जाहिरात
मराठी बातम्या / मनी / एलपीजीचे दर, ITR फायलिंगसह जुलैमध्ये होणार 'हे' पाच मोठे बदल

एलपीजीचे दर, ITR फायलिंगसह जुलैमध्ये होणार 'हे' पाच मोठे बदल

एलपीजीचे दर, ITR फायलिंगसह जुलैमध्ये होणार 'हे' पाच मोठे बदल

एलपीजीचे दर, ITR फायलिंगसह जुलैमध्ये होणार 'हे' पाच मोठे बदल

1 जुलै 2023 पासून लागू होणारे हे बदल तुम्ही समजून घेतले नाहीत तर तुमचं नुकसान होऊ शकतं.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई : आज जून महिन्याचा शेवटचा दिवस आहे. 1 जुलैपासून अनेक बदल होणार आहेत. ज्याचा थेट परिणाम नागरिकांच्या खिशावर होणार आहे.  1 जुलै 2023 पासून लागू होणारे हे बदल तुम्ही समजून घेतले नाहीत तर तुमचं नुकसान होऊ शकतं. इंधन व एलपीजीचे दर : तेल कंपन्या दर महिन्याला लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस (LPG) सिलेंडर आणि कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसच्या (CNG) दरात बदल करतात. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइलच्या किमतीत सातत्याने चढ-उतार होत आहेत. त्यामुळे एलपीजीच्या किमतींमध्ये बदल होईल. मे आणि एप्रिलमध्ये 19 किलोच्या कमर्शिअल गॅस सिलेंडरची किंमत कमी करण्यात आली होती, तर 14 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती कायम होत्या. त्यामुळे या वेळी घरगुती सिलिंडरच्या दरात कपात होण्याची शक्यता आहे.

    HDFC च्या मर्जरनंतर होम लोन आणि FD च्या गुंतवणुकदारांवर काय परिणाम होणार? सोप्या भाषेत घ्या समजून

    इन्कम टॅक्स रिटर्न : इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै आहे. करदात्यांनी दरवर्षी ITR भरणं आवश्यक आहे. अंतिम मुदत चुकल्यास करदात्यांना दंड भरावा लागू शकतो. इंटरनॅशनल डेबिट व क्रेडिट कार्ड ट्रँझॅक्शनवर 20% TCS: क्रेडिट कार्डने परदेशात व्यवहार करणाऱ्यांना आता 20% टॅक्स कलेक्टेड अॅट सोर्स (TCS) भरावा लागेल. सरकारने मे महिन्यात नियमात बदल केला होता. नवीन नियमानुसार, इंटरनॅशनल डेबिट किंवा क्रेडिट कार्डवर आर्थिक वर्षात 7 लाखांपर्यंतचे छोटे पेमेंट 20% TCS नियमातून वगळले जाईल. त्यामुळे, आयटीआर दाखल करताना त्यावर दावा करता येऊ शकतो.

    Pan-Aadhar लिंक करण्याची आज अखेरची संधी! सरकार डेडलाइन वाढवणार का?

    फुटवेअर कंपन्यांसाठी QCO अनिवार्य: केंद्र सरकारने फूटवेअर बनवणाऱ्या कंपन्यांना 1 जुलैपासून क्वालिटी कंट्रोल ऑर्डर (QCO) लागू करणं बंधनकारक केलंय. जागतिक व्यापार संघटनेच्या (WTO) नियमांचे पालन करून सरकारने फूटवेअर कंपन्यांसाठी स्टँडर्ड्स लागू केले आहेत. आता फुटवेअर कंपन्यांना या नियमांनुसार शूज आणि चप्पल तयार करावे लागतील. सध्या 27 फुटवेअर प्रॉडक्ट्स QCO च्या कार्यक्षेत्रात समाविष्ट आहेत, परंतु पुढील वर्षी उर्वरित 27 प्रॉडक्ट्सही यात समाविष्ट केले जातील. HDFC आणि HDFC बँक मर्जर: हाउसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडने (HDFC) 1 जुलै रोजी HDFC बँक लिमिटेडशी 40 बिलियन मेगा मर्जर शेड्युल केलं आहे, देशातील सर्वांत मोठ्या खासगी क्षेत्रातील लेंडरला देशाच्या सर्वोच्च मॉर्गेज लेंडरबरोबर एकत्र आणलंय. गेल्या वर्षी, भारतातील सर्वात मोठ्या खासगी क्षेत्रातील कर्जदार बँक आणि त्यांच्या प्रमोटर्सनी बँकेला अधिक स्पर्धात्मक बनवण्यासाठी आणि उत्पादने क्रॉस-सेल करण्यासाठी कॅप्टिव्ह ग्राहक बेसपर्यंत प्रवेश मिळावा यासाठी विलिन होण्याचा निर्णय घेतला होता.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात