मराठी बातम्या /बातम्या /मनी /बँकेत लॉकर घेतला आहे का? ही चूक करू नका, अन्यथा...

बँकेत लॉकर घेतला आहे का? ही चूक करू नका, अन्यथा...

रिझर्व बँकने बदलले नियम; दिर्घकाळ लॉकर बंद असल्यास खातेदाराला बसणार हा फटका

रिझर्व बँकने बदलले नियम; दिर्घकाळ लॉकर बंद असल्यास खातेदाराला बसणार हा फटका

रिझर्व बँकने बदलले नियम; दिर्घकाळ लॉकर बंद असल्यास खातेदाराला बसणार हा फटका

    मुंबई 23 ऑगस्ट: आजकल बहुतेक घरांत नवरा-बायको दोघेही नोकरी करणारे असतात, त्यामुळे दिवसभर घरात कोणीही नसते किंवा असल्यास ज्येष्ठ, वृद्ध नागरिक किंवा लहान मुलं असतात त्यामुळं दागिने, मौल्यवान वस्तू ठेवणे हे सुरक्षिततेच्या दृष्टीनं धोकादायक ठरते. दागिन्यांसाठी चोरी, दरोडा पडण्याची भीती असते. त्यामुळे घरातील लोकांच्या जीवालाही धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे ही जोखीम टाळण्यासाठी आणि आपल्या मौल्यवान गोष्टी सुरक्षित ठेवण्याच्या उद्देशानं त्या घरात न ठेवता बँकेच्या लॉकरमध्ये (Bank Locker) ठेवल्या जातात. तिथं कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत घरापेक्षा त्या सुरक्षित राहतात. त्यामुळे बँकांकडे सतत लॉकर्सची मागणी होत असते.

    बँकांमध्ये ठराविक शुल्क आकारून लॉकर दिले जातात. आपल्याला गरज असेल तेव्हा आपण बँकेत जाऊन आपला लॉकर उघडू शकतो आणि त्यातील वस्तू आणू शकतो, काम झाल्यानंतर पुन्हा त्या लॉकरमध्ये ठेवू शकतो. सणसमारंभ, विवाह किंवा अन्य काही कार्यक्रम असतील तर लोक लॉकरमधील दागिने काढून आणतात. सध्या कोरोना साथीच्या संकटामुळे असे प्रसंग कमी झाले आहेत तसंच सुरक्षा निर्बंधामुळेही लॉकर उघडण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. त्याचप्रमाणे अकस्मात मृत्यू, घरच्यांना माहिती नसणे अशा काही कारणांमुळे काही ग्राहकांचे लॉकर्स प्रदीर्घकाळ उघडले जात नाहीत. त्याबाबत भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. टीव्ही9 हिंदीनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

    Aadhaar Card हरवल्यास चिंता नको, घरी पोहोचेल PVC कार्ड; जाणून घ्या ऑनलाईन प्रोसेस

    त्यानुसार, एखाद्या ग्राहकाने नियमितपणे भाडे भरूनही 7 वर्षांच्या कालावधीत एकदाही आपला लॉकर उघडला नाही (Locker not opened in 7 Years) आणि त्याचा शोधही लागत नसेल तर अशा परिस्थितीत बँकेला (Bank) तो लॉकर उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. परंतु त्याच वेळी सार्वजनिक हिताचे रक्षण करण्यासाठी लॉकर तोडण्यापूर्वी काही सूचनांचे पालन करणे अनिवार्य असल्याचंही रिझर्व्ह बँकेनं स्पष्ट केले आहे. याबाबत सविस्तर सूचना बँकेनं दिल्या आहेत. बँकिंग आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील विविध घडामोडी, ग्राहकांच्या तक्रारींचे स्वरूप तसंच बँका आणि इंडियन बँक्स असोसिएशनकडून मिळालेला अभिप्राय लक्षात घेऊन, रिझर्व्ह बँकेनं या सुधारित सूचना दिल्या आहेत.

    यानुसार, अशा पद्धतीनं लॉकर उघडण्याची वेळ आली तर बँक लॉकर-भाड्याने घेणाऱ्या ग्राहकाला आधी एका पत्राद्वारे नोटीस (Notice) देईल. तसंच नोंदणीकृत ईमेल आयडीवर ईमेल (Email) आणि मोबाईल फोन नंबरवर एसएमएस (SMS) अलर्ट पाठवेल. नोटीस वितरणाशिवाय परत आली किंवा खातेदाराचा ठावठिकाणा लागला नाही तर तर बँक त्या व्यक्तीला किंवा नॉमिनी, वारसदार आदी लोकांना याबाबत सूचना देण्यासाठी एक इंग्रजी आणि एक स्थानिक भाषेतील अशा दोन वृत्तपत्रांमध्ये (News Papers) सार्वजनिक नोटीस जारी करेल. या नोटीशीला उत्तर देण्यासाठी योग्य मुदत दिली जाईल. त्यानंतरही काहीही प्रतिसाद मिळाला नाही तर बँक लॉकर उघडण्याचा निर्णय घेईल. बँकेचे अधिकारी आणि दोन स्वतंत्र साक्षीदारांच्या उपस्थितीत लॉकर उघडला जाईल आणि या संपूर्ण प्रक्रियेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग (Video Recording) करण्यात येईल. लॉकर उघडल्यानंतर, आतील सर्व सामग्री तपशीलवार यादीसह एका पाकिटात घालून ते सीलबंद करून एका तिजोरीमध्ये (Safe) ठेवलं जाईल. जोपर्यंत ग्राहक दावा करत नाही, तोपर्यंत ही सामग्री बँकेकडे सुरक्षित ठेवली जाईल.

    First published:
    top videos

      Tags: Bank, Money