मुंबई, 30 जुलै : देशातील सर्वात मोठी कंपनी रिलाइन्स इंडस्ट्रिजने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन महिन्याचे आकडे जारी केले आहेत. पहिल्या तीन महिन्यात RIL ला एकूण महसूल 88,253 कोटी रुपये राहिला आहे.
कोविड-19 च्या संकटानंतर रिलाइन्स जिओ, रिटेल आणि ऑयव टू केमिकल व्यवसायाचे निकाल एनलिस्टच्या अपेक्षेपेक्षा चांगला राहिला आहे. सध्या ऑयल टू केमिकल व्यवसायाची मागणी कमी असल्याने परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. RIL ची ग्रॉस रिफाइनिंग मार्जिन $6.3/bbl राहिली. पहिल्या तीन महिन्यात रिलाइन्स इंडस्ट्रीजचा केवळ नफा 13,248 कोटी रुपये राहिला.
गेल्या आर्थिक वर्षाच्या काळात हा 10,104 कोटी रुपये होता. एप्रिल ते जून या तीन महिन्यात जिओचा नफा 2,520 कोटी रुपये असून पहिल्या तीन महिन्यांच्या ऑपरेशनमधून येणारा कंसॉलिडेटेड उत्पन्न 91,238 कोटी रुपये आहे. गेल्या वर्षी सामान्य परिस्थितीत हा 1,62,353 कोटी रुपये होता.
हे वाचा-मोबाइलच्या एका क्लिकवर मागवू शकाल किराणा; JioMartचे अॅप लाँच!
कंपनीबाबत चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी सांगितले की, वैश्विक लॉकडाऊनच्या कारणास्तव मागणीत मोठी घट झाली आहे. ज्यामुळे हाइड्रोकार्बन व्यवसायावर परिणाम झाला आहे. परंतु ऑपरेशन्समधील लवचिकतेमुळे आम्ही चांगली कामगिरी केली आहे. जी उद्योग क्षेत्रात सर्वात चांगली आहे. रिलाइन्स इंडस्ट्रीडचा कंसॉलिडेटेड ऑपरेटिंग प्रॉफिट 21,585 कोटी रुपये आहे. कॅश प्रॉफिटबद्दल सांगायचं झालं तर वर्षानुवर्षांच्या आधारावर यामध्ये 17 टक्के नफा झाला आहे आणि हा 18893 कोटी रुपये आहे. लॉकडाऊनदरम्यान कंपनीच्या रिफायनिंग आणि पेट्रोकेमिकल व्यवसाय आपल्या क्षेमतेच्या 90 टक्क्यांपर्यंत काम करीत होती. इंड्रस्टीच्या एकून तुलनेत हा 30 टक्के होता. कंपनीने या दक्षतेला फीडस्टॉक ऑप्टिमायजेशन आणि उच्च निर्याताच्या आधारावर केलं आहे. या तीन महिन्यादरम्यान कंपनीचं एकूण निर्यात 32,681 कोटी रुपये होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mukesh ambani, Reliance, RIL