिलेंडर ते बँकिंग सेवांच्या किंमतीत बदल करण्यात आले आहेत. आजपासून गॅस सिलेंडरच्या दरात बदल करण्यात आला आहे. या नियमांबद्दल जाणून घेऊया. कोणते नियम आजपासून लागू होतील? एटीएममधून पैसे जमा करण्याचे नियम बदलणार (ATM Rules) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) जारी केलेल्या नियमांनुसार, एटीएममध्ये रोख जमा करण्याच्या सध्याच्या प्रणालीमध्ये काही बदल केले जात आहेत. कॅश डिस्ट्रिब्युशनची सध्याची सिस्टम काढून टाकण्यासाठी, एटीएममध्ये रोकड भरण्याच्या वेळी फक्त लॉकेबल कॅसेटची खात्री केली पाहिजे. भारीच! फक्त झोपूनच लखपती झाला तरुण; नेमके कसे कमावतो पैसे पाहा VIDEO इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे शुल्क वाढणार (India Post Payment Bank charges will increase) इंडिया पोस्ट पेमेंट बँक (IPPB) ने आपल्या डिजिटल बचत खात्यासाठी क्लोजर शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे. तुमचे इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत बचत खाते असल्यास, खाते बंद करताना तुम्हाला हे शुल्क भरावे लागेल. हे शुल्क 150 रुपये असून त्यावर जीएसटीही भरावा लागणार आहे. बँकेचा हा नवा नियम 5 मार्च 2022 पासून लागू होणार आहे. LPG सिलेंडरची किंमत (LPG Cylinder Price) एलपीजीचे दर प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला निश्चित केले जातात. सरकारने आजपासून म्हणजेच 1 मार्च 2022 पासून एलपीजी सिलिंडरच्या किमतीत मोठी वाढ केली आहे. दिल्लीत व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत आजपासून 105 रुपयांनी वाढून 2,012 रुपये झाली आहे. शेअरिंग फ्लॅटमध्ये राहत असल्यास घरभाड्यावर टॅक्स कपात कशी क्लेम कराल? वाचा सविस्तर या बँकेचा IFSC कोड बदलला (IFSC code Changed) DBS Bank India Limited (DBIL) आणि लक्ष्मी विलास बँक (LVB) चे जुने IFSC कोड 28 फेब्रुवारी 2022 पासून बदलले आहेत. DBS Bank India Limited (DBIL) ने लक्ष्मी विलास बँकेत (LVB) विलीन केले आहे, त्यानंतर तिच्या सर्व शाखांचे IFSC आणि MICR कोड बदलले आहेत. DBIL ने जारी केलेल्या प्रकाशनानुसार, 1 मार्च 2022 पासून ग्राहकांना NEFT/RTGS/IMPS द्वारे पैशांच्या व्यवहारांसाठी नवीन DBS IFSC कोड वापरावा लागेल.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Bank, LPG Price, Money

    पुढील बातम्या