नवी दिल्ली, 01 मार्च: तुम्ही भाडेतत्त्वावर (Rent) राहत आहात आणि तुम्हाला त्याच्या पेमेंटवर (Payment) कर (Tax Benefits) सूट हवी आहे? तर, तुम्हाला याबाबत चिंता करण्याची गरज नाही. कारण तुम्हाला अशी कर सूट मिळू शकते. तुम्ही घरभाड्यावरही कर कपातीचा (Tax Deduction) दावा करू शकता. पण जर तुम्ही दुसऱ्या व्यक्तीसोबत भाड्याचं घर शेअर करत असाल, तर भाडेपट्टीवरील (Lease) कर कपातीचा दावा करणं गुंतागुंतीचं ठरू शकतं. त्यामुळे क्लेम अर्थात दावा करतेवेळी काय काळजी घ्यायची हे आता जाणून घेऊया. 1. फ्लॅटच्या लीज अॅग्रीमेंट किंवा लीज अॅण्ड लायसन्स अॅग्रीमेंटमध्ये तुमचं नाव असणं खूप महत्त्वाचं आहे. हे नसल्यास तुम्ही भरत असलेल्या भाडेपट्टीवर कर कपातीचा दावा करू शकणार नाही. तुम्ही आयकर (Income Tax) कायद्याच्या कलम 80GG अंतर्गत भरलेल्या घरभाड्यावर कर कपातीचा दावा करू शकता. 2. जेव्हा तुम्ही फ्लॅट शेअर करत असाल, तेव्हा तुम्ही जेवढे पैसे भरले आहेत, तेवढ्याच रकमेच्या अनुषंगानं तुम्ही कर कपातीचा दावा करू शकता. बंगळुरूस्थित चार्टर्ड अकाउंटंट प्रकाश हेगडे यांच्या मते, एकाच ठिकाणी 3-4 लोक राहत असल्यास, तुम्ही प्रत्यक्षात भाडे म्हणून दिलेल्या पैशांच्या प्रमाणात कर कपातीसाठी दावा करू शकता. समजा, घराचं एकूण भाडं 30,000 रुपये आहे आणि तुम्ही 7,000 रुपये भरत असाल तर तुम्ही केवळ दरमहा 7,000 रुपये घरभाडे रकमेसाठी कर कपातीचा दावा दाखल करू शकता. हे वाचा- Petrol Diesel Prices Today: मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी इंधन दरात काय बदल? 3. जर तुम्ही पेईंग गेस्ट (Paying Guest) म्हणून राहत असाल आणि तुमचे घरभाडे आणि जेवणाचे पेमेंट एकत्र देत असाल तर तुम्ही त्यावर कर कपातीचा दावा करू शकणार नाही. तुमचे वार्षिक भाडे एक लाख रुपयांपेक्षा अधिक असेल तर कर कपातीचा दावा करण्यासाठी तुमच्याकडे घरमालकाचा पॅन क्रमांक (PAN Number) असणे आवश्यक आहे. 4. जर तुमचा घरमालक अनिवासी भारतीय अर्थात एनआरआय (NRI) असल्यास तुम्हाला स्त्रोतावर कर कपात करावी लागेल. कर कपात करण्यासाठी, तुम्हाला टॅक्स डिडक्शन अकाउंट नंबरसाठी (Tax Deduction Account Number-TAN) अर्ज करावा लागेल आणि प्रत्येक महिना संपल्यानंतर सात दिवसांत सरकारकडे टीडीएस (TDS) जमा करावा लागेल. तुम्हाला त्रैमासिक टीडीएस रिटर्न देखील भरावा लागेल आणि तुमच्या घरमालकाला टीडीएस प्रमाणपत्र द्यावे लागेल. ही सर्व प्रक्रिया करण्यासाठी तुमच्याकडे घरमालकाचा पॅन क्रमांक असणे आवश्यक आहे. हे वाचा- भारीच! फक्त झोपूनच लखपती झाला तरुण; नेमके कसे कमावतो पैसे पाहा VIDEO 5. तुमच्या फ्लॅटचे एकूण भाडे दरमहा 50,000 रुपयांपेक्षा जास्त असेल आणि घरमालक भारतीय रहिवासी असला तरीही तुमचा पाच टक्के दराने टीडीएस कपात होईल. टॅन मिळवण्यासाठी, सरकारी खात्यात कपात केलेला कर भरण्यासाठी आणि टीडीएस रिटर्न भरण्यासाठी हेच नियम लागू असतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.